Kirit Somaiya | ‘व्हिडिओ खोटा आहे असं सोमय्या म्हणालेले नाहीत, याचा अर्थ….’ अनिल परब नेमकं काय म्हणाले?

Kirit Somaiya | "आतापर्यंत पैशाच्या खंडणी बद्दल ऐकलं आहे ही सेक्स खंडणी आहे का? कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बरच काही बाहेर आलय. हे प्रकरण गंभीर आहे"

Kirit Somaiya | व्हिडिओ खोटा आहे असं सोमय्या म्हणालेले नाहीत, याचा अर्थ.... अनिल परब नेमकं काय म्हणाले?
Anil Parab
| Updated on: Jul 18, 2023 | 3:54 PM

मुंबई : आज विधिमंडळात किरीट सोमय्या यांचा मुद्दा चांगलाच गाजला. याच विषयावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही वृत्त वाहिन्यांवर हा व्हिडिओ दाखवला जात आहे. आज विधिमंडळाच्या सभागृहात जोरदार पडसाद उमटले.
शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओवरुन जोरदार भाषण केलं.

‘ही सेक्स खंडणी आहे का?’

“हे शोधण तुमच काम आहे. या महिलेला शोधून काढणं तुमच काम आहे. ज्या महिलेने व्हिडिओ पाठवला, त्या बद्दल महाराष्ट्राला कळलच पाहिजे. ज्या पद्धतीची ही विकृती आहे, आतापर्यंत पैशाच्या खंडणी बद्दल ऐकलं आहे ही सेक्स खंडणी आहे का? कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बरच काही बाहेर आलय. हे प्रकरण गंभीर आहे” असं अनिल परब म्हणाले.

याचा अर्थ तो व्हिडिओ खरा आहे का?

“आठ तासांचे हे व्हिडिओ तुमच्याकडे गेले आहेत. गृहमंत्र्यांनी SIT लावणार का? हे जाहीर करावं” अशी मागणी अनिल परब यांनी केली. “किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी हा व्हिडिओ खोटा आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. मी कुठल्याही महिलेवर अत्याचार केला नाही असं त्यांनी म्हटलय. याचा अर्थ तो व्हिडिओ खरा आहे, हे त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलय का?” असं अनिल परब म्हणाले.

“व्हिडिओच्या त्या बाजूला कोण होतं? कुठे घेतला हा व्हिडिओ? कोणी घेतला हा व्हिडिओ? हे सर्व समतीने आहे की, सेक्ससाठी जबरदस्ती आहे ते सर्व बाहेर आलं पाहिजे” असं अनिल परब म्हणाले.