Maharashtra News LIVE : पुण्यात सकाळी पावसाच्या हलक्या सरी, परंतु पावसाची तूट कायम

Maharashtra News LIVE : पुण्यासह राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहे. परंतु त्यानंतरही पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Maharashtra News LIVE : पुण्यात सकाळी पावसाच्या हलक्या सरी, परंतु पावसाची तूट कायम
Live update
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 20, 2026 | 9:53 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Sep 2026 09:53 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्ध दांपत्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला

    छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीच्या वादातून वृद्ध दांपत्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.  आठ ते दहा जणांच्या टोळक्याने वृद्ध दांपत्याला लाठ्या-काठ्यांनी केली जबर मारहाण करण्यात आली. वैजापूर तालुक्यातील कोल्ही गावातील धक्कादायक घटना आहे. या हल्ल्यात वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • 20 Sep 2026 09:45 AM (IST)

    बीडमध्ये झळकले रोहित पवारांच्या वाढदिवसाचे बॅनर

    बीडच्या धारूर शहरात आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले.  बॅनरवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे.  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने धारूर शहरात बॅनरबाजी करण्यात आली.  या बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.


  • 20 Sep 2026 09:37 AM (IST)

    रविवारमुळे लालाबागच्या राजा, दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी रांग

    पुण्यातील गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. रविवारी सुट्टीचे औचित्य साधत नागरिकांची सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी रांग पाहायला मिळत आहे. तर लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग तब्बल १० किलोमीटर पैक्षा जास्त लांब गेली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे गणेशभक्तांनी लालबागचा राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी केली आहे. लालबाग मार्केट ते भायखळा रेल्वे स्टेशन पर्यंत ही दर्शन रांग पोहचली आहे. रविवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची सर्वाधिक गर्दी होणार आहे.

  • 20 Sep 2026 09:26 AM (IST)

    मुंबईच्या कोस्टलरोडवर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

    मुंबई कोस्टल रोडवर BMW चा भीषण अपघात झाला असून त्यात तिघांचा मृत्यू झाला.  मुंबईतील कोस्टल रोडवर लाला कॉलेजसमोर, लोटस जेटीजवळ भरधाव BMW कारचा अपघात झाला.  मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने जाताना अति वेगामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या  अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.

  • 20 Sep 2026 09:21 AM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौरा आटोपून आज मुंबईकडे रवाना होणार

    ​गणेशोत्सवानिमित्त दरेगावी दोन दिवसांच्या मुक्कामी आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी १२ वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कुटुंबीयांसह गणेशोत्सव उत्साहात साजरा केला. तसेच स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. गणेश विसर्जन मिरवणुकीतही स्वतः ते प्रथमच सहभागी झालेले पाहायला मिळाले.सर्व पूर्वनियोजित कौटुंबिक कार्यक्रम आटोपून ते आज दुपारी मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतील.


  • 20 Sep 2026 09:00 AM (IST)

    जळगावमध्ये गॅस गोदामाचे कुलूप तोडून 25 सिलिंडरची चोरी

    जळगावातील शिरसोली येथे भारत गॅस एजन्सीच्या गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून २५ सिलिंडरची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २४ किलो वजनाचे २१ आणि १४ किलोचे ४ सिलिंडर असे एकूण तब्बल २५ हजार रुपयांचे पळवले. गॅस गोदामामध्ये तिसऱ्यांदा चोरीची घटना घडली असून गोदामाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • 20 Sep 2026 08:58 AM (IST)

    पुण्याच्या चाकणमध्ये १ कोटी १३ लाखांचा गुटखा जप्त

    चाकणमध्ये १ कोटी १३ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. चाकणमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा तब्बल सहा तास पाठलाग करून चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवण्यात आला. या ट्रकमधून विविध कंपन्यांचा पानमसाला आणि सुगंधित तंबाखू असा १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चालकासह पाच जणांविरोधात BNS आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Sep 2026 08:56 AM (IST)

    मुंबईत काळाचौकीत महागणपतीमध्ये शॉक लागून दोघांचा मृत्यू

    मुंबईच्या काळाचौकी महागणपतीमध्ये विद्युत शॉक लागून 5 जण जखमी तर दोन जणांचा मृत्यू झाला.  या घटनेतील मृतामध्ये ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू सामावेश आहे. ८ वर्षीय रागिणी यादव हिचा मृतदेह भायखळाच्या मसीना रुग्णालयातून शवविच्छेदनासाठी KEM रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दोघांच्या मृत्यूने यादव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात गेल्या चार ते पाच दिवसांत तीव्र उष्णतेमुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस स्थानिक पातळीवर वादळी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्व दूर पडणार नसून ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. तर दोन दिवस नागपुरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

गेल्या काही दिवसात पावसाने लंबी दडी मारल्याने पीक सुकायला लागली होती. त्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर सारख्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही पावसाची तूट कायम आहे. सोयाबीनच्या पिकांवर किड्यांचा प्रभाव दिसून येत असून पान कुरताळली जात आहे. सोयाबीनला सेंगा लागल्या मात्र त्या पावसाच्या अभावी वाढल्या नाही. पावसाच्या कमतरतेमुळे पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. दोन दिवसांच्या पावसानंतर आज सकाळ पासून पुन्हा ऊन पडायला सुरवात झाली आहे. या देशासहित राज्यातील सर्व घडामोडी जाणून घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us