Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते मिळतील-मुनगंटीवार
Eknath Shinde vs Shiv sena Live, Maharashtra Politics, Maha new CM Updates : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, शपथविधी सोहळा

मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आज भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यपालांना नवं मंत्रीमंडळ स्थापन करण्यासाठी पत्र देण्याची शक्यता आहे. गोव्यातून आज शिंदे गट मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पोलिस बंदोबस्त एकदम कडक ठेवण्यात आला आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगुंटीवार आणि भाजच्या अनेक नेत्यांनी पेठे वाटून आनंद साजरा केला आज सुध्दा राजकीय महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता अधिक आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर Maharashtra Government Formation LIVE Updates : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, समर्थकांची गर्दी, भाजपचे नेते विमानतळावरती दाखलआरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते मिळतील-मुनगंटीवार
मुंबई- आजच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. सध्या युतीकडे १७० पेक्षा जास्त संख्याबळ आहे. तसेच या निवडणुकीत व्हीप लागू होत नसतो, तसेच या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदारही युतीच्या विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने असतील असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
-
शिंदे गट आणि भाजपा आमदारांची बैठक संपली
शिंदे गट आणि भाजपा आमदारांची बैठक संपली. कायदेशीर बाजू भक्कम असल्याने उद्या सभागृहात लढली जाईल. असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. उद्याच्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवड होणार आहे. ती व्यवस्थित होईल, असे राम कदम यांनी सांगितले आहे. सत्ताधाऱ्यांकडे 166 जणांचे संख्याबळ असल्याचा दावाही करण्यात आला आहे. कुठलीही नाराजी या बैठकीत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
-
-
राज्यातलं नवं सरकार शिवसेना आणि भाजपाचं-फडणवीस
मुंबई- राज्यातील नवे सरकार हे शिवसेना आणि भाजपाचे आहे, असे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आणि भाजपा आमदारांच्या एकत्र बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
-
ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदारांची महत्त्वाची बैठक
मुंबई- एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर, हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक पार पडते आहे. शिंदे आणि फडणवीस या आमदारांना संबोधित करीत आहेत.
-
एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेवर दावा करू शकत नाहीत
शिंदे यांना पक्ष विलीन करण्याशिवाय पर्याय नाही
लोकसभा माजी सचिव PDT आचार्य यांची प्रतिक्रिया
Live law चे संपादक मनू सेंबस्तीयन यांना दिलेल्या मुलाखतीत आचार्य यांची माहिती
एकनाथ शिंदे यांना आपणच मूळ शिवसेना आहोत असा दावा करता येणार नाही – आचार्य
शिंदे यांची याचिका ग्राह्य धरली जाऊ शकत नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट काय निर्णय घेणार ??
-
मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना गाडीतून उतरून अभिवादनही केलं
-
आम्ही सहज बहुमत सिद्ध करू-मुख्यमंत्री
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर पडले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये जाताना बाहेर पडले. त्यांनी सर्वांना अभिवादन केलं आहे. कार्यकर्त्यांकडून ढोल, ताशे लावून स्वागतही करण्यात आलं आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेल ताजमध्ये दाखल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेल ताजमध्ये दाखल झाले आहेत. फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात राजकीय भूकंप घडवणारे आमदार अकेर मुंबईत दाखल झाले आहेत.
-
भाजप आमदार प्रसाद लाड हे आमदारांच्या स्वागताला विमानतळावर
भाजप आमदार प्रसाद लाड हे आमदारांच्या स्वागताला विमानतळावर पोहोचले आहेत. त्यांनी आमदारांशी संवाद साधला आहे. आता विमानतळावरून ते हॉटेलवर जाणार आहेत.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात…
शिवसेना भाजप युतीचे राहुल नार्वेकर हे प्रचंड बहुमताने विजयी होतील. उद्या,, परवाचा दोन दिवसांचा कार्यक्रम आहे. आता काय औपचारिकता उरली आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
-
छत्रपती संभाजीराजे आज एकनाथ शिंदे यांना भेटणार
मुंबई- छत्रपती संभाजी महाराज आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. मराठा आरक्षणसह समाजातील विविध प्रश्नांसाठी हे भेट होणार आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याआधीच घेतली आहे.
-
शिंदे गटाचे आमदार थांबलेल्या हॉटेलमधून तिघांना अटक
शिंदे गटाचे आमदार हे गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबले होते. याच हॉटेलमधून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांकडे खोटी ओळखपत्रं आढळून आल्याने ही कारवाई केली आहे.
-
भाजप आमदारही आज हॉटेल मुक्कामी असणार
-
मुंबईत हॉटेल ताजबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त
मुंबईत ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांना ठेवण्यात येणार आहे, त्या हॉटेल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यात आलीय.
आमदारांच्या विमानातला व्हिडिओही पाहा
-
काही वेळात आमदारांचं विमान हे मुंबईत दाखल होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार काही वेळातच राजधानी मुंबईत दाखल होतील. मुंबई विमनतळावर आमदारांना घेण्यासाठी बसेस दाखल झाल्यात आहेत.
