AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election Results 2021 : पाटोद्यात आदर्श सरपंच पेरे पाटील हरले, हिवरे बाजारात पोपटराव पवार जिंकले, अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?

आण्णा हजारे यांच्या विचारांच्या ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. (Anna Hazare Ralegan Siddhi election)

Gram Panchayat Election Results 2021 : पाटोद्यात आदर्श सरपंच पेरे पाटील हरले, हिवरे बाजारात पोपटराव पवार जिंकले, अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?
अण्णा हजारे यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यामध्ये अण्णा हजारे यांनी आपल्या समर्थकांना आपापल्या शहरात आणि गावात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
| Updated on: Jan 18, 2021 | 1:25 PM
Share

अहमदनगर : पाटोद्यात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलाचा पराभव झाल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे अण्णा हजारे यांच्या गावात म्हणजेच राळेगणसिद्धीमध्ये कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर अण्णांच्या  विचारांच्या ग्रामविकास पॅनलने राळेगणसिद्धीमध्ये सर्वच्या सर्व 7 जागा जिंकल्याचे समोर आले आहे. (Anna Hazare supporters won the election of Ralegan Siddhi)

राज्यात 12,711 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होत असली तरी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे पटोदा, पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, आणि ज्येष्ठ जमाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी या तीन गावांच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा रंगली होती. नेहमीच चर्चेत असणाऱ्या या गावांमध्ये कोणाची सत्ता येणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. त्यातंनर आत प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यांनतर सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. या गावांपैकी पाटोद्यात सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा पराभव झाला. तर हिवरे बाजारातून पोपटराव पवार यांचं पॅनल जिकंलं आहे. यानंतर राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी सत्ता कायम राखत येथील ग्रामपंचायतीवर विजयी पतका फडकवली आहे.

अण्णा समर्थकांचा पूर्ण जागांवर विजय

राळेगणसिद्धी या गावात एकूण 9 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यापैकी 2 जागांवर याआधीच बिनविरोध निवडणूक झाली. 16 जानेवारी रोजी बाकीच्या 7 जागांवर निवडणूक झाली. त्यांनतर आज प्रत्यक्ष निकाल समोर आले आहेत. या सातही जागांवर अण्णा हजारे यांच्या समर्थकांच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवला आहे.

राळेगणसिद्धीमध्ये विजयी झालेले उमेदवार

1) जयसिंग मापारी 2) मंगल पठारे 3) मंगल मापारी 4) लाभेष औटी 5) सुनीता गजरे 6) डॉ. धनंजय पोटे 7) मंगल उगले

पाटोद्यात भास्करराव पेरे पराभूत

आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पोटोद्यात भास्करराव पेरे यांच्या पॅनलचा पराभव झाला. येथील ग्रामपंचायतीत एकूण 11 जागांपैकी 8 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांचे पॅनल पराभूत झाले. येथील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवून भास्करराव यांच्या 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला.

(Anna Hazare supporters won the election of Ralegan Siddhi)

संबंधित बातम्या :

निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह LIVETV

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय, मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.