AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kushal Badrike: 15-20 फुटांवरून खोल समुद्रात पडलो अन्…; कुशल बद्रिकेनं सांगितला थरारक अनुभव

Kushal Badrike: अभिनेता कुशल बद्रिकेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याचा थरारक अनुभव सांगितला आहे. पंधरा ते वीस फुटांवरून अनेकदा खोल समुद्रात पडलो, नाकातोंडात पाणी गेलं, असा खुलासा त्याने केला आहे.

Kushal Badrike: 15-20 फुटांवरून खोल समुद्रात पडलो अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला थरारक अनुभव
कुशल बद्रिकेImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2026 | 9:15 AM
Share

Kushal Badrike: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके आपल्या विनोदी अभिनयासाठी ओळखला जातो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या कुशलने अनेक चित्रपट आणि मालिकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो त्याच्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट एमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक थरारक अनुभव कुशलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. फ्लायबोर्डिंग या वॉटर स्पोर्ट्सचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं, याचा खुलासा केला आहे.

संतोष जुवेकरसाठी लिहिलेला सीन कुशलने केला!

कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर फ्लायबोर्डिंग करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओसोबत त्याने एक खास कॅप्शन लिहिलं आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये फ्लायबोर्डिंगचा सीन अभिनेता संतोष जुवेकर याच्यासाठी लिहिण्यात आला होता. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष शूटिंगची वेळ आली, तेव्हा कुशलने हा सीन स्वतः करण्याचा हट्ट धरला. त्याचा हा हट्ट मित्रांनीही पुरवला आणि त्याला हा स्टंट करण्याची संधी मिळाली. मात्र, हा सीन करणं दिसतं तितकं सोपं नव्हतं. फ्लायबोर्डिंग करताना कुशलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पंधरा ते वीस फुटांवरून तो अनेकदा खोल समुद्रात पडला. नाकातोंडात पाणी गेलं. या अनुभवामुळे त्याची चांगलीच दमछाक झाली.

पहा व्हिडीओ-

या अनुभवाबद्दल सांगताना कुशलने लिहिलं, “उशिरा आलेल्या शहाणपणाची गोष्ट! स्क्रिप्टमध्ये हा सीन संतोष जुवेकरच्या नावाने लिहिला गेला होता. पण प्रत्यक्षात जेव्हा शूट करायची वेळ आली, तेव्हा मी हट्ट धरला की हे मला करायचं आहे. माझा हट्ट पुरवला नाही तर ते मित्र कसले.” पुढे त्याने या स्टंटमधील अडचणी सांगितल्या. “हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही. हे करताना पंधरा-वीस फुटांवरून किती तरी वेळा खोल समुद्रात पडलो. नाकातोंडात आणि कुठे कुठे पाणी गेलं, तुम्हाला काय सांगू? पुढे एक आठवडा माझं अंग दुखत होतं. ते म्हणतात ना, जशी करणी तशी भरणी! ते खरं आहे.”

या शूटिंगसाठी कुशलला मोठा प्रवास करावा लागला होता. तीन तासांचा प्रवास आणि दोन तासांचं शूटिंग केल्यानंतर त्याच्या वाट्याला अवघ्या दहा सेकंदांचा सीन आला. याच अनुभवाची गंमत सांगताना त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल

दरम्यान, कुशल बद्रिकेच्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. हा चित्रपट नुकताच एमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. आपल्या पोस्टच्या माध्यमातून कुशलने चाहत्यांना हा चित्रपट घरबसल्या पाहण्याचं आवाहन केलं आहे. चित्रपटातील एका छोट्याशा सीनसाठी घेतलेली मेहनत आणि त्यामागचा थरारक अनुभव त्याने मजेशीर अंदाजात सांगितला आहे.

Follow Us
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
CNG Price Hike Mumbai : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ, पहा नवीन दर
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
Shivsena : ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी