Maharashtra News Live Update : मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्स
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 12:41 AM

मुंबई : आज शुक्रवार 22 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांच्या गडगडांसह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरासह काही गावामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून मिळाला दिलासा मिळाला. तिथं शेतकऱ्याच्या भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.