-
पक्षानं दिलेला व्हीप पाळावाच लागतो-शरद पवार
पक्षाने दिलेला व्हीप हा पाळावाच लगतो. पक्ष म्हणजे दोन तीन भाग असतात. एक म्हणजे विधीमंडळाचा भाग आणि दुसरा पक्ष…याचा निर्णय हा कोर्टात होईल. शेवटी सभागृहाचे अध्यक्ष हा त्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सभागृह अध्यक्षांची भूमिका ही महत्वाची राहणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
-
भाजप आणि शिंदे गटाची आज संयुक्त बैठक
-
आमदार गोव्याहून निघाले, मुंबईत तयारी जय्यत
बंडखोर आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गोव्याहून मुंबईकडे येत आहेत. या आमदारांसाठी मुंबईतही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईत विमानतळाला सध्या पोलीस बंदोबस्ताने छावणीचं स्वरुप आलं आहे. तसेच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरवरही बंदोबस्त लावण्यात आला आहे. आमदारांसाठी याठिकाणी विशेष कॉरिडोर तयार करण्यात आलाय.
मुख्यमंत्र्यांची गोवा विमानतळावरील प्रतिक्रियाही पाहा
-
अण्णा हजारे आणि एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ कॉल
अण्णा हजारे आणि एकनाथ शिंदे यांची व्हिडिओ कॉलवरून चर्चा झाली आहे. यावेळी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्याकडे नव्या सरकारला आशीर्वाद देण्याची विनंती केली आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
या आमदारांना मुंबईत आणायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोव्यात गेले होते. तर शिवसेनेने जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांंचं संख्याबळ आहे, उद्या आम्ही बहुमत सिद्ध करणार आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोवा विमानतळावरून निघताना दिली आहे.
-
काही वेळात शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल होणार
-
शिंदे गटाचे आमदार गोवा विमानतळावर दाखल
एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोवा विमानतळावर दाखल झाले आहेत. ते काही तासात आता मुंबईत पोहोचणार आहेत. बंड केल्यानंतर पहिल्यांदाच हे आमदार मुंबईत येत आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलीस सलामी पथकाची रंगीत तालीम
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यातील घडामोडींना वेग आला आहे . सकाळपासूनच पोलीस प्रशासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन सुरक्षेचा आढावा घेत होते . आज ठाणे पोलिसांमार्फत सलामी पथक देखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून सलामी परेडची रंगीत तालीम सुरू आहे .
-
शिंदे गटाचे आमदार मुंबईकडे रवाना
एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोव्यातून मुंबईकडे रावाना झाले आहेत. बंडखोरी केल्यापासून पहिल्यांदाच हे आमदार मुंबईत येत आहे. मुंबईतही त्यांना कडेकोड सुरक्षेत ठेवण्यात येणार आहेत.
-
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक
जयंत पाटलांनी बोलावली बैठक
10 वाजता राष्ट्रवादी आमदारांना एकत्र केलं जाणार
बैठकीत आमदारांना दिल्या जाणार सूचना
बैठकीतचं आमदारांना व्हीप बजावला जाणार
पक्षाचे प्रतोद अनिल पाटील बजावणार व्हीप
उद्या सकाळी विधानभवनात हजर राहण्याचे आदेश
सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती
-
सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
मंत्रिमंडळ शपथविधीची तारीख अद्याप ठरली नाही. 18 जुलैपूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, अधिवेशन 18 जुलैपासून असणार आहे.
– अमरावतीची घटना चिंताजनक आहे. NIA ने चौकशी केल्या नंतर सत्य बाहेर येईल.
– मागच्या सरकारनं या घटनेला दाबण्याचा प्रयत्न केला असेल तर ते अधिक चिंताजनक आहे.
– मतासाठी लाचारी, खुर्चीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर या गोष्टी झाल्यात की नाही हे चौकशीअंती बाहेर येईल.
-
शिंदे गटाचे आमदार 4.30 च्या सुमारास गोव्यातील ताज हॉटेल मधून बाहेर पडणार
आमदारांच्या बस मधूनच एकनाथ शिंदे विमानतळा पर्यंत जाण्याची शक्यता
पोलीस बंदोबस्तात आमदारांना विमानतळापर्यंत नेल जाणार
बंडखोर आमदार तब्बल 11 दिवसा नंतर मुंबईत परतणार
ताज हॉटेल बाहेरील हालचाली वाढल्या
-
भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिक्रिया
– उद्याची विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आम्ही जिंकणार,
– आमच्याकडे बहुमत असल्यामुळे राहुल नार्वेकर नक्कीच अध्यक्ष होणार,
– देवेंद्र फडणवीस यांनी काल आमच्या सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं, कुणाचीही नाराजी नाहीये,
– मंत्रिपदाची अजून काही चर्चा नाही, सातारा जिल्ह्याला संधी देण्याचा देवेंद्र फडणवीस यासंदर्भात निर्णय घेतील.
-
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे Live
आगामी निवडणूक ही चांगल्या जोमाने लढण्याबाबत आज चर्चा झाली आहे. सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केलं. मी मराठवाडा पाहतो. बंडखोरांचं लक्ष तिकडे असले तरी लोकांंचं मत हे उद्धव ठाकरेंच्या बाजुने आहे. अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. आम्ही सर्व प्रमुख मंडळी पक्ष मजबुतीने पुढे नेण्याासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहोत. कुणीही आमच्यातून फुटून जाणार नाही.
