CJP Funding : सीजेपीला पहिला सर्वात मोठा दणका, ईडीनं अखेर तातडीने…पडद्यामागे मोठ्या हालचाली!

परदेशातून देणगी घेणाऱ्या राज्यातील सीजेपीसह इतर संस्थांचीही सखोल चौकशी सुरू झाली आहे. या संस्थांचे खाते तपासले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

CJP Funding : सीजेपीला पहिला सर्वात मोठा दणका, ईडीनं अखेर तातडीने...पडद्यामागे मोठ्या हालचाली!
cjp and abhijeet dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2026 | 5:53 PM

CJP Funding : कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने दिल्लीत उभारलेल्या आंदोलनाची फक्त भारतच नव्हे तर जगभरात चर्चा झाली. या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारला बॅकफुटवर जावे लागले. याच आंदोलनाचा दबाव वाढल्याने धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. फक्त भारतच नव्हे तर इतर देशातील तरुणाईनेही या सीजेपीच्या आंदोलनाचे कौतुक केले. भारतातील जेन झी तरुणांनी तर सक्रियपणे सहभागी होत सरकारला धारेवर धारलं. दरम्यान आता हे आंदोलन संपल्यानंतर सीजेपीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सीजेपीला परदेशातून दिल्या जाणाऱ्या देणगीची चौकशी केली जाणार आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

सीजेपीला कथितपणे मिळालेल्या परदेशी देणगीविषयी राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हे आंदोलन संपल्यानंतर आता राज्य सरकारकडून तसेच केंद्रात ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलंय. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. राज्यमंत्री ‘CJP सह काही संस्थांच्या फॅारेन फंडिंगची चौकशी सुरु झालेली आहे. महाराष्ट्रात गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडून ही चौकशी केली जात आहे. परदेशातून देणगी मिळवणे यात गैर नाही. पण त्याच देणगीचा देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी गैरवापर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार,’ असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला आहे.

इतर संस्थांचीही सखोल चौकशी सुरू

परदेशातून देणगी घेणाऱ्या राज्यातील सीजेपीसह इतर संस्थांचीही सखोल चौकशी सुरू झाली आहे. या संस्थांचे खाते तपासले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला परदेशातून देणगी येत असेल आणि त्याचा चुकीचा वापर केला जात असेल तर हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, आता सीजेपीच्या देणगीची चौकशी सुरू झाल्यानंतर आता त्यातून नेमकं काय समोर येणार? सीजेपीच्या अडचणी वाढणार की सरकार तोंडावर आपटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us