Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर, बच्चू कडूंचीही बंडाळी
Maharashtra Government, MVA Politics, Eknath Shinde, MLA, Vidhan Parishad Election Result, BJP news in Marathi: एकनाथ शिंदे नाराज आमदारांसह गुजरातमधील हॉटेलमध्ये आहेत. भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शहा जे पी नड्डा यांच्या घरी, महाराष्ट्रातल्या राजकारणात भुकंप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता. जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर..

Maharashtra Political News Live Update : मुंबई – विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं आहे. भाजपने (BJP) राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवार निवडून आणले. त्याचीच पुनरावृत्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. भाजपने काल त्याचे पाच उमेदवार निव़डून आणले. तेव्हापासून महाविकास आघाडी बिघाडी असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) काही शिवसेना आमदार गुजरातमधील सुरतच्या (Gujrat Surat) ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये आहेत. सध्या शिवसेनेचे 29 आमदार फुटल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे बारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. (Press Conference)
गुजरातमध्ये असलेले आमदार सुरतहून आसामची राजधानी गुवाहटीला नेले जातायत.
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी, मनोरंजन विश्वातील बातम्या, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या :
LIVE NEWS & UPDATES
-
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर, बच्चू कडूही शिंदेंच्या शेजारी पहिल्याच रांगेत
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर आलाय. सूरतच्या हॉटेलमधील हा फोटो आहे. या फोटोत एकूण 32 आमदार आहेत. महत्वाची बाब म्हणजे यात प्रहार संघटनेते नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही समावेश आहे. बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शेजारी पहिल्याच रांगेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर
-
आमदारांना मारहाण? संजय राऊतांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
सूरतमध्ये शिवसेनेच्या काही आमदारांना मारहाण झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या तक्रारीची दखल आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतलीय. याबाबत त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यादृष्टीनेच आता क्राईम ब्रांचच्या दोन टीम सूरतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
-
एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मिलिंद नार्वेकर ‘वर्षा’वर दाखल, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु
एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे दोन्ही नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. सुमारे अर्धा तासापासून वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती नार्वेकर आणि फाटक मुख्यमंत्र्यांना देत असल्याची माहिती मिळतेय.
-
एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटे सूरतमध्ये, शेजारी बसलेल्या आमदारानं चेहरा झाकला!
एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे हे एका गाडीत सूरतमधील हॉटेलबाहेर पाहायला मिळाले. त्यांच्या शेजारी एक आमदार बसलेला होता. पण त्या आमदाराने आपल्या चेहरा झाकल्याचं पाहायला मिळालं.
-
अकोल्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख सूरतमधील हॉटेलबाहेर, नितीन देशमुखांना का भेटू दिलं जात नाही?
अकोल्याचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख काही कार्यकर्त्यांसोबत सूरत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांना हॉटेलबाहेरच रोखून धरण्यात आलंय. नितीन देशमुख यांना का भेटू दिलं जात नाही? असा सवाल ते विचारत आहेत.
-
मला डांबून ठेवलंय, IPS अधिकारी सोडत नाही, नितीन देशमुखांचा अरविंद सावंतांशी संवाद
शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना गुजरातमध्ये एका IPS अधिकाऱ्यानं ताब्यात ठेवल्याची माहिती मिळतेय. देशमुख यांनी शिवसेना नेते अरविंद सावंत यांना फोन करुन मला डांबून ठेवलं आहे, सोडलं जात नाही असं सांगितलं. त्यानंतर अरविंद सावंत यांनी त्या IPS अधिकाऱ्यांला जाब विचारला. त्यांना अडवून का धरलं? त्यांना प्रवास करण्यापासून का अडवलं जात आहे? तुमचं नाव काय? असा प्रश्न सावंत यांनी त्या IPS अधिकाऱ्याला विचारला. त्याची एक ऑडिओ क्लिप समोर आलीय.
-
महाराष्ट्र क्राईम ब्रांचच्या दोन टीम सूरतला जाण्याच्या तयारीत, माहिती मिळाल्यानंच आमदारांना हलवण्याचा निर्णय
सूरतमध्ये सुरु असलेल्या हालचालीमागे मोठं कारण सांगितलं जात आहे. महाराष्ट्र क्राईम ब्रांचच्या दोन टीम सूरतला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच आता सूरतमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसामच्या गुवाहाटीला नेण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
-
आमदार नितीन देशमुखांचा ताबा गुजरातमधील IPS दर्जाच्या अधिकाऱ्याकडे, अरविंत सावंतांचा आरोप
शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा ताबा गुजरातमधील एका आयपीएस अधिकाऱ्याकडे असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी केलाय. छातीत दुखत असल्यानं नितीन देशमुख यांना सूरतमध्येच दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे यांनीही त्यांची भेट घेतली होती. मात्र दवाखान्यातून देशमुख यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र आता अरविंद सावंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय.
-
एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण 32 आमदार, यादी वाचा
एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण 32 आमदार असल्याची माहिती मिळतेय. त्यात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचाही एक आमदार आहे. हाती आलेल्या यादीनुसार शिंदे यांच्यासह एकूण 33 आमदार सध्या सूरतमध्ये आहेत.
- महेंद्र थोरवे
- भारत गोगावले
- महेंद्र दळवी
- अनिल बाबर
- महेश शिंदे
- शहाजी पाटील
- शंभुराज देसाई
- बालाजी कल्याणकर
- ज्ञानराज चौगुले
- रमेश बोरणारे
- तानाजी सावंत
- संदिपान भुमरे
- अब्दुल सत्तार
- नितीन देशमुख
- प्रकाश सुर्वे
- किशोर पाटील
- सुहास कांदे
- संजय सिरसाट
- प्रदीप जैस्वाल
- संजय रायमुलकर
- संजय गायकवाड
- एकनाथ शिंदे
- विश्वनाथ भोईर
- राजकुमार पटेल
- शांताराम मोरे
- श्रीनिवास वनगा
- प्रताप सरनाईक
- प्रकाश आबिटकर
- चिमणराव पाटील
- नरेंद्र बोंडेकर
- लता सोनावणे
- यामिनी जाधव
- बालाजी किनिकर
-
राज्यसभेवेळी संजय राऊतांना धोका होता, पण शिंदेंनी आमदारांचा विरोध मोडून काढला?
राज्यसभा निवडणुकीतच शिवसेना खासदार संजय राऊत यांना धोका होता. त्यावेळीच शिवसेना आमदार संजय राऊतांवर नाराज होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनीच आमदारांचा विरोध मोडून काढला होता, असा दावा लि मेरेडियन हॉटेलमध्ये असलेल्या एका आमदाराने टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.
-
मिलिंद नार्वेकरांची शिष्टाई, संजय राऊतांचा इशारा आणि उद्धव ठाकरेंचा फोनही कामी आला नाही
एकनाथ शिंदे यांचं बंड शमवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात होता. त्यासाठी शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना शिंदेंची मनधरणी करण्यासाठी सूरतला पाठवण्यात आलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना इशारा दिला. तर उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिंदे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. मात्र नार्वेकरांची शिष्टाई, संजय राऊतांचा इशारा आणि उद्धव ठाकरेंचा फोनही कामी आला नाही असंच म्हणावं लागणार आहे.
-
3 बसमधून 65 जणांना सूरत विमानतळाकडे नेण्यात येणार
हॉटेल लि मेरेडियन परिसरात तीन बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसमधून एकूण 65 जणांना सूरत विमानतळावर नेण्यात येणार आहे. यात 35 आमदार आणि त्यांचे पीए असतील अशी माहिती मिळत आहे.
-
चार्टर्ड विमानाद्वारे बंडखोर आमदार आसामला रवाना होणार
सूरत विमानतळावर तीन चार्टर्ड विमानं दाखल झाली आहेत. या विमानांच्या माध्यमातूनच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसामला नेण्यात येणार आहे. रात्री बाराच्या सुमारास हे आमदार गुवाहाटीसाठी सूरतवरुन उड्डाण भरतील असं सांगितलं जात आहे.
-
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सूरत एअरपोर्टवर घेऊन जाण्यासाठी हॉटेल लि मेरेडियनवर बसेस दाखल
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आता सूरतवरुन थेट आसामच्या गुवाहाटीला नेलं जाणार असल्याची माहिती मिळतेय. त्यासाठी तीन बसेस आता लि मेरेडियन हॉटेलवर दाखल झाल्या आहेत. त्या बसेसमधून बंडखोर आमदारांना सूरतच्या एअरपोर्टवर नेण्यात येणार आहे.
-
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांना पाडणार होते; शिवसेनेच्या सुरतमधील आमदाराची टीव्ही 9 ला गोपनीय माहिती
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांना पाडणार होते!
एकनाथ शिंदे यांनी आमदारांना शिव्या देऊन संजय राऊत यांना मतदान करायला लावलं
शिवसेनेच्या सुरतमधील एका आमदाराची टीव्ही 9 ला गोपनीय माहिती
एक आमदार तर थेट मतपत्रिका फाडायला निघाला होता
तर एका आमदाराने जाणीवपूर्वक मतपत्रिका इतरांना दाखवली
शिंदे समर्थक शिवसेना आमदाराने स्वतः टीव्ही 9 ला दिली माहिती
-
नितीन देशमुखांना मारहाण-संजय राऊत
बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आ. नितीन देशमुख यांना गुजरात पोलीसांनी मारहाण केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते हॉटेलमधून पळून जात असताना पोलीसांनी त्यांना जबर मारहाण केल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या बैठकीतही मारहाणीची सुर निघाला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे. विशेष म्हणजे नितीन देशमुख यांच्या पत्नीनेही कॉन्टॅक्ट होत नसल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे छातीत दुखत असल्याच्या कारणाने नितीन देशमुख यांच्यावर दिवसभर उपचार केले गेलेत.
