Maharashtra News LIVE : नाशिकमध्ये बंडखोरीवर तोडगा नाहीच निघाला

Maharashtra News LIVE : आज नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीत दाखल झाले असून थोड्याच वेलात आंदोलनाला सुरूवात होईल. महत्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : नाशिकमध्ये बंडखोरीवर तोडगा नाहीच निघाला
| Edited By: | Updated on: Jun 06, 2026 | 11:06 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 06 Jun 2026 11:03 AM (IST)

    बोरीवलीतील झाडांचे AI व LiDAR तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट मूल्यांकन

    बोरीवली परिसर आता स्मार्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिरवागार होणार आहे. येथील सुमारे 10 हजार झाडांचे AI आणि LiDAR तंत्रज्ञानाद्वारे स्मार्ट मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. झाडांचे वय, आरोग्य, उंची आणि धोका याची अचूक माहिती आता डिजिटल पद्धतीने मिळणार आहे. AI आणि LiDAR तंत्रज्ञानामुळे कोणते झाड धोकादायक आहे, कोणते रोगट आहे आणि कोणत्या झाडाला तातडीने उपचारांची गरज आहे हे काही मिनिटांत समजणार आहे. पावसाळ्यात झाडे पडून होणारे अपघात रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

  • 06 Jun 2026 10:57 AM (IST)

    देशात आता हाय-इथेनॉल फ्यूलची अधिकृत विक्री सुरु

    देशात आता हाय-इथेनॉल फ्यूलची अधिकृत विक्री सुरु झाली आहे. हे एक मोठं पाऊल आहे. E85 ला पारंपारिक पेट्रोल-डिझेलला पर्यायी इंधन मानलं जात आहे.

  • 06 Jun 2026 10:46 AM (IST)

    श्रीकांत शिंदे यांचे चौरंगावर बसवून विधिवत पूजन

    जळगावात लाडक्या बहिणीच्या वतीने अधिक मासानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत. खानदेशात अधिक मासानिमित्ताने जावई तसेच भाचा यांचे पूजन करण्याची परंपरा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ असल्याने भाचा या नात्याने श्रीकांत शिंदे यांचे पूजन करण्यात आले. शिवसेना महिला जिल्हा आघाडीसह लाडक्या बहिणींच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांचे चौरंगावर बसवून विधिवत पूजन करण्यात आले.

  • 06 Jun 2026 10:27 AM (IST)

    टेक्नॉलॉजी ऑन व्हील्सच्या उद्घाटन कार्यक्रमाला येणार शरद पवार

    विद्या प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम टेक्नॉलॉजी ऑन व्हील्सच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. पुण्यातील विद्या प्रतिष्ठानच्या शारदा निकेतन गर्ल हॉस्टेल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

  • 06 Jun 2026 10:13 AM (IST)

    नाशिकमध्ये बंडखोरीवर तोडगा नाहीच निघाला

    गिरीश महाजन आणि उदय सामंत रिकाम्या हाताने परतले.गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम. काल दिवसभर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडून गोकुळ गीते यांच्या मन धरणीचा प्रयत्न सुरु होते. मात्र गोकुळ गीते यांनी दोन्ही नेत्यांची भेट टाळली.

  • 06 Jun 2026 10:11 AM (IST)

    किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

    किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सुरु आहे. शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी किल्ल्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. लाखो शिवभक्त रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाले आहेत. संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर सोहळा सुरु आहे. संपूर्ण परिसर महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला.

  • 06 Jun 2026 10:01 AM (IST)

    अभिजीत दीपके जंतर-मंतरवर पोहोचले

    कॉकरोच जनता पक्षाचं दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार असून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.  अभिजीत दीपके जंतर-मंतरवर पोहोचले असून थोड्याच वेळात आंदोलन सुरू होईल.

  • 06 Jun 2026 09:54 AM (IST)

    सलून व्यवसाय मध्ये 20 टक्के वाढ होणार

    सलून व्यवसाय मध्ये 20 टक्के वाढ होणार असल्याची माहिती सलून व्यवसायिकांनी दिली आहे. दुकानाचे भाडं ,इलेक्ट्रिसिटी बिल, नोकरदारांचा पगार तसेच कॉस्मेटिक वस्तू आणि इंधनाच्या दरामुळे हे दरवाढ होणार असल्याची माहिती सलून व्यावसायिकांनी दिली.

