Lift Safety Rules: लहान मुलांना लिफ्ट, एक्सेलेटर वापरण्यास बंदी! मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?

मुंबई आणि ठाण्यासह अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती आणि गगनचुंबी संकुलांची संख्या वाढत आहे. अशा ठिकाणी लिफ्टचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लिफ्टच्या सुरक्षिततेसाठी सरकारने हे नवे नियम लागू केले आहेत.

Lift Safety Rules: लहान मुलांना लिफ्ट, एक्सेलेटर वापरण्यास बंदी! मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
| Updated on: Nov 17, 2026 | 7:43 PM

Maharashtra Lift Safety Rules:  मोठ्या शहरांमध्ये लिफ्टमध्ये लोक अडकल्याच्या, लहान मुलं अडकल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.  मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये लिफ्टच्या दुर्घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लिफ्टच्या वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत. १२ वर्षांखालील मुलांना पालक किंवा मोठ्या व्यक्तीच्या सोबतीशिवाय लिफ्ट किंवा एस्केलेटर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

१ नोव्हेंबर २०२६ पासून ‘महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉक, २०२६’ ही नवी नियमावली लागू झाली आहे. या नियमांमुळे गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारती आणि लिफ्टची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांवरही अधिक जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यासह अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती आणि गगनचुंबी संकुलांची संख्या वाढत आहे. अशा ठिकाणी लिफ्टचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लिफ्टच्या सुरक्षिततेसाठी सरकारने हे नवे नियम लागू केले आहेत.

Loading...

नव्या नियमांनुसार, लिफ्ट किंवा एस्केलेटरचा वापर करताना १२ वर्षांखालील मुलांसोबत पालक किंवा एखादी मोठी व्यक्ती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये जाण्यास किंवा एस्केलेटर वापरण्यास परवानगी असणार नाही. याशिवाय लिफ्ट किंवा एस्केलेटरशी संबंधित कोणताही अपघात झाल्यास त्याची माहिती २४ तासांच्या आत विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. लिफ्टमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंचलित बचाव उपकरणे बसवण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

लिफ्ट कंत्राटदारांवरही जबाबदारी

लिफ्ट बसवणे आणि त्यांची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांसाठीही सरकारने काही नियम कडक केले आहेत. संबंधित भागात अतिरिक्त सेवा केंद्र सुरू करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे लिफ्टमध्ये बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, लिफ्टच्या वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने हे नवे नियम लागू केले आहेत. आता सोसायट्या, व्यावसायिक इमारती आणि लिफ्ट कंत्राटदारांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us