
संतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आलाय. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फेव्हीमॅक्स गोळ्या बनावट असल्याचं अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत समोर आलंय. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टार्च पावडरचा वापर या गोळ्यांच्या निर्मितीत करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. विशेष म्हणजे उत्पादन करणारी कंपनीही अस्तित्वात नसल्याचं आता समोर आलंय. कोरोना संकट काळात बनावट औषधे आणि इंजेक्शन विकण्याचे प्रकार आता सर्रास उघडकीस येत आहेत. (Stocks of fake Favimax pills seized in Osmanabad)
काही दिवसांपूर्वी मुबंईत अन्न व औषध विभागाने जप्तीची एक कारवाई केली होती. त्यात बनावट गोळ्यांच्या साठ्याचे धागेदोरे थेट उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. गोपनीय माहितीच्या आधारावर मुंबई इथल्या शिवसृष्टी सर्जीमेड, मेडीटेब वर्डवाईल्ड आणि निरव ट्रेडलिंग या मुख्य वितरकाकडे या बनावट गोळ्यांचा साठा सापडला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यात बनावट गोळ्याची विक्री झाली आहे. कोरोना उपचाराच्या गोळ्यात फेरीपिराव्हीर घटक आवश्यक असतांना चक्क कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टार्चचा उपयोग केला असल्याचं उघड झालंय.
गोळ्या बनवणारी कंपनी मॅक्स रिलीफ हेल्थकेअर ही हिमाचल प्रदेशातील सोलन इथं असल्याचं सांगितलं गेलं. या कंपनीचा पत्ता गोळ्याच्या पाकिटांवर छापण्यात आला होता. मात्र तपास केला असता कंपनीच अस्तिवात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या कंपनीच्या फेविमॅक्स गोळ्या आता उस्मानाबाद जिल्ह्यात विक्री करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक विलास दुसाने यांनी दिली आहे.
उमरगा इथं 300, तर उस्मानाबाद इथं 220 गोळ्याच्या 65 हजार रुपयांच्या स्ट्रिप्स श्रीनाथ इंटरप्रायझेस इथून जप्त करण्यात आल्या आहेत. यात मेडिकल दुकानदारांची चूक नसली तरी त्या गोळ्या जप्त करून विक्री थांबविण्यात आल्याचे दुसाने म्हणाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात या बोगस कंपनीने करोडो रुपयांच्या बनावट गोळ्या विक्री करून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे. अन्न व औषध विभागाने अत्यल्प प्रमाणात साथ जप्त केला असला तरी त्यापूर्वी करोडो रुपयांची बनावट औषधे रुग्णाच्या माथी मारण्यात आली. या बनावट गोळ्यातून रुग्णावर उपचार होण्याऐवजी काहीच परिणाम न झाल्याने अनेक रुग्णाची स्तिथी गंभीर बनल्याचं पाहायला मिळालं.
कोरोनावरील औषधांची अनधिकृतपणे साठेबाजी, गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी; हायकोर्टाने खडसावलं#GautamGambhir #GautamGambhirFoundation #CoronaSecondWave #COVIDEmergencyIndia https://t.co/lwhVi86zHT
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2021
संबंधित बातम्या :
5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, 18 जिल्ह्यातून लॉकडाऊन उठवला, तुमचा जिल्ह्यातील लॉकडाऊन कधी उठणार?
Mumbai Local : ठाण्यातील लॉकडाऊन हटवला, आता लोकल रेल्वे धावणार की नाही?
Stocks of fake Favimax pills seized in Osmanabad