Icc T20i World Cup 2026 : वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार घातल्याने बीसीबी आणि खेळाडूंचं काय-किती नुकसान?
Bangladesh And Icc T20i World Cup 2026 : बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आणि संघाला भारतात होणाऱ्या आयसीसीच्या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार घालणं आर्थिकरित्या किती महागात पडणार? तसेच याचा भारतावर किती परिणाम होणार? जाणून घ्या.

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने बांगलादेश क्रिकेट टीमची भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. आयसीसीला हा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठेपणामुळे घ्यावा लागला आहे. बांगलादेशने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात खेळण्यासाठी नकार दिला होता. आयसीसीने सोबतच बांगलादेशच्या जागी या स्पर्धेत दुसऱ्या संघाचा समावेश केला आहे. मात्र आयसीसीला बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर का करावं लागलं? त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला, खेळाडूंना आणि भारताला किती आर्थिक नुकसान होणार? हे आपण जाणून घेऊयात. मुस्तफिजुर रहमान याची आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघातून हकालपट्टी करण्यात आली. बांगलादेशमधील...