-
एकनाथ शिंदेंच्या गोटात 65 जण, तीन विमानं सज्ज
-
बंडखोरांना घेऊन जाण्यासाठी तीन विमानं
शिवसेनेचे बंडखोर आमदारांना आसामची राजधानी गुवाहाटीला घेऊन जाण्यासाठी तीन विमानं सुरत एअरपोर्टवर सज्ज आहेत. ह्याच तीन विमानातून सर्व बंडखोरांना रात्रीतून गुवाहाटीला नेण्यात येईल. अवघ्या चोवीस तासात तीन शहरं बंडखोरांना पहावी लागणार आहे. म्हणजे रात्री हे सर्व बंडखोर मुंबईत होते. त्यांची सकाळ सुरतमध्ये झाली आणि आता पुन्हा मध्यरात्रीतून त्यांना आसामला हलवा हलव करण्यात येते आहे.
-
मी माझ्या पतीला भेटणारच-नितीन देशमुखांच्या पत्नींची तक्रार
-
नितीन देशमुख पुन्हा शिंदेंच्या गोटात
बंडखोर आ. नितीन देशमुख हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. सकाळी त्यांच्या छातीत दुखत असताना त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेलं होतं. दिवसभरात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शिंदे त्यांच्या चौकशीसाठी रुग्णालयातही गेले. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा हॉटेलला आणल्याची माहिती आहे.
-
एकनाथ शिंदेंना आमदारांची भीती
शिवसेनेचे बंडखोर आमदारांना आसामची राजधानी गुवाहाटीला नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कारण काही बंडखोर आमदार पळ काढतील अशी भीती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळेच सर्वच बंडखोर आमदारांना सुरक्षित स्थळी म्हणजेच आसामला नेण्यात येणार असल्याचं समजतंय.
-
शिवसेना बंडखोरांना आसामला रात्रीतून हलवणार
शिवसेनेचे बंडखोर आमदारांना नव्या जागी हलवण्याची तयारी. सर्वच्या सर्व आमदारांना आसामला हलवलं जात आहे.त्यासाठी
सुरत एअरपोर्टवर स्पाईस जेटचं विमान तयार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार आहेत.
पण गुजरात किंवा त्यातही सुरत ही शहरं संपर्कासाठी जवळ पडतायत शिवसेनेला. तो संपर्क तोडण्यासाठीच आमदारांना
आसामला हलवण्याची तयारी केली जाते आहे.
-
संजय राऊतांच्या इशाऱ्याचा अर्थ शिंदेसाठी डोकेदुखी ठरणार
संजय राऊतांच्या इशाऱ्याचा अर्थ शिंदेसाठी डोकेदुखी
प्रतोदांना व्हीप बजावल्यास बंडखोरांना शिवसेनेलाच मतदान करावं लागणार
एकनाथ शिंदेंच्या बंडापुढे तांत्रिक अडचणींचा डोंगर
-
एक गुंड मी तिथे बसलेला पाहिला:संजय राऊत यांनी नाव न घेता मोहिक कंबोज यांच्यावरही निशाणा साधला
एक गुंड मी तिथे बसलेला पाहिला, असं म्हणत संजय राऊत यांनी नाव न घेता मोहिक कंबोज यांच्यावरही निशाणा साधलाय.
-
एकनाथ शिंदे यांचे आम्ही प्रेमाने स्वागत करू; संजय राऊत
भाजपात असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणतं खातं होतं, मविआमध्ये त्यांच्याकडे कोणतं खातं दिलं गेलंय, त्यांची मान कोणत्या सरकारमध्ये जास्त राखला गेला, हे त्यांनी पाहावं.
त्यांनी परत यावं, आम्ही त्यांचं प्रेमाने स्वागत करु
-
आम्हाला खात्री आहे एकनाथ शिंदे परत येतील; संजय राऊत
विधानसभेत जेव्हा वेळ येईल, तेव्हा आकडे मोजा.
आम्ही पूर्ण बहुमत सिद्ध करुन त्यांनी जर नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांची आमदारकी रद्द होईल.
एकनाथजी आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत.
एकनाथ शिंदे त्यांच्या सगळ्या आमदारांसह परत येतील, याची मला खात्री आहे.
