राज्यात लस दिल्यानंतर 7 लोकांमध्ये दिसला परिणाम, अंग दुखणे आणि ताप आल्याची तक्रार

| Updated on: Jan 18, 2021 | 7:43 AM

अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लस मिळाल्याच्यानंतर सात जणांमध्ये स्नायू दुखणे आणि ताप असल्याचं समोर आलं आहे.

राज्यात लस दिल्यानंतर 7 लोकांमध्ये दिसला परिणाम, अंग दुखणे आणि ताप आल्याची तक्रार
कोरोना लसीकरण
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता रुग्णांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लस मिळाल्याच्यानंतर सात जणांमध्ये स्नायू दुखणे आणि ताप असल्याचं समोर आलं आहे. त्यांची प्रकृती ठीक असून सोमवारी म्हणजेच आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती अमरावती इथल्या मंडलायुक्त पीयूषसिंग यांनी दिली. (maharashtra corona vaccination 7 people side effects after vaccination in akola buldana)

सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्ड लस देण्यात आलेल्या तीन जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात, बुलढाणा इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर एकाला रुग्णाला बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा इथं दाखल करण्यात आलं आहे. लस दिल्यानंतर रुग्णांमध्ये होणाऱ्या बदलांवर सध्या अभ्यास केला जात आहे.

कोणताही रुग्ण गंभीर नाही

अमरावतीमध्ये कोव्हिशिल्टची लस दिल्या गेलेल्या रुग्णांचे हात-पाय दुखत असल्याचं समोर आलं आहे. तर त्यांना हलका तापदेखील येत आहे. पण यामध्ये कोणत्याही रुग्णावर गंभीर परिणाम झाल्याचं समोर आलेलं नाही. अमरावतीचे सिव्हिल सर्जन डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लस घेणारी कोणतीही व्यक्ती गंभीर नाही.

ते पुढे म्हणाले की, अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये 100 लोकांना शनिवारी लस देण्यात आली. त्यामध्ये कोणत्याही रुग्णाला गंभीर त्रास झाल्याचं समोर आलं नाही अशीही माहिती सिंह यांच्याकडून देण्यात आली आहे.

25 लोकांना आला ताप

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी आणि पंढरकवडा इथं लस देण्यात आलेल्या 25 जणांना ताप आला असून सर्दी, शरीर दुखणं आणि स्नायू दुखणं असा त्रास होत आहे. पण यामध्ये रुग्णाला कोणताही धोका नसून त्यांना तात्काळ घरी सोडण्यात येणार आहे.

सिंह पुढे म्हणाले की, अकोल्यामध्ये लस दिलेल्या 18 जणांना अंग दुखण्याची तक्रार अनेकांनी केली होती. त्यामध्ये तीन जणांना जास्त ताप आला होता. अशा रुग्णांना ताप आणि डोकेदुखीमुळे जीएमसीएचमध्ये दाखल केले. अधिक माहितीनुसार, अमरावतीमध्ये लसीकरणानंतर 20 लोकांना हलका ताप आला आणि स्नायूंचा त्रास झाला. त्यांच्यावर ओपीडीमध्ये उपचार करण्यात आले. (maharashtra corona vaccination 7 people side effects after vaccination in akola buldana)

संबंधित बातम्या – 

कोविन अ‌ॅपमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला स्थगिती, गैरसमज पसरवू नका, किशोरी पेडणेकरांचे आवाहन

Covaxin लसीचे दुष्परिणाम आढळल्यास भरपाई, भारत बायोटेकची मोठी घोषणा

(maharashtra corona vaccination 7 people side effects after vaccination in akola buldana)