-
किरीट सोमय्या यांनी आरे मेट्रो कारशेडला दिली भेट
आरे कारशेडला भेट देण्यासाठी आलेले भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, आज आपण मुंबईच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या आरे कारशेडला भेट दिली आहे. मुंबईतील आरे येथे बांधण्यात येणारे मेट्रो कारशेड महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांचे सरकार येताच त्याच कामाला पुन्हा एकदा आरेमध्ये कारशेड बांधण्यास हिरवा झेंडा दाखवण्यात आला. काही दिवसांत पुन्हा कामाला सुरुवात होणार असून, येत्या ७ महिन्यांत हे काम पूर्ण होईल, आणि पुन्हा 1 वर्ष मध्ये मुंबईची मेट्रो धावू लागेल, उध्दव ठाकरे सरकारने मेट्रोचे काम बंद केले होते, एवढेच नाही तर मेट्रोची सर्व लाईन बंद केली होती, मेट्रोचे सर्व काम ठप्प झाले होते, अशी प्रतिक्रिया यावेळी सोमय्या यांनी दिली आहे.
-
जळगावात बंडखोरांविरोधात शिवसेनेचा भव्य आक्रोश मोर्चा
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमंत्रित आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले, जळगावातही मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदारांनी बंडखोरी केल्याने या निषेधार्थ जळगावातील शिवसैनिक संतप्त झाले असून या पार्श्वभूमीवर जळगावात आज बंडखोरांच्या निषेधार्थ व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवतीर्थ मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली आहे.
-
शिवसेना खासदार संजय राऊत LIVE
काही लोक गेली आहे, पक्ष अजूनही जाग्यावर आहे. ठाण्यातूनही काही लोक उद्धव ठाकरे यांना भेटून गेले. आणखी काही बैठका या जिल्हा स्तरावर घ्यायचं ठरलेलं आहे. त्या आम्ही घेऊ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
-
आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना पक्षप्रतोद व्हीप बजावणार आहेत. याची कायदेशीर लढाई कोर्टात सुरूच राहणार आहे. तसेच पक्षसंघटन अधिक मजबूत करणार आहोत. त्यासाठीच आजची बैठक होती, तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आक्रमक भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रियाही सचिन अहिर यांनी दिली आहे.
-
गोव्याहून रात्री आमदार मुंबईत येणार
गोव्याहून शिंदे गटाचे आमदार आज रात्री ८ वाजता मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिथून त्यांना मुंबईतील ताज प्रेसिडेंसी हाॅटेलमध्ये नेण्यात येणार आहे. ऊद्या सकाळी आठ वाजता भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांसोबत महत्वाची बैठक होणार, यानंतर विधानभवनात यांना एकत्र नेण्यात येणार आहे. शिवसेनेकडून कोणतीही घटना घडू नये यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही अलर्ट मोडवर राहण्याचे पक्षाचे आदेशही आहेत.
-
शरद पवार लाईव्ह
शरद पवार लाईव्ह
गेल्या अनेक वर्षांपासून कुस्तीगीर परिषदेचे काम करत आहे – पवार
खेळाच्या संघटनेत कधी राजकाणर आणत नाही – पवार
खेळाच्या संघटनेत विविध पक्षाचे लोक असतात – पवार
आम्ही सर्व एका विचाराने काम करतो
कुस्तिगीर संघटनेत सुधारणा करण्यात विलंब झाला.
त्यात सुधारणा करता आली असती. पण केली नाही. पण यात राजकारण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा याच्याशी काहीच संबंध नाही.
-
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याच पाठवलेलं पत्र बेकायदशीर
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याच पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. त्यांनी ऐकलं नाही तर पुढील भूमिका घेऊ..सभागृहाच्या नेत्याचा अपमान होतो तेव्हा हक्कभंग येतो. इतकं हे पद महत्वाचं आहे. त्यांच्या पक्षांला हे शोभणार नाही. ही कृत्य लोकशाहीला शोभादायक नाही.
पक्षांकडून आता प्रतिज्ञापत्र घेतली जात आहेत. लोकांना प्रेमानं बांधव लागत. प्रेमाचं बंधन बाळासाहेबानी आम्हाला बांधलं. प्रतिज्ञापत्र देणं म्हणजे कार्यकर्त्यावर अविश्वास दाखवत आहात. नाती जपण्यासाठी गोडी आहे. किती तणाव याला मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे उत्तर आहे. आमची लढाई कर्तव्याची लढाई लढत आहोत. महाराष्ट्रात विकास झाल्यावरच आम्ही आनंदोत्सव साजरा करू.
आमच्या बैठकीमध्ये राजकारणावर नाही तर विकासाच्या गोष्टीवर चर्चा होत असतात. देवेन्द्र फडणवीस मंत्रिमंडळात असणं म्हणजे मोठी ताकद मिळाली आहे. शिवसेना आणि भाजप ची मन जुळली पाहिजेत. भाजपपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी जवळची वाटत असेल तर भ्रम दूर होईल.
-
छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव / श्री करण पंढरीनाथ गायकर यांची निवड
छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव / श्री करण पंढरीनाथ गायकर यांची निवड
स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या अधिकृत प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव / श्री करण पंढरीनाथ गायकर यांची निवड करण्यात आली. विस्थापितांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शांवर चालत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला संघटित करण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे.
