महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे गटाची काकडी गावातील सत्ता भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांनी खेचून आणळी (Snehalata Kolhe vs Ashutosh Kale)

अनिश बेंद्रे

|

Jan 18, 2021 | 1:00 PM

शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने काकडी गावाची सत्ता गमावली. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांच्या भाची आणि माजी भाजप आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांच्या गटाचा विजय झाला. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्या गटाला पराभवाची धूळ चाखावी लागली. (Ahmednagar Kakadi Gram Panchayat Snehalata Kolhe beats Ashutosh Kale)

कोपरगावात काकडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटाने सत्ता खेचून आणली. गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या गटाची काकडी गावात सत्ता होती. यंदा भाजपच्या स्नेहलता कोल्हे गटाने 11 पैकी 8 जागांवर विजय मिळवला.

कोण आहेत स्नेहलता कोल्हे?

  • स्नेहलता कोल्हे या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा पराभव
  • स्नेहलता कोल्हे या भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाची

शिर्डी विमानतळासाठी निधीची घोषणा

काकडी गावात शिर्डी विमानतळ असल्याने मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली. निवडणुकीच्या‌ तोंडावर आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 300 कोटींचा निधी विमानतळ आणि गावाच्या विकासासाठी देण्याची घोषणा करुन घेतली होती, परंतु मतदारांनी कौल भाजपच्या पारड्यात टाकल्याचं दिसत आहे.

विखे पाटलांना मूळगावी धक्का

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे. (Ahmednagar Kakadi Gram Panchayat Snehalata Kolhe beats Ashutosh Kale)

लोणी खुर्द गावात सत्तांतर

लोणी खुर्द हे राधाकृष्ण विखे-पाटलांचं गाव आहे. या गावात विखे पाटलांची 20 वर्षांपासून सत्ता होती. 17 पैकी 13 जागांवर परिवर्तन पॅनेलनं विजय मिळवल्यानं अवघ्या 4 जागांवर विखे पाटील समर्थकांचं पॅनेल विजयी झाले.

दुसरीकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही धक्का दिला. कनोली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्याने काँग्रेसकडून चाव्या भाजपच्या हाती आल्या आहेत. 14 गावांमध्ये थेट विखे-थोरात लढत झाली होती.

संबंधित बातम्या :

राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का,लोणी-खूर्द गावातील सत्ता गमावली

कोपरगावातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, राष्ट्रवादीच्या आमदारासमोर विखेंच्या भाचीचं आव्हान

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE |महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय, मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

(Ahmednagar Kakadi Gram Panchayat Snehalata Kolhe beats Ashutosh Kale)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें