कोपरगावातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, राष्ट्रवादीच्या आमदारासमोर विखेंच्या भाचीचं आव्हान

काकडी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून काळे गटाची‌ सत्ता आहे. ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कोल्हे गट‌ कसोशीने प्रयत्न करत आहे. (Snehalata Kolhe vs Ashutosh Kale)

कोपरगावातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, राष्ट्रवादीच्या आमदारासमोर विखेंच्या भाचीचं आव्हान
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:59 PM

शिर्डी : कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काळेंच्या ताब्यातून सत्ता हिरावून घेण्यास कोल्हे उत्सुक आहेत. कोल्हे या भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या भाची आहेत. (Kopargaon Kakadi Gram Panchayat Election BJP Snehalata Kolhe vs NCP Ashutosh Kale)

काकडी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी एकूण 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या गटाचे 11 अर्ज आहेत, तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाचेही प्रत्येकी 11 अर्ज दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त काही अपक्ष तर काही डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

काकडी गावात शिर्डी विमानतळ असल्याने मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. काकडी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 15 वर्षांपासून काळे गटाची‌ सत्ता आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कोल्हे गट‌ कसोशीने प्रयत्न करत आहे.

निवडणुकीच्या‌ तोंडावर आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 300 कोटींचा निधी विमानतळ आणि गावाच्या विकासासाठी देण्याची घोषणा करुन घेतली. त्यामुळे काळेंनी सरशी घेतल्याचं बोललं जात आहे.

कोण आहेत स्नेहलता कोल्हे?

  • स्नेहलता कोल्हे या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा पराभव
  • स्नेहलता कोल्हे या भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाची

विखेंची अडचण

भाजप उमेदवार स्नेहलता कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असा सूचना वजा आदेश गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना दिला.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे राजेश परजणे हे स्नेहलता कोल्हे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यामुळे विखेंची अडचण झाली होती. परंतु पक्षाशी इमान राखत विखे पाटील यांनी आपल्या भाषणात भाची अर्थात भाजप उमेदवार असलेल्या तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असं आश्वासन दिलं होतं. परंतु राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी बाजी मारली.

संबंधित बातम्या :

अपक्ष मेहुण्याविरोधातील भाचीला निवडून आणा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने विखे कात्रीत

(Kopargaon Kakadi Gram Panchayat Election BJP Snehalata Kolhe vs NCP Ashutosh Kale)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.