डॉ. धनंजय जाधव व / श्री करण पंढरीनाथ गायकर यांनी मराठा आरक्षण, अनेक सामाजिक आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. तसेच समाजातील वंचित व सोशिक घटकांसाठी ते गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
-
शिवसेना भवनमध्ये महत्वपूर्ण बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
मुंबई- शिवसेना भवन मध्ये शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक
दुपारी साडेबारा वाजता बैठक
बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
जिल्हा संपर्कप्रमुख यांची बैठक
-
भाजप आणि शिंदे गट आमदारांची संयुक्त बैठक होणार
आज संध्याकाळी सात वाजता भाजप आणि शिंदे गट आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे. ताज प्रेसिडेंट येथे सयुक्त बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
-
गिरे तो भी टांग उपर अशी संजय राऊत यांची अवस्था, दरेकरांचा टोला
गिरे तो भी टांग उपर अशी संजय राऊत यांची अवस्था, दरेकरांचा टोला
कोविडच्या काळात चुकीचे केसेस तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी लावलेले होते. संजय पांडे हे सगळं सूडबुद्धीने कारवाई करत होते. गिरे तो भी टांग उपर अशी संजय राऊत यांची अवस्था आहे. त्यांना कोण विचारत नाही आत्ता. महाविकास आघाडी मध्ये तरी देखील समन्वय नाही आहे. किती काही झालं तरी आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे जिंकून येतील. संजय राऊत यांचा पहिलं शपथ पत्र घ्या. कारण ते शरद पवार यांच्या कुशीत जाऊन बसलेले आहेत. ते कधीही राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतील त्यानंतर शिवसैनिकांचे शपथपत्र घ्या.
-
पिंक रंगाचा व्हीप काढला जाणार, महाविकास आघाडीकडून एकच अर्ज भरणार – बाळासाहेब थोरात
- बाळासाहेब थोरात
- पिंक रंगाचा व्हीप काढला जाणार
- महाविकास आघाडी कडून एकच अर्ज भरणार
-
दिपाली सय्यद यांची शिवसैनिकांना भावनिक आवाहन
@ShivSena pic.twitter.com/JW0FocdktI
— Deepali Sayed (@deepalisayed) July 2, 2022
-
विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवींना महाविकास आघाडीकडून उमेदवारी
विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवींना महाविकास आघाडीकडून उमेदवारी
राजापूरचे ते आमदार आहेत, महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते आज विधानभवनात दाखल झाले आहेत
बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे.
-
जळगावात आज बंडखोरांच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने भव्य आक्रोश मोर्चा
जळगावात आज बंडखोरांच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने भव्य आक्रोश मोर्चा
माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पाच बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचा एल्गार
आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
दुपारी दोन वाजता शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून आक्रोश मोर्चाला होणार सुरुवात
जळगाव जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर या आक्रोश मोर्चात एकही आमदार किंवा बडा नेता नाही
केवळ जिल्हा संपर्कप्रमुख व शिवसैनिकांच्या नेतृत्वातच होणार हा आक्रोश मोर्चा
-
गजानन काळेंच्या ट्विटची चर्चा
नवाब सेने कडून उरलेले खासदार,आमदार,नगरसेवक,पदाधिकारी यांच्याकडून आता निष्ठेचं प्रतिज्ञापत्र…??
कधी शिवबंधन… तर कधी शपथा आणि आता काय ते प्रतिज्ञापत्र…?
संजय राऊत यांच्या थोबाडाला चिकटपट्टी लावली तरी पुरेसं आहे… म्हणजे हे उद्योग करायची गरज पडणार नाही…#शिल्लकसेना
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 2, 2022
-
विधानसभा अध्यक्षपदासाठी आज शिवसेना अर्ज दाखल करणार
विधानसभा अध्यक्षपदासाठी आज शिवसेना अर्ज दाखल करणार
-
शिवसेनेतून कारवाई केलेल्या माजी महापौर नरेश यांनी चक्क उद्धव ठाकरे यांचे फोटो बॅनर वर लावले
- शिवसेनेतून कारवाई केलेल्या माजी महापौर नरेश यांनी चक्क उद्धव ठाकरे यांचे फोटो बॅनर वर लावले.
- गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा म्हणत आपलाच नरेश म्हस्के बॅनर वर उल्लेख..
- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे केले अभिनंदन
- तर बॅनर वर बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे,नरेंद्र मोदी,अमित शहा ,देवेंद्र फडणवीस यांचे देखील फोटो
-
स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ता पदी करण गायकर यांची निवड
#स्वराज्य संघटनेच्या “अधिकृत प्रवक्ता” म्हणून श्री करण गायकर व श्री धनंजय जाधव यांची नियुक्ती केली. pic.twitter.com/FrRaAJeJjl
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 2, 2022
-
शरद पवार भरणे यांच्या निवासस्थानी येणार
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भरणे यांच्या निवासस्थानी येणार आहेत. भरणे यांच्या मोतोश्रींचे काल पहाटे झाले होते दिर्घ आजाराने निधन झाले. गिरजाबाई विठ्ठल भरणे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी झाले निधन झाले आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे पवारांचे विश्वासू व अत्यंत जवळचे मानले जातात. आज 11:30 वाजता पवार साहेब इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील भरणे यांच्या निवासस्थानी घेणार भेट..
