AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा, कसे ओळखाल चांगले आहे की खराब?

Fresh Fruits: डॉक्टर कायम फळे खाण्याचा सल्ला देत असतात. पण बाजारातून फळे विकत घेताना ते चांगले आहेत की नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे फळे खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजे ते जाणून घ्या...

Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, कसे ओळखाल चांगले आहे की खराब?
| Updated on: Sep 20, 2026 | 10:10 AM
Share

Fresh Fruits: फळे आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. पण आपण खात असलेली फळे चांगली आहेत की नाही, हे लक्षात घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. सांगायचं झालं तर, बाजारात फळं खरेदी करताना, बरेच लोक त्यांचा रंग किंवा आकार पाहून ती खरेदी करायची की नाही हे ठरवतात. केवळ फळ दिसायला चांगले आहे म्हणून ते ताजे किंवा खाण्यायोग्य असेलच असं कधीच नसतं. कधीकधी, बाहेरून चांगली दिसणारी फळे आतून सडलेली असू शकतात. काही फळे पिकल्यावर मऊ होतात, त्यामुळे, फळे खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

बाजारातून फळे विकत घेताना सर्वप्रथम, फळाची साल नीट निरखून पाहा. त्यावर काळे किंवा तपकिरी डाग, भेगा, सडलेले भाग किंवा मऊ भाग आहेत का ते तपासा. एखादा लहान डाग असला म्हणजे फळ खराब आहे असे नाही. पण, जर डाग लवकर पसरत असतील किंवा तो भाग नेहमीपेक्षा जास्त मऊ लागत असेल, तर ते फळ खाणं टाळावं.

ताज्या फळांना सहसा एक नैसर्गिक आणि परिचित वास असतो. जर तुम्हाला सडलेला, आंबट किंवा विचित्र वास येत असेल तर सावध व्हा. वास हा फळ खराब होण्याचा एक महत्त्वाचा निर्देशक असू शकतो. त्यामुळे फळांचा वास कसा आहे ते पाहा.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, फळाच्या प्रकारानुसार त्याचा सामान्य टणकपणा तपासा. जे फळ जास्तच मऊ, लगदा झालेले असते किंवा दाबल्यावर तुटते, ते अनेकदा खराब झाल्याचं लक्षण असतं. पण हाच नियम सर्व फळांना लागू होत नाही. उदाहरणार्थ, पिकलेली केळी आणि आंबे नैसर्गिकरित्या थोडे मऊ असतात.

फळे खरेदी करताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फळे खरेदी करताना केवळ फळ विक्रेत्याचे ऐकून न घेता, ती स्वतः तपासणं महत्त्वाचं आहे. फळ घेताना तुम्ही फळाचं स्वरूप, वास आणि प्रकार या सर्व घटकांचा विचार केला पाहिजे.

Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?