AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वास गुदमरतोय.., दीपिका पादुकोण संतापली, थेट मुंबई पालिकेला टॅग करत शेअर केली पोस्ट

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण श्वास गुदमरतोय म्हणत सोशल मीडियावर मदत मागितली आहे. यावेळी तिने मुंबई पालिकेला देखील टॅग केलं आहे. नेमकं काय घडलं?

श्वास गुदमरतोय.., दीपिका पादुकोण संतापली, थेट मुंबई पालिकेला टॅग करत शेअर केली पोस्ट
| Updated on: Mar 13, 2026 | 2:08 PM
Share

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाबद्दल तिने सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे.

दीपिकाने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मुंबईतील खराब एअर क्वालिटी इंडेक्सबाबत चिंता व्यक्त केली. या पोस्टमध्ये तिने थेट BMC ला टॅग करत या समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इंस्टाग्राम पोस्टमधून व्यक्त केली चिंता

गुरुवारी दीपिका पादुकोण हिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर AQI चा स्क्रीनशॉट शेअर केला. त्या स्क्रीनशॉटमध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे. या पोस्टसोबत दीपिकाने लिहिले, ‘हे शहर आणि इथे राहणारे लोक गुदमरून जात आहेत. हे कसं ठीक असू शकतं?’ यासोबतच तिने मुंबई महापालिकेला मेंशन करत या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर याआधीही काही कलाकारांनी आवाज उठवला आहे. अभिनेत्री सैयामी खेर आणि रिचा चड्ढा यांनीही सोशल मीडियावर या विषयावर चिंता व्यक्त केली होती.

दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स नेहमीच चर्चेत येतात. यावेळीही तिने शेअर केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून अनेक लोकांनी तिच्या मताला समर्थन दिले आहे.

आगामी चित्रपटांची चर्चा

दीपिकाच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ती दिग्दर्शक Atlee यांच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असणार आहे. 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय दीपिका शाहरुख खानच्या King या चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अशातच आता तिच्या मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पोस्टमुळे शहरातील प्रदूषणाच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

Follow Us
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल.
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद.
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स....
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स.....
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.