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live
कालच आमची बैठक झाली आहे. यात पीक पाण्याचा आवाहल यावरही चर्चा झाली आहे जनचेच्या हिताचे निर्णय घेण्यावर आमचा भर राहिल, कुणाचेही नुकासान आम्ही होऊ देणार नाही. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र बनवण्यावर आमचा भर राहणार आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live
आपत्ती व्यवस्थानपनाची एक बैठक आयोजित केली होती. सर्व विभागातील अधिकारी या बैठकीला होते. कोणतेही जिवीत आणि मालमत्तेचे नुकासान होऊ नसे यासाठी काय तयारी करावी हे सांगितलेलं आहे. अनेक टीमही त्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांचं नुकसान होणार नाही. लोकांना सुरक्षित स्थळी पाठवणं, तसेच जेवणाची राहण्याची व्यस्था करण्याच्याही सूचना दिल्या आहे. कुणाचीही गैरसोई होणार नाही. याची काळजी घेतली आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
अपत्तीच्या वेळी काय उपयोजना केल्या जाव्यात याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आहे. सर्व विभागातील प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नोटीसा देऊन बिल्डिंग पडली तर बॉर्ड ऑफीसवर कारवाई करण्यात येईल.
-
विधानसभा अध्यपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होईल
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. माविआ सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आवाजी मतदान पद्धतीने निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच या निवडीवेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ राहतील आणि त्यांच्या उपस्थितीत ही निवडूक पार पडेल.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live
मेट्रोचं बरेच काम झालं आहे. मात्र कारशेडचं काम झाल्याशिवाय मेट्रो सुरू होऊ शकत नाही. मागच्या सरकारने जागा बदलल्याने हे काम रखडलं आहे. आमच्या सरकारने सुरू केलेलं आरेतलं काम हे 25 टक्के पूर्ण झालं आहे. त्यामुळे मेट्रो लवकर सेवेत आणयची असेल तर मेट्रोचं कारशेड ही आरेमध्येच व्हावं, अशी आमची इच्छा आहे. मी उद्धव ठाकरे यांनाही इगो बाजुला ठेवण्याची विनंती केली, त्यांचा निर्णय हा चुकीचा होता, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
-
भाजपची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक
भाजपच्या सर्व आमदराच्या बैठकीला साडे पाच वाजता ट्रायडेंट येथे सुरुवात होणार आहे. दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आणि विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील.
-
विवेक फणसाळकर यांची प्रतिक्रिया
मुंबई समोर अनेक आव्हानं आहेत. ती सोडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्या अनुषगाने आज मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक आहे. या बैठकीसाठी सर्व विभागाना बोलावण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया विवेक फणसाळकर यांनी दिली आहे.
-
देवेंद्र फडणवीसांनी घेतली आढावा बैठक
ओबीसी आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात एक बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले. प्रवीण दरेकर,डॉ. संजय कुटे,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
फडणवीसांची ट्विटरवरून माहिती
ओबीसी आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात एक बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले.
प्रवीण दरेकर,डॉ. संजय कुटे,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.@Dev_Fadnavis @mipravindarekar @DrSanjayKute#OBC #OBCreservation pic.twitter.com/EoQFB6ubLQ— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 1, 2022
-
देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा स्वीकारला पदभार
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी प्रविण दरेकर आणि भाजप आमदार उपस्थित होते. फडणवीस हे आज मंत्रालयात दाखल झाले आणि त्यांनी कामकाजही सुरू केलं आहे. -
दुपारी बारा वाजल्यापासून संजय राऊत ईडी कार्यालयात
दुपारी बारा वाजल्यापासून शिवसेना खासदार संंजय राऊत यांची ईडी चौकशी सुरू आहे. ईडीवर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया ईडी चौकशीला जाताना संजय राऊतांनी दिली आहे.
-
नागपुरात देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे लागले भावनिक होर्डिंग
प्रिय देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार, तुझ्या पुढे आम्ही खुजे खुजे आहोत, तुला आमचा सलाम, अश्या आशयाचे लावण्यात होर्डिंग आले आहेत. देवेंद्र जी मुख्यमंत्री व्हावे ही आमची अपेक्षा होती, मात्र त्यांनी स्वतःच्या गळ्यातील माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकली, त्यामुळे फडणवीस यांची यामुळे मोठी उंची वाढली, फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी महापौर संदीप जोशी यांनी असे होर्डिंग लावले आहेत.
-
मुख्य सचिवांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू
-
राज ठाकरेंच्या फडणवीसांना शुभेच्छा
श्री. देवेंद्र फडणवीस उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!
प्रिय देवेंद्रजी,
सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो….
तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!
आता जरा आपल्यासाठी
ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.
एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!
आपला मित्र
राज ठाकरे
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना
-
शिंदे समर्थकाकडून ढोल ताशा वाजवत जल्लोष
मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर आज देखील त्याच्या निवासस्थाना बाहेर शिंदे समर्थकाकडून ढोल ताशा वाजवत जल्लोष साजरा केला. यावेळी लाडू देखील वाटप करण्यात आले. शिंदे यांचे बंधू सुभाष शिंदे हे देखील या जल्लोषात सामील झाले होते.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live
-
मंत्रिपदावरून शिंदे गटात रस्सीखेच सुरू
-
नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर टिका
बाळासाहेबांच्या पुत्रानं जे केलं नाही ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलंय सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनवला. देवेंद्र फडणवीसांचा यामागे खूप मोठा त्यागा आहे. महाराष्ट्रावरचं संकट आता दूर झालंय. हनुमान चालीसा कोणी म्हणणार असेल तर आता राजद्रोह होणार नाही जेलमध्ये बसावं लागणार नाही. माझा कोणाशी वैयक्तिक संघर्ष नव्हता महाराष्ट्राशी हा संघर्ष होता, पण आता संकट दूर झालंय, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.
पाहा व्हिडिओ
-
काही वेळापूर्वीच पंकजा मुंडे यांनी घेतली फडणवीसांची भेट
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच अनेक नेते मंडळी ही त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहे.
-
वाटाघाटीच्या बैठका सुरू असल्याने फडणवीसांची अनुपस्थिती, भाजपचं स्पष्टीकरण
-
भाजपच्या नेत्यांचा जल्लोष, फडणवीस मात्र अनुपस्थित
मी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो. त्यांनी पार्टीच्या आदेशाचा मान ठेवला. अशी प्रतिक्रिया यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. अंतिम रांगेत बसलेल्या माणसाच्या आयुष्यात खुशी भरणं हाच आमच्या पार्टीचा संकल्प आहे. मात्र काही लोकांना मुंबई त्यांची पॉपर्टी वाटते, असे म्हणत त्यांनी शिवसेनेलाही टोला लगावला आहे.
मुंबई महापालिकेतही आपलीच सत्ता आली पाहिजे. पूर्ण शक्तिनिशी आपल्या प्रभागात काम करा. मुंबईत सत्ता परिवर्तन होईल.
-
नवनीत राणा व रवी राणा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. कालच ते उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
भाजप नेते किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया
मी आता देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली भेट घेऊन त्यांच अभिनंदन केलं. ठाकरे सरकार आल्यावर पहिला निर्णय घेतला होता मेट्रो प्रकल्प बंद केले मात्र आता फडणवीस आणि शिंदे सत्तेत येताचं मेट्रो प्रकल्प पुन्हा सुरू करणार अशी घोषणा केली. संजय राऊतांना हे पाचवं समन्स आहे. पहिल्यांदा 72 लाख रुपये परत केले त्यात काय गडबड केली. तपासणी होऊन कारवाई होईल. संजय पाटकरांचंही नाव यामध्ये आहे त्यांच काय असं विचारताचं आधी यांच तरी होऊ द्या मग बघा अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पुढे नेतील.
-
अमित शाहांनी माझा शब्द पाळला असता, तर हेच सरकार शानदारपणे आलं असतं.
- अमित शाहांनी माझा शब्द पाळला असता, तर हेच सरकार शानदारपणे आलं असतं.
- शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मुख्मयंत्र्यांची सही, मग पक्षप्रमुखांची सही, मग आमच्या कराराप्रमाणे हे पत्र फ्रेम करु मंत्रालयात लावा..म्हणजे सगळ्यांना कळलं असतं..
- माझं ऐकलं असतं, तर अडीचवर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, आता तर पाचही वर्ष होणार नाहीये..
- महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा ऋणी आहे. अनपेक्षित आल्यानंतर तो पद सोडताना क्वचितच लोक रडतात, तुमच्या डोळ्यात जे अश्रू आहेत, तीच माझी ताकद, त्याच्याशी प्रतारणा करणार नाही, गद्दारी करणार नाही
- विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांचा पुत्र उतरवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचा हा अट्टाहास त्यांनी केला.. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही… हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे..
-
माझा राग मुंबईवर काढू नका, मेट्रो कारशेडवर उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं विधान
माझा राग मुंबईवर काढू नका
मेट्रो कारशेडवर महत्त्वाचं विधान
कांजूरचा प्रस्ताव आहे, त्यात अहंकार नाही
माझा राग मुंबईवर काढू नका
आरेचा आग्रह उगाच रेटू नका
पर्यावरणाची हानी करणारा निर्णय घेऊ नका -
उद्धव ठाकरेंचा पहिला प्रश्न….
पहिला प्रश्न – ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, आणि ज्याने हे सरकार स्थापन केलं, कथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. हेच मी अमित शाहांना सांगत होतो, अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री व्हावा, आताची जोडगोळी अशीच अडची वर्ष झाला असतो.. पहिल्या अडीच वर्षात याचा नाहीतर त्यांचा मुख्यमंत्री जाला. मग आता असं का केलं.. लोकसभा विधानसभेत एकत्र होतो. मग मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनायला लावलं… आता जे केलात ते तेव्हाच केलं असतं तर मविआ जन्मालाच आला नसता.. पाठीत वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही… हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.. पहिल्या प्रथम तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल.. पण मुंबईच्या पाठीत वार खुपसू नका..
-
शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही – उद्धव ठाकरे
बऱ्याच दिवसांनंतर आपण असे फेस टू फेस भेटतोय. दोन अडीच वर्ष एफबी लाईव्हमधून संवाद साधला. तुम्हाला माझ्याकडून राजकीय प्रतिक्रिया हवी असेल. नवनिर्मित सरकारचं कालच अभिनंदन केलंय. सरकारकडून भलं व्हावं, असंही म्हटलंय. दोन तीन विषय मांडू इच्छितो.
-
किरीट सोमय्या सागर बंगल्यावर दाखल
किरीट सोमय्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. ठाकरे पिता पुत्रांनी ज्या प्रकल्पाची वाट लावली तो प्रकल्प पुन्हा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कारशेडवरून ठाकरेंवर टिका केली. महाराष्ट्र आता भ्रष्टाचारमुक्त होणार दिली अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
आज ताज हॉटेलमध्ये आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते कृषी दिन साजरा केला
आज ताज हॉटेलमध्ये आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते कृषी दिन साजरा केला
आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याची शपथ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली
सातारा सारख्या भागातून आलेल्या मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांच्या व्यथा माहिती आहेत
केवळ कर्ज माफ करून काही होणार नाही तर त्यांना आधार दिला पाहिजे
-
उस्मानाबादचे धाराशिव नामकरण वाद पेटला, राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकारी यांचे सामूहिक राजीनामे
उस्मानाबादचे धाराशिव नामकरण वाद पेटला, राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकारी यांचे सामूहिक राजीनामे
उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज, जयंत पाटील यांना पत्र लिहून दिले राजीनामे
नामांतरणला राष्ट्रवादीने विरोध केला नाही, शरद पवार यांना नेहमी साथ दिली मात्र नामांतरण मुस्लिम समाजाच्या जिव्हारी लागले
अल्पसंख्यांक प्रदेश सचिव मसुद शेख, 5 नगरसेवक, जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी दिले सामूहिक राजीनामे
-
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत होतं अचानक निर्णय आला – जयंत पाटील
धक्का तंत्र आहे मला दिसत नाही. ज्या पद्धतीने सता मिळविण्यासाठी प्रयत्न केले ते पहिले. दोघाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. महाराष्ट्र मधील जनतेचा असलेल्या रोषावर हा बदल केला गेला. त्यांना सूचना आली मुख्यमंत्री पद मिळेल असाच वाटत होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत होतं अचानक निर्णय आला. भाजपमध्ये आदेश झाला पाळावा लागतो. मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री होण्यासाठी काही मिनिटं असताना असा निर्णय होण्याचे दुःख त्याच्या कडे आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे दाखल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे दाखल
विवके फणसाळकर, रजनीश शेठ त्यानंतर आता आशुतोष डुंबरे सागरवर दाखल
पोलीस विभागाच्या बैठकांचा सिलसिला कशासाठी ?.
-
उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार
उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार
पाय उतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये दिसत आहेत.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आमदारांकडून सत्कार समारंभ !
गोव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वसंतराव नाईकांना अभिवादन करण्यात आलं. कृषी दिनाच्या निमित्ताने आमदारांनी एकत्र येतं अभिवादन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आमदारांकडून सत्कार समारंभ !
-
आम्ही एकनाथ यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करायचं आहे – गिरीश महाजन
- विधानसभा अध्यक्षपदाबाबत सागरवर खलबतं
- मोठ्या नेत्यांमध्ये सागरवर चर्चा सुरू
- गिरीश महाजनही सागरवर दाखल
- विधानसभा अध्यक्षपदाचं आताचं नाही पण ते लवकरच जाहीर होईल
- आमच्याकडे 170 मतं आहेत आम्ही बहुमत चाचणी जिंकू
- आम्ही आनंदोत्सव साजरा कळणार.आहोत
- एक भ्रष्ट सरकार गाडून आमचं सरकार आलंय
- आता फक्त गंमत बघा आम्ही जिंकू
-
नाशिकमध्ये देवेंद्र फडवणीस यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, ढोल ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका
– एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शप्पत घेतल्या नंतर नाशिकमध्ये भाजपचा एकच जल्लोष
– भाजप मध्यवर्ती कार्यालय वसंत स्मृती येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत ,एकमेकांना पेढे भरून जल्लोष
– मोठ्या संख्येने महिला ,पुरुष,युवा जल्लोषात सहभागी
– फुगडी घालून महिला पदाधिकारी यांचा जल्लोष
– भाजप आणि देवेंद्र फडवणीस यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी -
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ सागर बंगल्यावर दाखल,
- राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ सागरवर दाखल
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले
- काही वेळापुर्वी विवेक फणसाळकर यांनी घेतली होती भेट !
-
शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस
Income Tax department has sent a notice to NCP chief Sharad Pawar in connection with poll affidavits filed in 2004, 2009, 2014, and 2020.
(File photo) pic.twitter.com/HDqncI5T0f
— ANI (@ANI) July 1, 2022
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांचे मुक्ताईनगरात पंचवीस फुटाचे बॅनर
मुक्ताईनगर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या शुभेच्छा चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर कट आउट लावून बॅनरबाजी…….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांचे मुक्ताईनगरात पंचवीस फुटाचे मोठमोठाले लागले शुभेच्छांचे कट आउट
एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्या नंतर पहिल्यांदाच 3 वर्षानंतर
मुक्ताईनगरात देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर, कट आउट झडकले
-
हे मुसलमानांच्या विरोधातलं षड्यंत्र आहे असं नाही – प्रकाश आंबेडकर
सुप्रीम कोर्ट काही वेळेस चांगल्या उद्देशान निर्देश देतं. तसे त्यांनी नुपुर शर्मा यांना निर्देश दिलेत, की त्यांनी देशाची माफी मागावी. दुर्दैवानं त्यात एक गोष्ट राहिलीये.. आम्ही तेच म्हणतोय.. हे मुसलमानांच्या विरोधातलं षड्यंत्र आहे असं नाही.. तर आता हा जागतिक विषय झालाय.. जगाचं लक्ष आता याकडेल. वेगवेगळ्या धर्माचे प्रेषित आहेत, त्याचा तुम्ही आदर करता की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जे लोकं आदर करत नाही, त्यांवर तुम्ही काय काम करता, हे पाहणं महत्त्वाचंय…. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय हानीकारक आहे..
नुपूर शर्मा ने देशाची माफी मागावीः सर्वोच्च न्यायालय
नुपूर शर्मा च्या वक्तव्याने देशातील जनतेच्या भावना भडकल्या. आज जे काय देशात होत आहे. यासाठी नुपूर शर्मा जबाबदार आहे.
