AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021: आम्ही 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकू, भाजपचा दावा

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचा दावा केला. ही माहिती खोटी नाही. | gram panchayat result

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021: आम्ही 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकू, भाजपचा दावा
| Updated on: Jan 18, 2021 | 1:49 PM
Share

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप (BJP) पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरले. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींपैकी 6 हजारहून जास्त ग्रामपंचायतींवर (Gram panchyat election results) भाजपचा झेंडा फडकेल, असा दावा भाजपकडून करण्यात आला.  (BJP will win in more than 6000 gram panchyat election results 2021)

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचा दावा केला. ही माहिती खोटी नाही. मी आकडेवारीच्या जोरावर हा दावा करत असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले.

आतापर्यंत कोकण म्हणजे शिवसेना असे समीकरण होते. मात्र, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने हे समीकरण मोडीत काढले आहे. सिंधुदुर्ग, वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. कोकणातील 70 पैकी 55 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा केशव उपाध्ये यांनी केला.

ट्रेंड बदलला; भाजपने शिवसेनेला केलं ओव्हरटेक

राज्यभरात सकाळपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला (Gram Panchayat Election Results ) सुरुवात झाल्यापासून शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, आता हा ट्रेंड बदलताना दिसत आहे. भाजपने आता शिवसेनेला मागे टाकत तब्बल 451जागांवर मुसंडी मारली आहे. तर सध्या शिवसेना 425 ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहे. एकूणच सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस 320, राष्ट्रवादी 300, मनसे 11 आणि इतर पक्ष 616 ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहेत.

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; चंद्रकांतदादांची पहिली प्रतिक्रिया

पाटोद्यात आदर्श सरपंच पेरे पाटील हरले, हिवरे बाजारात पोपटराव पवार जिंकले, अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?

विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा

(BJP will win in more than 6000 gram panchyat election results 2021)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.