AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान

Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान

| Updated on: Sep 20, 2026 | 10:12 AM
Share

अहिल्यानगरच्या राजकारण, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या विखे पाटील कुटुंबाने आता आंतरराष्ट्रीय राजकारणातही मोठी झेप घेतली आहे. विखे पाटील घराण्यातील 41 वर्षीय नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्वीडनच्या 349 सदस्यीय संसदेत म्हणजेच ‘रिक्सडॅग’मध्ये त्यांनी स्टॉकहोम शहर मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.

नीला विखे पाटील या विखे पाटील कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील असून, त्यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला आहे. मात्र, त्यांचे बालपण अहिल्यानगरमध्ये गेले. त्या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवणारे सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पणती आहेत. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात आहेत. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या त्या कन्या असून, जलसंपदा मंत्री आणि मंत्रिमंडळातील मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत.

नीला यांनी स्वीडनमधील गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले असून, त्यांनी एमबीएची पदवीही मिळवली आहे. स्वीडनमधील ‘ग्रीन पार्टी’सोबत त्या दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात वित्त, कर आणि गृहनिर्माणाशी संबंधित विषयांवर राजकीय सल्लागार म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर स्टॉकहोम सिटी कौन्सिलवर नगरसेवक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

स्वीडनच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे 349 पैकी 176 जागा मिळवल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. तर मावळत्या पुराणमतवादी सरकारच्या बाजूला 173 जागा गेल्या आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत झालेली निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

नीला विखे पाटील ज्या ग्रीन पार्टीशी संबंधित आहेत, त्या पक्षाचा मुख्य भर पर्यावरण संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा आणि हरित राजकारणावर आहे. अहिल्यानगरच्या विखे पाटील घराण्यातील एका तरुणीने स्वीडनच्या राजकारणात मिळवलेले हे स्थान महाराष्ट्रासह देशातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

Published on: Sep 20, 2026 10:12 AM

Follow Us