AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Pension Rules: पीएफ कपात, तरी नाही मिळणार पेन्शनचा लाभ, कोणत्या कर्मचार्‍यांना फटका? समजून घ्या

EPFO Pension Rules: अनेकदा कर्मचाऱ्याचा पीएफ कपात होतो, पण नंतर त्याला उतारवयात पेन्शनचा लाभ मिळत नाही. यामागील कारण काय? ईपीएफओचा पेन्शन विषयीचे नियम वाचलेत का?

EPFO Pension Rules: पीएफ कपात, तरी नाही मिळणार पेन्शनचा लाभ, कोणत्या कर्मचार्‍यांना फटका? समजून घ्या
पीएफ कपात, तरी नाही मिळणार पेन्शनचा लाभ, कोणत्या कर्मचार्‍यांना फटका?
| Updated on: Nov 15, 2026 | 9:05 AM
Share

EPFO Pension Rules: नोकरदार वर्गाच्या दरमहा पगारातून पीएफसाठी पैसा कपात होतो. ईपीएफओच्या ईपीएफ फंडात रक्कम जमा होते. पीएफ हा कर्मचाऱ्यासाठी एक आर्थिक सुरक्षेचा मार्ग आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटते की, सेवानिवृत्तीनंतर त्याला दरमहा पेन्शन मिळेल. त्यामुळे उतारवयात त्याला फायदा होईल. पण नियमित पीएफ कपात होऊनही अनेक कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. ईपीएस योजनेचा फायदा होत नाही. त्यांना मासिक पेन्शन मिळत नाही.

अनेक कर्मचाऱ्यांना ही गोष्टच माहिती नसते. निवृत्तीनंतर ते पेन्शनसाठी ईपीएफओ कार्यालयाचे खेटे घालतात. पण जेव्हा त्यांना पेन्शन मिळणार नाही असे समजते तेव्हा मोठा धक्का बसतो. ईपीएफओचे नियम आहेत. त्यानुसारच कर्मचाऱ्याला ईपीएस, पेन्शन योजनेचा लाभ मिळतो. ही अट पूर्ण केली नाही तर कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळत नाहीत, काय आहेत ते नियम?

10 वर्षांपेक्षा कमी नोकरी

ईपीएफओच्या नियमानुसार, पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी किमान 10 वर्षांची नोकरी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याची एकूण नोकरी कालावधी 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याला पेन्शनचा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत कर्मचारी फॉर्म 10C भरून त्याचे पैसे काढू शकतो.

जर मूळ वेतन 25,000 पेक्षा अधिक असेल

जर एखादा नवीन कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 वा त्यानंतर ईपीएफओशी संबंधित आहे. त्याचे सुरुवातीचे मूळ वेतन 25,000 रुपये महिन्यांपेक्षा अधिक असेल तर त्याला ईपीएस सदस्य मानले जात नाही. अशा प्रकरणात कंपनी आणि कर्मचारी परस्पर सहमतीने केवळ पीएफचे पैसे कपात करून त्यावर 8.25% पर्यंत व्याज मिळवू शकतात. पण त्यांना पेन्शनचा लाभ घेता येत नाही.

वयाचाही परिणाम

58 वर्षानंतर तुमच्या पेन्शन फंडमध्ये पैसे जमा होणे बंद होते. या कालावधीत पेन्शनचा अधिकार मिळतो. पण जर तुम्ही 10 वर्षांची नोकरी पूर्ण होण्यापूर्वी पेन्शनचा पैसा काढला तर तुम्ही 10 वर्षांपेक्षा जास्त नोकरी केली तर तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ देण्यात येणार नाही. निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला पेन्शनचा लाभ मिळत नाही. जर तुम्ही दहा वर्षांपेक्षा कमी म्हणजे 9 वर्ष 6 महिन्यांची नोकरी पूर्ण केली तर ईपीएफओ तुम्हाला पेन्शन खात्यातून एकरक्कमी पैसे काढू देत नाही.

Follow Us
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
CNG Price Hike Mumbai : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ, पहा नवीन दर
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
Shivsena : ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी