
मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये (Mahapalika Election 2026) भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलताना दिसणार आहे. 29 महापालिकांसाठी काल झालेल्या मतदानानंतर आज (16 जानेवारी) सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली. दिवस वर चढू लागल्यावर निकालाचे कल हाती येऊ लागले आणि राज्यात पुन्हा एकदा भाजपची लाट दिसली. राज्यभरात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून महापालिका निवडणुकीत देखील भाजपला मोठं यश मिळाल्याचं दिसत आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत तर भाजपा- शिवसेना महायुतीची सत्ता असेलच पण त्यासह राज्यातील अनेक महापालिकांमध्येही भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यामुळे भाजपच्या गोटात आनंदी वातावरण आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसाठी हे यश महत्वाचे आहे.
मात्र असे असले तरी मुख्यमत्र्यांसाठी आजच्या निवडणुकीत एक धक्कादायक निकालही लागला आहे. मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fdanvis) यांचा मामेभाऊ विवेक कलोती यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अमरावती महानगरपालिकेची सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लढतीत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलौती पराभूत झाले. तसेच आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू विवेक भारतीय यांचाही पराभव झाल्याने फडणवीस यांना दुहेरी धक्का बसला. विशेष म्हणजे या प्रभागातील काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले. दणदणीत मतांनी त्यांचा विजय झालाय .
Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी...
Jalgaon Municipal Election Results 2026 : जळगावात महापालिका निवडणुकीत 69 जागांसह महायुतीचा बोलबाला
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
Pune Election Result : काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला - मुरलीधर मोहोळ
मुख्यमंत्र्याच्या मामेभावाचा पराभव
अमरावती महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपतर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे संजय शिरभाते हे निवडणुकीच्या रिंगणात होते.अमरावतीमधील बिग फाईटसपैकी ही देखील एक लढत होती. काल 15 जानेवारी रोजी अमरावतीमध्ये महापालिकेसाठी शांततेत मतदान झालं. तर आज मतमोजणी होऊन निकाल समोर येऊ लागले. यावेळी काँग्रेसच्या शिरभाते यांनी विवेक कलोती यांचा पराभव करत दणदणीच विजय मिळवला. या निकालामुळे अमरावतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल दिसून येत असून सत्ताधारी आघाडीला हा निकाल धक्का मानला जात आहे. भावाच्या पराभवामुळे फडणवीस यांच्यासाठीही मोठा धक्का आहे. कलोती यांचा पराभव भाजपासाठी धक्कादायक असला तरी आम्ही जनमताचा आदर करतो अशी प्रतिक्रिया भाजपतर्फे देण्यात आली.