-
काँग्रेसच्या गोटातही जोरदार हालचाली; उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेस आमदारांची बैठक
काँग्रेसच्या गोटातही जोरदार हालचाली
उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेस आमदारांची बैठक
बैठकीला दिल्लीतून प्रतिनिधी येणार
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ उद्या मुंबईत दाखल होणार
बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यावर सकाळी 11 वाजता बैठक
सूत्रांची माहिती
-
सुट्टीसाठी पोलीस निरीक्षकावर चाकू हल्ला; औरंगाबादमधील घटना
औरंगाबाद शहरातील जिन्सी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्यावर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने केला चाकू हल्ला
सुट्टी देण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्यातून बाहेर निघत असताना केला हल्ला
पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या जवळील चाकूने पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्यावर अचानक हल्ला
या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्र हे जखमी झाले असून त्यांना औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयांमध्ये दाखल
हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले
-
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आनंद दिघेंच्या पुतण्यांनी व्यक्त केली नाराजी
शिंदे यांच्या बंडानंतर आनंद दिघे यांच्या पुतणे यांनी नाराजी व्यक्त केली
शिवसेना अखंड राहणार असल्याचा विश्वास
शिवसेना मजबूत राहिल
आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी व्यक्त केला विश्वास
-
बंडखोर आमदार नितीन देशमुख यांची पत्नी सूरतला रवाना
बंडखोर आमदार नितीन देशमुख यांची पत्नी सूरतला रवाना
बंडखोरीनंतर छातीत कळ आल्याने रुग्णालयात दाखल
अकोल्यातील अनेक नातेवाईक सूरतला रवाना
-
माझ्यासोबत 40 आमदार असल्याचा विश्वास;आमदार एकनाथ शिंदेंचा विश्वास
माझ्यासोबत 40 आमदार असल्याचा विश्वास
आमदार एकनाथ शिंदेंचा विश्वास
80 टक्के आमदार सेना आमदार फोडले
कोणीही फुटलेले नाहीत सगळे एका विचाराने एकत्र जमलोय
-
मंत्री आदिचत्य ठाकरेंच आमदारांसोबत जेवण; स्वतः आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये आमदारांसोबत राहणार
मंत्री आदित्य ठाकरेंच आमदारांसोबत जेवण
स्वतः आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये आमदारांसोबत राहणार
जोपर्यंत तिढा सुटत नाही तोपर्यंत आमदारांबरोबर असणार आदित्य ठाकरे
हॉटेलमध्ये आज रात्री स्वतः आदित्य ठाकरे करणार चर्चा
-
सूरतमधील हॉटेलमध्ये भाजपचे मोहित कंबोज ; हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल
सूरतमधील हॉटेलमध्ये भाजपचे मोहित कंबोज
संजय कुटे यांच्या सोबत मोहित कंबोज
भाजपचे आमदारही उपस्थित
-
भाजप राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषितः द्रौपदी मुर्मू या भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार
भाजप राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषितः जे. पी. नड्डा
आदिवासी भागातील उमेदवाराला प्राधान्य
द्रौपदी मुर्मू या भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार
-
लघुशंकेच्या निमित्ताने आमदार संतोष जाधव पुन्हा मुंबईत दाखल
फिरण्याच्या बहाण्याने गुजरातमध्ये आमदारांना घेऊन गेले
लघुशंकेच्या निमित्ताने संतोष जाधव पुन्हा मुंबईत दाखल
कालच्या सगळा रंजक घटनाक्रम सांगितला
एकनाथ शिंदेच्या गटातून जाधव निसटले
-
ठाकरे सरकारच्या कॅबिनेटची उद्या 1 वाजता बैठक
ठाकरे सरकारच्या कॅबिनेटची उद्या 1 वाजता बैठक
Maharashtra cabinet meet at 1 pm tomorrow, June 22
— ANI (@ANI) June 21, 2022
-
शिवसेनेचे बंडखोर आमदार नितीन देशमुखांच्या छातीत कळ आल्याने सूरतमध्ये दाखल
शिवसेनेचे बंडखोर आमदार नितीन देशमुखांच्या छातीत कळ आल्याने सूरतमध्ये दाखल
नितीन देशमुखांची पत्नीही रुग्णालयात
एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट
-
नितीन देशमुखांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे सूरतमधील रुग्णालयात
नितीन देशमुखांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
सूरमधील रुग्णालयात दाखल
नितीन देशमुख सिव्हील रुग्णालयात दाखल
-
कॉंग्रेस शिवसेनेसोबत आहेतः बाळासाहेब थोरात
आम्ही उद्धव ठाकरे सोबत राहू
शिवसैनिकांनो एकत्र राहा राष्ट्रवादी तुमच्यासोबत राहील
एकनाथ शिंदे स्वगृही परततील
-
येत्या काही तासातच सगळं सुरळीत होईल; भास्कर जाधव
येत्या काही तासातच सुरळीत होईल
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानुसार सगळं ठिक होईल
-
मतदानानंतर मी मुंबईतच: आमदार संतोष बांगर
शिवसेनेच्या बैठकीत 27 आमदार उपस्थित
-
आमदार हॉटेलकडे घेऊन जायला सुरुवात; भास्कर जाधव आमदारांना घेऊन गेले
आमदार हॉटेलकडे घेऊन जायला सुरुवात
भास्कर जाधव आमदारांना घेऊन गेले
-
एकनाथ शिंदे माझं ऐकतीलः उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे माझं ऐकतीलः उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
शिंदे लवकरच आपल्यासोबत असतील
-
ता जैन ,यामिनी जाधव,सोनवणे,प्रताप सरनाईक सुरतमधील हॉटेलमध्ये
गीता जैन ,यामिनी जाधव,सोनवणे,प्रताप सरनाईक हे आमदार सुरत हॉटेलमध्ये पोहचले
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आमदारही सुरतमध्ये दाखल
सूत्रांची सुरत वरून माहिती…
-
खडसेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असताना भाजपच्या समर्थकांबरोबर वाद
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खडसेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असतानाच भाजपचेही काही समर्थक त्याठिकाणी आल्याने वाद
जिल्ह्यातील जामनेरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकात एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष
त्यांनीही घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने तणाव निर्माण झाला.
यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी चांगलीच हुज्जत घातली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
-
मुख्यंत्र्यांच्या वर्षावर माजी खासदार चंद्रकांत खैरे दाखल
औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे वर्षावर दाखल
महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक
आमदार, खासदार उपस्थित
-
शिवसेना आमदारांची बैठक संपल्यानंतर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आमदारांची जबाबदारी
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आमदारांची जबाबदारी
आमदारांना एक एक करून हॉटेलमध्ये घेऊन जाणार
सगळ्या आमदारांना पोव ईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये ठेवलं जाणार
-
शिवसेना आमदारांची बैठक संपली; आमदारांना पोवईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये ठेवणार
शिवसेना आमदारांची बैठक संपली
सगळ्या आमदारांना पोवईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये ठेवलं जाणार
-
गुजरामधील आमदारांचे काही व्हिडिओ टीव्ही 9 च्या हाती
आमदारांना ठेवलेल्या हॉटेलचे इनसाईड व्हिडिओ
एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार याठिकाणी
या सगळ्या आमदारांचे फोन सध्या नॉट रिचेबल
संजय कुटे दुपारीच सूरतमधील हॉटेलमध्ये दाखल
पाहटेपर्यंत आमदारांना अहमदाबादला नेलं जाणार
-
काँग्रेसच्या बैठकीला सुरूवात
काँग्रेसचे सर्व आमदार बैठकीला हजर
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्व परिस्थितीची माहिती दिली
काँग्रेसच्या बैठकीला वरिष्ठ नेतेही उपस्थित
काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक
-
पनवेलमध्ये गद्दाराला माफी नाही च्या घोषणा
शिवसैनिकांकडून घोषणाबाजीगली गली मैं शोर है भाजपवाले चोर है चा नाराशिवसेनेच्या कार्यलयाबाहेर शिवसैनिकांची घोषणाशिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्या नंतर आता राज्यभरातून शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पनवेल शहर शिवसेनेच्या वतीने आज एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या विरोधात शिवसेना कार्यालया बाहेर निदर्शने करण्यात आली. शिवसेना कार्यालयावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळ्या पेनाने फुली मारत शिवसैनिकांनी आपला निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. -
बाळासाहेब थोरात यांची बैठकीनंतर प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली
सुनील केदार, छगन भुजबळ, उपस्थित होते
सीएम यांचं बोलणं एकनाथ शिंदेंबरोबर झालं आहे
हा प्रश्न शिवसेनेचा आहे
पण बहुतांश आमदार एकनाथ शिंदे बरोबर आहेत
तो आकडा आमच्याकडे नाही की किती आमदार त्यांच्या सोबत आहेत
-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Live
काँग्रेसचे कुठलेही आमदार नॉट रिचबल नाहीत
सर्व 44 आमदार आमच्या सतत संपर्कात आहेत
आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत
हा शिवसेनेचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे हा गुंता सोडवतील
अशा घडामोडी होतात तेव्हा वरिष्ठ नेते येतात
मोदींच्या सरकारने यंत्रणांवर दबाव आणून त्यांनी दोन राज्यात आमचं सरकार पाडलं
ही सुद्धा त्यांचीच करतूत आहे
आता देशातली जनात मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल
अग्निपथ योजनेविरोधात युवकही रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले
आमचे नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत
आधीही प्रयत्न केला आहे, आम्हाला त्या विषयावर जायचा नाही
केंद्राने राज्यांचा जास्त ललिचार करायला हवा
-
शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी
अजय चौधरींची शिवसेना गटनेता पदी नियुक्ती
शिवसेना पक्षाचा नविन गटनेता नियुक्ती पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना नेत्यांनी दिले.
झिरवळ यांनी दिले नियुक्तीचे अधिकृत पत्र.
अरविंद सावंत, अनिल देसाई, सुनील प्रभू यांना दिले पत्र.
-
आमदार कैलास पाटील कसे सुटले?
उस्मानाबाद येथील शिवसेना आमदार कैलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी सुरतला नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी वाटेटून पळ काढत
पावसात चालत 4 किमी पायी आले त्यानंतर मिळेल त्या गाडीने मुंबई गाठली
-
शरद पवारांचा उद्याचा पुणे दौरा रद्द
– एकनाथ शिंदेच्या बंडनंतर राजकीय घडामोडींना वेग,
– मुंबईत बैठका असल्यामुळे पवारांनी दौरा रद्द केल्याची माहिती,
– शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या यशवंतराव चव्हाण सेंटरचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार होता
-
महाविकास आघाडीच्या बैठकीत अनेक बडे नेते
महाविकास आघाडीच्या बैठकीत 20 बडे नेते
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय होणार?
-
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर Live
कालपासून सुरू झालेला ड्रामा आम्हाला त्रास देणारा आहे
सेनेला कायम संकटांना सामोरे जावं लागलं
पेडणेकरांना अश्रू अनावर, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन
भाजपच्या कारस्थनाला बळी पडू नका, पेडणेकरांचं शिंदेंना आवाहन
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाकाळात काम करून दाखवलं आहे
एकनाथ शिंदे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत
आम्ही छोटे शिवसैनिक विनंती करतो की त्यांनी तसं करू नये
बाळासाहेबांना या घडामोडींचा त्रास होतोय
-
साताऱ्यात शिवसेनेचं पोवई नाका येथे आंदोलन
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचं ठिय्या आंदोलन….
शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास….
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी पक्ष बदलला तरी जिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहणार….
उद्धव ठाकरेंनी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य…
-
पुण्यात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ लागले बॅनर
उद्धव साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
सुलतानी संकटं शिवसेनेच्या वादळापुढे नतमस्तक होतात
सत्तेसाठी नाही आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत
शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घालत पाठिंबा !
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी पुण्यात शिवसैनिकांची घोषणाबाजी नाना पेठेतील कबीर चौकात नगरसेवक विशाल धनवडे आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना पाठींब्यादेण्यासाठी करतायेत घोषणाबाजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी पुण्यात शिवसैनिकांची घोषणाबाजी
नाना पेठेतील कबीर चौकात नगरसेवक विशाल धनवडे आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी करत आहेत घोषणाबाजी
-
नाशिकमध्ये देखील शिवसैनिकांनी एकत्र येत केली घोषणाबाजी
शिवसैनिकांनी मध्यवर्ती कार्यालय येते जमत केली घोषणाबाजी
आज सेनेत झालेल्या बंडानंतर एकजूट दाखवायचा प्रयत्न
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणबाजी
उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरातील शिवसैनिक शिवाजी चौकात एकत्र येत आहेत
-
मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडावा-नारायण राणे
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
एकनाथ शिंदे यांची भूमिका आज सकाळी बाहेर आली आहे
युती तोडण्याची कारण एकनाथ शिंदे यांना माहिती आहे
शिवसेना हा पक्ष आदेशावर चालतो
शिवसेनेचा अनेकदा अपमान केला गेला
दिलेले शब्द फिरवले गेले म्हणून युती तोडली
सत्तेचा मलिदा ज्यांची चाटला अडीच वर्षे तेच हे लोकं बोलतात
त्यांचं माझं बोलणं झालं आहे बोलणं सुरू आहे
आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार, आम्ही लढणारे लोक आहोत
-
सूरतमधील शिवसेना आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
सूरतमधील शिवसेना आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा देताना दिसून येत आहेत.
-
एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा?
एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली
दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पंधरा मिनिटं चर्चा
मी अजून काहीच केलं नसताना माझ्यावर कारवाई का केली
मी शिवसेनेचं चांगलं चिंततो असेही ते म्हणाले आहेत
मी वेगळा पक्ष काढला नाही, तरी मला गटनेते पदावरून का हटवलं?
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
शिंदे यांच्या सुरक्षेवरून ही गृहमंत्रालयाच्या कारभरावर प्रश्नचिन्ह उपस्थित
संजय राऊत बाहेर जाऊन वेगळं का बोलत आहेत?
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांना रोखठोक सवाल
मला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही, पण हिंदूत्वाच्या मुद्द्यावर युती व्हावी बोलणं यात गैर काय?
बैठक संपल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक मुंबईकडे रवाना
-
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा
फोनवरून बोलणं करून दिल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती
मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरूनच दोघांमध्ये थेट चर्चा
तर दुसरीकडे आमदारांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी बस मागवल्या
-
भाजप नेते नारायण राणे Live
हा संजय राऊतांचा खोटारडेपणा आहे
तिथे गुजरात पोलीस आहेत
तुम्ही इथले पोलीस नाही पाठवू शकत
तुम्ही असं काय कराल तर आम्ही गप्प बसू का
छगन भुजबळांचा नाव लौकीक वाढायला लागला की यांना सहन नाही झाला
मी मुख्यमंत्री झालो की माझ्या मागेच लागले
उद्धव ठाकरे पक्षात तेढ निर्माण करत असल्याचे पत्र मी दिलं होतं
-
भाजप नेते नारायण राणे Live
एकनाथ शिंदे नामधारी नगरविकास मंत्री होते
इतर लोकांना त्यात हस्तक्षेप करायला पूर्ण परवानगी होती
शिवसेनेला कोणी घाबरत नाही
शिवसेना भवनाला प्रचंड गर्दी होती म्हणतात, मात्र पन्नास माणसं नाहीत…
एकूण ५६ लोकांचा गटनेता नको होता, त्यांना आता ११ लोकांचा गटनेता हवा होता
सरकार राहतच नाही, उद्या अविश्वास ठराव आल्याव गेलं सरकार
यांनी वर्षा बंगल्यावर थांबू नये, स्वाभिमान असेल तर वर्षा खाली करा
बाळासाहेबांचं नाव घेतात, त्यांचा एक गुण यांच्यात नाही
जाऊन सजावून सोडचं सोडून कारवाई करायला सुरू केली
उद्या मुख्यमंत्री पद गेल्यावर तुमच्या हातात राहतं काय? लाकडी, टेबल आणि खुर्ची
संजय राऊत यांना कोण विचारतो
ही शिवसेना संजय राऊतांनी संपवली
काय बोलणं झालं ते सांगायचं नसतं
-
भाजप नेते नारायण राणे Live
शिवसेनेच्या आमदारांनी हा त्यागातून केलेला बंड आहे
शिवसेनेचे प्रतिनिधी सूरतला जाऊन शिंदेंना भेटले
याचाच अर्थ शिंदे यांची भूमिका हिंदूत्ववादी विचाराची आहे
अडीच वर्षापूर्वी सत्तेसाठी तडजोड झाली हे त्यांनी सांगितलं
मुख्यमंत्र्यांनी आता एक क्षणही पदावर राहायला नको होतं, ती नैतिकता त्यांच्यात नाही
आपले पस्तीस आमदार फुटल्यावर का राजीनामा देत नाहीत, वाट कशाची पाहताय
मी एकनाथ शिंदे यांचं अभिनंद करतो
आनंद दिघे यांच्याबाबत जे घडले, त्याआधी मोतीश्री त्यांच्याठी बंद होतं
पुन्हा यांचं प्रेम उतू आलं
आता महाराष्ट्रात आघाडी सरकार राहिलं नाही
हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चांगलं झालं आहे.
कोणतही विकास केला नाही, फक्त सुडाच्या भावनेतून कारवाई केल्या
त्या पदाचा मान आणि शानही घालवली
यानंतर महाराष्ट्रात काय घडतंय ते आपण काही तासात पाहू
तुला मुख्यमंत्री बनवतो म्हणून खर्च करायला लावयाचा आणि पुन्हा त्यांनी बनायचं
हे अनेकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत घडलं आहे. म्हणून त्यांनी बंड पुकारला आहे
शब्द द्याचा माहिती नाही, पाळायचा माहिती नाही
-
काँग्रेस नेते एच. के. पाटील Live
एच. के. पाटील काँग्रेस आमदारांची बैठक घेणार
आम्ही संयुक्त बैठक आणि वेगळीही बैठक घेऊ
वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीची तातडीची बैठक सुरू
-
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदावर बंडखोर आमदारांचा आक्षेप
पुरेसे आमदार वर्षावरील बैठकीत नवह्ते तर अजय चौधरी हे गटनेते कसे झाले?
एकनाथ शिंदेंसोबत जास्त आमदार असल्याचा दावा
अजूनही एकनाथ शिंदेच गटनेते असल्याचा बंडखोरांचा दावा
आता गटनेतेपदाच्या पक्षावरील स्वाक्षऱ्या तपासण्याची मागणी
-
शिवसेना नेत्यांची बैठक गुलाबराव पाटलांच्या बंगल्यावर बैठक
शिंदे समर्थक आमदारांची मनधरणी शिवसेनेकडून सुरू
संजय राठोड, संतोष बांगर यांची मनधरणी शिवसेना नेत्यांकडून सध्या सुरू आहे
-
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा डिवचलं
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 21, 2022
-
अजित पवार बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल
महाविकास आघाडीच्या गोटातही अडचणी वाढल्या
महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार कायम
महाविकास आघाडीची तातडीची बैठक वर्षा बंगल्यावर
-
शिवसेना आणि शिंदे गटात विधीमंडळ नेतेपदावरुन घमासान
अजय चौधरींच्या नियुक्तीचं पत्रं सभापतींकडे
-
नेमकं काय चाललंय हेच कळेना-सुप्रिया सुळे
-
सत्ता बदलाच्या हलचाली वाढल्या
-
एकनाथ शिंदे यांचे मिलिंद नार्वेकरांकडे तीन प्रस्ताव
सरकारमधून बाहेर पडा
भाजपसोबत सरकार स्थापन करा
गटनेता मीच राहणार
-
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेही गुजरातमध्ये दाखल
भाजपने फिल्डिंग लावायला सुरू केली
भाजपच्या गोटात अतिशय वेगवान घडामोडी
भाजप आपल्या आमदारांनाही दुसऱ्याराज्यात नेणार
संजय कुटे यांनीही केली एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा
देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत दाखल
-
बंडखोर आमदारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी
एकनाथ शिंदे हेच आमचे गटनेते राहणार
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेचं सरकार बनवा
बंडखोर आमदारांची नार्वेकर आणि फाटक यांच्यापुढे मागणी
बंडखोर आमदारांचा शिवसेनेला मोठा धक्का
एकनाथ शिंदे शिवसेना फोडण्यात यशस्वी?
-
शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांची सेना भवनाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
आपण सर्व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत, ते जो काही निर्णय घेतील, त्याच मार्गावर जाऊ, असे सरवणकर म्हणाले.
-
एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांची बैठक संपली
एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार
एकनाथ शिंदेंच्या मागण्या मुख्यमंत्री मान्य करणार?
एकनाथ शिंदे यांच्या चर्चेत नेमकं काय झालं?
काही वेळात नार्वेकर आणि फाटक हे हॉटेलमधून बाहेर येतील
-
भाजपच्या गोटातल्या हलचाली वाढल्या
भाजपची सत्तास्थापनेची तयारी सुरू
भाजपच्या आमदारांना गोवा किंवा गुजरातला नेणार
दहा ते बारा आमदारांचा पाठिंबा मिळाला तरी सत्तास्थापनेचा दावा करु शकतात
-
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र सरकारला कुठलाही धोका नाही
आज रात्री साडेआठ वाजता मुंबईत बैठक होणार आहे
शरद पवार बैठकीत जातील
त्यानंतर जे काही असेल ते स्पष्ट होईल
-
शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांची प्रतिक्रिया
संध्याकाळी 7 वाजता वर्षावर खासदारांची बैठक आहे
बैठकीला सगळे खासदार उपस्थित राहतील
आता 4 होते , बाकी रस्त्यात आहेत ,
यायला उशीर होईल एकनाथ शिंदे यांची मनधरणी करायला मिलिंद नार्वेकर आणि फाटक गेले आहेत
-
शिवसेनेच्या बैठकीनंतर आमदार दिलीप लांडी यांची प्रतिक्रिया
दिलीप लांडे, आमदार शिवसेना
शिवसेना कडे उद्वव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात संख्याबळ आहे..
सरकारला धोखा नाही आहे.
एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले आहेच.
चर्चा झाली तर तुम्हाला कळवतो..
-
नाशिकमध्ये शिवसैनिकांची फलकबाजी
– उद्धवसाहेब शिवसैनिक तुमच्या सोबत अशा आशयाचे फलक
– फलकावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेच फोटो
-
एकनाथ शिंदेवर आता बोलणं योग्य ठरणार नाही-पंकजा मुंडे
-
‘वेट अँड वॉच, लक्ष ठेऊन आहोत’ – सुधीर मुनगंटीवार
-
अजित पवार हे मुख्यमंत्री ठाकरेंना भेटणार
शरद पवार मुंबईकडे रवाना
लवकरच महाविकास आघाडीचीही बैठक होण्याची शक्यता
सूरतमधील बैठकीनंतर ठाकरे सरकार तरणार का?
एकनाथ शिंदेचा वार ठाकरे सरकार बेजार
-
भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याची थेट मागणी
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत सरकार बनवण्याची मागणी
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोड, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली
शिवसेनेले कोंडीत पकडण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न
-
शरद पवार तातडीने मुंबईला रवाना
लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात चर्चा सुरू
मिलिंद नार्वेकर यांच्या चर्चेतून तोडगा निघाणार?
ठाकरे सरकारवर टांगती तलवार कायम
गटनेता पदावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे आमनेसामने
-
सुरतमधील काही आमदारांचा उद्धव ठाकरेंना फोन
सुरतमधून बाहेर काढण्याची आमदारांची उद्धव ठाकरेंना विनंती
बळजबरीने सुरतला नेल्याची काही आमदारांची तक्रार
महाराष्ट्र पोलिसांना हस्तक्षे करता येणार की नाही?
दुसरीकडे मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट
मिलिंद नार्वेकरांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चेतून तोडगा निघणार का?
-
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
चंद्रपूर:- शिवसेनेच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटविण्यातबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया,
अशा पद्धतीने गटनेते पदावरून हटविण्याचा कायदा नसल्याचे मत,
सध्या शिवसेनेच्या जवळ आमदारांची संख्याच नाही त्यामुळे अशी कृती करता येणार नाही याची करून दिली आठवण,
शिवसेनेला बंडाळीचा मोठा अनुभव असल्याचा घेतला चिमटा,
उद्धव ठाकरे यांच्या या बाबतीतल्या बैठका हा नेहमीचा पॅटर्न असल्याचा लगावला टोला,
आजवर ‘झुकेगा नही’ असे म्हणणारे शिवसेना आमदार आता कुणाला घाबरत आहेत? असा विचारला सवाल,
जीवाला धोका असेल तर शिवसेना आमदार तक्रारी करतील अशी उपरोधिक प्रतिक्रिया
-
सुरतमधील प्रत्येक क्षणाची वेगवान अपडेट Live
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार सुरतमधील हॉटेलमध्ये मुक्कामी
मिलिंद नार्वेकर आणि रविद्र फाटक उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल
काही वेळात बैठकीला सुरूवात होणार
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवरही शिवसेने वॉट ठेवल्याच्याही चर्चा
-
मिलिंद नार्वेकरांना पोलिसांनी एकनाथ शिंदे यांना भेटायला सोडलं
मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक पुन्हा हॉटेलमध्ये दाखल
मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांनाही रोखलं जातं आहे
गुजरातमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त
गुजरात पोलिसांचा मोठा ताफा शिंदे यांच्या सुरक्षेसाठी तैनात
दोघांनाच हॉटेलमध्ये पाठवलं इतर लोकांना गेटवरच रोखलं
-
हॉटेलमध्ये जाताना मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांची तपासणी
दोन्ही नेत्यांची गेटवर तपासणी केली
त्यांना योग्य हॉटेलमध्ये नेलं
मिलिंद नार्वेकर आणि रविद्र फाटक यांचे फोन संभाषण सतत सुरू
हॉटेल ली-मेरिडिअनमध्ये मोठ्या घडामोडी
वाहनांची माहिती पोलिसांना आधीच दिली गेली होती
शिंदेंनी परवागी दिल्याशिवाय नार्वेकरांना भेटता येणार नाही
नार्वेकर आणि फाटक यांच्या गाड्यांची पूर्ण माहिती घेतली जात आहे
-
शिवसेनेचे आणखी दोन आमदार संपर्काबाहेर
उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार नॉट रिचेबल
तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले संपर्काबाहेर
-
मिलिंद नार्वेकर पुन्हा एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलजवळ दाखल
मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक चर्चेसाठी दाखल
कोणत्याही क्षणी एकनाथ शिंदे आणि नार्वेकरांची भेट
उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन नार्वेकर सुरतमध्ये दाखल