Maharashtra News LIVE : सर्वसामान्यांना मोठा झटका; सीएनजीच्या दरात मोठी वाढ

Maharashtra News LIVE : सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध दरवाढीनंतर आता सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळला आहे

Maharashtra News LIVE : सर्वसामान्यांना मोठा झटका; सीएनजीच्या दरात मोठी वाढ
| Updated on: Nov 15, 2026 | 9:20 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Nov 2026 09:09 AM (IST)

    नाशिकच्या सातपूर परिसरात महानगरपालिकेच्या शाळेला आग

    नाशिकच्या सातपूर परिसरात महानगरपालिकेच्या शाळेला आग लागली आहे.  शाळेच्या आवारातून धुराचे आणि आगेचे लोटन निघताना दिसतातच स्थानिक नागरिकांमध्ये धावपळ उडाली.  या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  सातपूर परिसरात असलेल्या मायक्रो शाळेच्या पाठीमागील भागात घटना घडली.  शाळेतील विद्यार्थ्यांचे बसण्याचे बाक जळून खाक झाले. रात्रीच्या सुमारास मनपाच्या शाळेला आग लागल्याची घटना घडली.

  • 15 Nov 2026 09:07 AM (IST)

    पूर्वपरवानगीशिवाय नाव किंवा फोटो वापरल्यास कारवाई करणार – रुपाली चाकणकर

    रुपाली चाकणकरांकडून नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीचे ‘ट्रेडमार्क’ रजिस्ट्रेशन केले. पूर्वपरवानगीशिवाय नाव किंवा फोटो वापरल्यास कठोर कायदेशीर कारवाई होणार, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. रील, व्हिडिओ किंवा प्रमोशनसाठी वापर केल्यास फौजदारी आणि दिवाणी गुन्हा दाखल होणार, असल्याची माहिती रुपाली चाकणकरांनी एक्स पोस्टद्वारे दिली.


  • 15 Nov 2026 09:04 AM (IST)

    छटपूजेनिमित्त ऊसाचा दर थेट ६० ते ७० रुपयांवर, दरवाढीचा ग्राहकांना फटका!

    छटपूजेनिमित्त कल्याणच्या बाजारपेठेत उसाची मोठी आवक झाली आहे. यामुळे ३० ते ३५ रुपयांना मिळणारा ऊस आता थेट ६० ते ७० रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीचा ग्राहकांना फटका बसला आहे. छटपूजेनिमित्त कल्याणच्या बाजारपेठेत ऊस मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने बाजारपेठेत ठिकठिकाणी उसाचे ढीग लागले आहेत. उसाला वाढती मागणी असल्याने दरात वाढ झाली आहे. ३० ते ३५ रुपयांचा ऊस आता ५० ते ६० रुपयांना विक्रीस पाहायला मिळत आहे. ऊस मुबलक उपलब्ध असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्री मंदावली आआहे.

मुंबईसह MMR परिसरात CNG महागला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आजपासून CNG दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून प्रतिकिलो १.५० रुपयांची दरवाढ झाली आहे. CNG चा नवा दर आता ९१.५० रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झालाय. गेल्या ७५ दिवसांत CNG दरात एकूण ५.५० रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियातील संकटामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. देशांतर्गत गॅसचा कमी पुरवठा आणि महागड्या आयात गॅसमुळे खरेदी खर्चात वाढ झाली आहे. अमूलच्या दूध दरवाढीनंतर भाजीपाला आता सीएनजी दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. या दरवाढीचा वाहनचालकांना मोठा झटका बसलाय. दरवाढीमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. राज्यातील आणि देशातील विविध बातम्यांचा आढावा, अपडेट्स इथं वाचा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us