पोलिसांनी जे काही केलं त्या संदर्भात आमचं तोंड उघडू नकाः सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले. त्यांनी सत्र न्यायालया समोर हजर व्हायला हवं. तिचे हे वक्तव्य तिचा धनंजय दाखवते. ती एका पक्षाची प्रवक्ता आहे म्हणजे त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार मिळतो का? -
सुहास कांदे यांच्या एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या…
-
प्रकाश आंबेडकरांचा केंद्रासह आरएसएसवरती निशाना
- देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्यासाठी आरएसएस व केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उपमुख्मंत्रीपद दिलं आहे का हे विचारल पाहिजे – प्रकाश आंबेडकर
- फक्त फोलर टेस्टची परवानगी दिली आहे, सभागृहातील कामकाज चालवायची नाही
- शिवसेनेने सुप्रीम कोर्टात जाण्याऐवजी, महाविकास आघाडीने सर्व आमदार घेऊन राष्ट्रपतींसमोर ठिय्या धरावा
-
वेंगुर्लेत एकनाथ शिंदे यांचे वाळूशिल्प बनवून त्यांना शुभेच्छा
महाराष्ट्राचे नूतन तिसावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिंधुदुर्गातून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.वेंगुर्ले येथील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनीं वेंगुर्लेत एकनाथ शिंदे यांचे वाळूशिल्प बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.चिपकर यांच्या या अनोख्या शुभेच्छा सर्वांनाच भावल्या आहेत.
-
भाजप कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॅनरच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा
एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती होऊन शपथ विधी पार पडल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे हे ठाण्यातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यास सुरुवात झाली असून भाजप कडून देखील एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत अभिनंदनाचे बॅनर झळकत आहे . एक सर्व सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा मजकूर या ठिकाणी दिसत आहे .या बॅनर मध्ये देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो वगळता बॅनर वर हिंदुहृदयसम्राट बाळासहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो बॅनर वर लावण्यात आला आहे.
-
बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्री बनवलं यापेक्षा काय – अशिष शेलार
बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्री बनवलं यापेक्षा काय आहे. मला असं वाटतं आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करायला हवा. संजय राऊत यांनी केलेली वक्तव्ये…मास्टरस्ट्रोक जे मारतात त्यांना पुढचं चित्र स्पष्ट असतं. ज्या पद्धतीने हा प्रवास हा महाराष्ट्र पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रेम आहे. जनतेची निष्ठा आहे. महाराष्ट्रात असा प्रसंग पवार साहेबांनी देखील पाहिला नसेल. पंतप्रधानांनी ज्यावेळी हा निर्णय सांगितला त्यावेळी आम्ही एकत्र होता. त्यावर आम्ही करू असं अशिष शेलार यांनी सांगितलं.
-
नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मंत्र्यांची आवराआवर सुरू, मुळ आस्थापनेत जॉईन होण्याचे आदेश
- – नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मंत्र्यांची आवराआवर सुरू,
- – मंत्रालयात मंत्र्यांच्या केबिनमध्ये कागदपत्रे आणि इतर साहित्याची आवरा आवर सुरू,
- – मंत्र्याकडील कर्मचाऱ्यांना मुळ आस्थापनेत जॉईन होण्याचे आदेश काल देण्यात आले,
- – त्यापार्श्वभूमीवर आवराआवर सुरू झालीय
-
सागर बंगल्यावर भाजपा नेत्यांची वर्दळ, मित्रपक्षाचे नेते देखील फडणवीसांची भेट घेत आहेत
- सागर बंगल्यावर भाजपा नेत्यांची वर्दळ.
- देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनासाठी सागरवर गर्दी
- भाजपचे आमदार, खासदार मित्रपक्षाचे नेते फडणवीसांची भेट घेतायेत
-
इतिहासाची पुनरावृत्ती, अभिनेत्री नगमाचे ट्विट
History repeats itself In 1978, Sh. Sharad Pawar, who rebelled wth 38 MLAS to his side, became CM of Maha wth the support of 99MLAs frm Janata Party.
In 2022,Sh.EknathShinde, rebelled wth 39 MLAs ,becomes CM of Maharashtra with the support of 105 MLAS frm Bhartiya Janta Party— Nagma (@nagma_morarji) July 1, 2022
-
एकनाथ शिंदे यांच्या निवस्थानाच्या बाहेर राज्य राखीव दल आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे,अप्पर पोलिस आयुक्त पंजाबराव उबाळे,विशेष शाखा उपायुक्त सुधाकर पठारे,झोन 5 उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड,वाहतुक विभाग उपायुक्त दत्ता कांबळे,इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्या निवस्थानाच्या बाहेर राज्य राखीव दल आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे..
-
गेल्या काही दिवसात राज्यघटना धाब्यावर बसवून कामकाज सुरु आहे – उल्हास बापट
गेल्या काही दिवसात राज्यघटना धाब्यावर बसवून कामकाज सुरु आहे…मुख्यमंत्र्यांचा सल्ला राज्यपालांना बंधनकारक असताना, राज्यपाल मुख्यमंत्र्याशी कोणतीही चर्चा न करता निर्णय घेत आहे….गेली काही दिवस सुरु असलेला हा सर्व प्रकार हा लोकशाहीला मारक असल्याचं मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलयं….त्यांच्याशी यासंदर्भात बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातव डोके यांनी….