  • 06 Jun 2026 09:36 AM (IST)

    नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते संसद मार्ग पोलिस पोलिस ठाण्याबाहेर जमायला सुरूवात

    दिल्ली -कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते संसद मार्ग पोलिस पोलिस ठाण्याबाहेर जमायला सुरूवात झाली आहे.  दिल्ली पोलिसांकडून सर्व आंदोलकांना जंतर मंतर इथे जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून ऊद्घोषणा सुरू.

  • 06 Jun 2026 09:24 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये फाटलेल्या होर्डिंग्जमुळे अपघाताचा धोका; मान्सूनपूर्व वाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता

    पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या अनेक जाहिरात होर्डिंग्जवरील फ्लेक्स फाटलेल्या अवस्थेत आहेत.सध्या मान्सूनपूर्व जोरदार वारे वाहत असल्याने हे फाटलेले फ्लेक्स आणखी सैल होऊन रस्त्यावर पडण्याची किंवा होर्डिंगच्या रचनेला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत.

  • 06 Jun 2026 09:14 AM (IST)

    तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चा कडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

    तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चा कडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा कडून आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याला भाजप आमदार मंदा मात्रे या उपस्थित होत्या.   छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात मंदिर प्रशासनानेही शिवराज्याभिषेक साजरा करावा अशी मागणी करण्यात आली. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीला मंदिर प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नाही, मंदिर प्रशासनाच्या भूमिकेमुळे शिवभक्त नाराज झालेत.

  • 06 Jun 2026 09:09 AM (IST)

    अभिजीत दिपके यांच्या काकांचे अश्रू अनावर

    हिंगोली- हे भाजप सरकार काही करू शकते म्हणत अभिजित दिपके यांचे काका विलास दिपके यांनाअश्रू अनावर झाले.  अभिजीत दिपके हे आज जंतरमंतरवर आंदोलन करणार आहेत.

  • 06 Jun 2026 09:05 AM (IST)

    घाटकोपर मधील भटवाडी परिसरात दररोज रात्री वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण

    घाटकोपर पूर्वेकडील भटवाडी परिसरात दररोज रात्री वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण झालेत. गेल्या 5 दिवसापासू रात्री ११ ते सकाळी पहाटे ५ पर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार घडत आहे. ऐन उन्हाळ्यात असा प्रकार होत असल्याने लहान मुलांना आणि आजारी नागरिकांना त्रास होत असून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

  • 06 Jun 2026 08:58 AM (IST)

    टीसीएस प्रकरणातील 9 खटल्यांची सुनावणी मंगळवारपासून होणार सुरू

    नाशिक – टीसीएस प्रकरणातील 9 खटल्यांची सुनावणी आता मंगळवारपासून सुरू होणार आहे. धर्मांतर, बलात्कार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांवर सुरू होणार सुनावणी. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्यांचे कामकाज सुरू होणार आहे. – मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींमध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, निदा खान, रझा मेमन यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश आहे.

  • 06 Jun 2026 08:57 AM (IST)

    भारतात पोहोचल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आई-वडिलांसोबत साधला संवाद

    छत्रपती संभाजीनगर – भारतात पोहोचल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आई-वडिलांशी संवाद साधला.  – मी विमानतळावर पोहोचलो आहे सुखरूप आहे तुम्ही कसे आहात अशी विचारणा अभिजीतने आई वडिलांकडे केली.  छत्रपती संभाजीनगर येथील घरासंदर्भातही केली विचारपूस.

    माझी काळजी करू नका, तुम्ही काळजी घ्या मी लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, असंही अभिजीत यांनी आई-वडिलांना सांगितलं.

  • 06 Jun 2026 08:52 AM (IST)

    कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन

    छत्रपती संभाजीनगर –  कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन असून अभिजीत दीपके भारतात  जाखल झाले आहेत.  नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

    दरम्यान दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराजवळ पोलीस बंदोबस्त कायम आहे.  अभिजीत दिपके यांच्या व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आल्यापासून आई वडीलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिपके हे जंतरमंतर येथे मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र शांततेने या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन त्यांनी तरूणांना केलं आहे. NEET, CUET इत्यादी राष्ट्रीय परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. नीट परीक्षांमधील पारदर्शकतेची मागणी त्यांनी केली आहे. संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीत दाखल झाले असून थोड्याच वेलात आंदोलनाला सुरूवात होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार आहे. यासाठी गडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. गडावर आज विविध लोककला देखील सादर केल्या जाणार आहेत. यासह देश, क्रीडा, मनोरंजन तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Follow Us