Maharashtra News LIVE : कल्याण : चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, घरातील साहित्य जळून खाक

Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून, त्यांची प्रसाद लाड भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांची प्रकृती देखली खालावली असून बीपी आणि शुगर कमी झाली असून त्यांना उपचाराची आवश्यकता आहे. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE :  कल्याण : चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, घरातील साहित्य जळून खाक
| Updated on: Sep 07, 2026 | 8:13 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. तर आज त्यांची भेट प्रसाद लाड घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारपर्यंत आमदार प्रसाद लाड भेट घेण्याची शक्यता आहे. भेटीदरम्यान मागण्यांबाबतीत काही तोडगा निघाला की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाला तपासणी करण्यास दोनदा नकार दिला. बीपी आणि शुगर कमी झाली असून त्यांना उपचाराची आवश्यकता आहे. तर, पुण्यातील गणेशोत्सवातील तीन वर्षातील आवाजाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. डीजेच्या 2023 ते 25 पर्यंत सर्वच आवाजाची नोंद 100 डिसिबलच्या वर झाली आहे. याच कारणामुळे आता डीजे मुक्त गणेश उत्सवाच्या मागणीसाठी यंदा पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे, राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे निमंत्रण दिले जाणार. पंतप्रधान राष्ट्रपती देश पातळीवरील मंत्री नेते उपस्थित असणार असल्याने राहुल गांधी यांना देखील निमंत्रण दिलं जाणार आहे… यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Sep 2026 07:54 PM (IST)

    गोंदियात ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे धरणे आंदोलन

    जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आली. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या अत्यंत संतापजनक घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा गोंदिया यांच्या वतीने आज गोंदिया जिल्हाभर राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. ग्रामसेवक स्व. प्रल्हाद पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोषींवर तातडीने व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

  • 01 Sep 2026 07:45 PM (IST)

    कल्याण : चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, घरातील साहित्य जळून खाक

    कल्याण पूर्वेत चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. तिसगावच्या अयोध्या नगरीतील उषा किरण या पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


  • 01 Sep 2026 07:40 PM (IST)

    चंद्रपूर : आश्रमशाळेतील जेवणात पाल पडल्याने 31 विद्यार्थ्यांना विषबाधा

    चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या नगराळा गावातील अमृत नाईक खाजगी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वरणाच्या भांड्यात पाल पडल्याने 31 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती पुढे आली आहे. आज सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना जेवण दिले होते. मुलींच्या जेवणानंतर मुले जेवत होती. मात्र वरणाच्या भांड्यात पाल पडल्याचे बघितल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मुलींनी जेवण करत असलेल्या मुलांना याविषयी सांगितल्यानंतर सर्वांनाच मळमळ- उलटीचा त्रास होऊ लागला. यापैकी 31 विद्यार्थ्यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 01 Sep 2026 07:27 PM (IST)

    चंद्रपूर : कोळसा खाण आणि वीज केंद्र कर्मचाऱ्यांच्या पदव्यांची होणार पडताळणी

    शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणाऱ्या बनावट पदवी आणि गुणपत्रिका रॅकेटचा चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार परिमल गौरकार आणि त्याचा साथीदार अक्षय खोब्रागडे यांच्यासह आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत बनावट पदवी, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे लाखो रुपयांमध्ये विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या कारवाईत जवळपास 15 ते 20 बनावट पदव्या, प्रिंटर, लॅपटॉप आणि दोन आलिशान वाहने जप्त केली आहेत. आता या प्रकरणाचा तपास आणखी व्यापक करण्यात आला आहे. चंद्रपुरातील सरकारी कोळसा कंपनी आणि चंद्रपूर वीज केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांचीही पडताळणी केली जाणार आहे.

  • 01 Sep 2026 07:15 PM (IST)

    अकोला : पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषण

    अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील जोगळखेड ग्रामपंचायतीतील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी आज 1 सप्टेंबर रोजी बाळापूर पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तर जोगळखेड ग्रामपंचायतीमध्ये 15 व्या वित्त आयोगातून आरओ फिल्टर खरेदी करताना एमबी, सीसी, टीएस तसेच इतर दस्तऐवजांची चौकशी करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

  • 01 Sep 2026 06:37 PM (IST)

    एमपीएससी पेपरफुटी प्रकरण, आरोपीला ऋतुजा पाटील हिला चौकशीसाठी मुंबईला नेणार

    एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिला अटक केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने ऋतुजा पाटील हिला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात तिच्या अटकेची नोंद करण्यात आली आहे.  वैद्यकीय तपासणीनंतर ऋतुजा पाटील हिला पुढील तपासासाठी मुंबईला नेण्यात येणार आहे.

  • 01 Sep 2026 06:16 PM (IST)

    जळगावमध्ये अमलीपदार्थांची तस्करी, एकाला पोलिसांनी केली अटक

    जळगावमध्ये अंमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट एमआयडीसी पोलिसांनी उद्धवस्त करत  एकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ९६३ ग्रॅम अंमली पदार्थ इफेड्रिन (Ephedrine) आणि २ किलो ११४ ग्रॅम गांजा असा ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल या आरोपीला अटक केली आहे.

  • 01 Sep 2026 04:52 PM (IST)

    अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद!

    अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  एफडीएच्या निर्णयानंतर बबन वडापावने निर्णय घेतला आहे. तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं वडापाव विक्रेत्यांकडून पालन करण्यात येत आहे.

  • 01 Sep 2026 04:44 PM (IST)

    किर्गिस्तानमध्ये भविष्यातील आराखड्यावर चर्चा: पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “किर्गिझ प्रजासत्ताकाच्या यशस्वी दौऱ्यातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. एससीओ शिखर परिषदेदरम्यान झालेल्या विविध बैठकांमधून भारताला ठोस लाभ मिळतील. एससीओच्या पुढील 25 वर्षांच्या योजना पाहता, भविष्यासाठीच्या आराखड्यावरही चर्चा झाली. किर्गिझ प्रजासत्ताकातील भारताशी संबंधित लोकांशी माझा सुखद संवाद झाला आणि बिश्केक येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. मी तेथील जनता, सरकार आणि अध्यक्ष झापारोव यांचे त्यांच्या आपुलकी आणि स्नेहपूर्ण वागणुकीबद्दल आभार मानतो.”

  • 01 Sep 2026 04:35 PM (IST)

    ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर मंत्र्यांनी बहिष्कार टाकला

    ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आहे. ओबीसी समाजाच्या महामंडळांना आणि विविध योजनांना राज्य सरकारकडून योग्य निधी मिळत नसल्याने नाराज होऊन मंत्र्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मंत्री छगन भुजबळ मंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय राठोड यांचा बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

  • 01 Sep 2026 04:25 PM (IST)

    नेपाळमधील पुरामुळे मृतांचा आकडा 1003 वर पोहोचला

    एका नेपाळी अधिकाऱ्याने सांगितले की, पुरामुळे मृतांचा आकडा 1003 वर पोहोचला आहे. हिमालयातील एका हिमनदीचा कडा कोसळल्यामुळे हा भीषण प्रलय आला होता. अजूनही काही लोकं बेपत्ता असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

  • 01 Sep 2026 04:18 PM (IST)

    बॉलिवूड अभिनेता सोनू सूद पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नेपाळला पोहोचला

    बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नेपाळमधील पूरग्रस्तांना मदत साहित्य वाटप करण्यासाठी काठमांडूमध्ये दाखल झाला आहे. सोनू सूद म्हणाला की, “आम्ही पूरग्रस्तांना भेटण्यासाठी आणि त्यांना मदत साहित्य वाटप करण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही त्यांचे जीवन पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करू. आम्ही मोठ्या प्रमाणात ब्लँकेट्स आणि खाद्यपदार्थ आणले आहेत. येत्या काही महिन्यांत नेपाळला मदत मिळत राहील, हे सुनिश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न करू.”

  • 01 Sep 2026 04:09 PM (IST)

    सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगेंची भेट घेणार

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून आंदोलनाची हाक दिली आहे. विखे पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत आणि प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार आहेत. जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न आहे.

  • 01 Sep 2026 03:51 PM (IST)

    शिवतीर्थकडे जाणारे भाजयुमोचे कार्यकर्ते ताब्यात

    भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ते राज ठाकरेंच्या शीवतीर्थच्या दिशेने निघाले होते. माहीममधील आंदोलनानंतर वातावरणात तणावा, शिवतीर्थच्या दिशेने निघालेल्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शिवतीर्थ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं.

  • 01 Sep 2026 03:47 PM (IST)

    सुट्टं तेल विक्रीसाठी 1 वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय

    सुट्टं तेल विक्रीसाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केला. मात्र 1 वर्षानंतर मुदतवाढ मिळणार नाही. वर्षभरात प्रत्येकाने  व्यवसायात अनुकूल बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. सुट्टं तेल विक्री संदर्भात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

  • 01 Sep 2026 03:42 PM (IST)

    भाजयुमो आणि मनसेचे काही कार्यकर्ते ताब्यात

    अमित ठाकरेंविरोधात भाजयुमोतर्फे माहीम येथे आंदोलन सुरू आहे.  मात्र भाजयुमो आणि मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

  • 01 Sep 2026 03:39 PM (IST)

    मुंबई – भाजपचे माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात आंदोलन, भाजपच्या आंदोलनस्थळी मनसेचे कार्यकर्तेही पोहोचले

    अमित ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवायला लावला, त्यामुळे भाजप नाराज असून आज माहीममध्ये भाजयुमोतर्फे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र भाजपच्या आंदोलनाच्या ठिकाणी मनसेचे काही कार्यकर्ते गेले आहेत. शिवतीर्थावरून काही कार्यकर्ते माहिमच्या आंदोलनाच्या ठिकाणी गेल्याची माहिती समोर आली आहे.

  • 01 Sep 2026 03:34 PM (IST)

    सुट्ट्या खाद्यतेलाबाबत लवकरच निर्णय होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक सुरू

    सुटं खाद्य तेलाबाबत सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.  एफडीएने सुट्टे तेल खाद्य विक्रीवर बंदी आणली होती. मात्र आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठक  सुरू झाली असून सुटे खाद्य तेल विक्रीला परवानगी मिळणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

  • 01 Sep 2026 03:17 PM (IST)

    इगतपुरी तालुक्यात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, एका रूग्णावर उपचार सुरू

    इगतपुरी तालुक्यात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव झाला असून सद्य स्थितीला एका रुग्णावर उपचार सुरू आहे. तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार संशयित रुग्णांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.   स्वाईन फ्ल्यूच्या शिरकावाने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

  • 01 Sep 2026 03:12 PM (IST)

    अमित ठाकरेंविरोधात भाजप माहीममध्ये करणार आंदोलन, शीवतीर्थाबाहेर मनसेचे कार्यकर्ते जमले

    मनसे नेते अमित ठाकरेंविरोधात वातावरण तापलं असून भाजयुमोतर्फे माहीम येथे आंदोलन करण्यात येणार आहे. तर शिवतीर्थाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.  शिवतीर्थ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 01 Sep 2026 03:06 PM (IST)

    जेन झींसाठी सरकारचं महत्वाचं पाऊल, शा मुक्त अभियानासाठी कॅबिनेट बैठकीत महत्वाचा निर्णय

    नशा मुक्त अभियानासाठी कॅबिनेट बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.  अमली पदार्थावर सर्वतोपरी नष्ट करण्यासाठी “वुल्फ ऑफ गव्हर्मेंट अप्रोच” धोरण जाहीर करण्यात आलं.  जेन झींसाठी सरकारने महत्वाचं पाऊल उचललं.  आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. जेन -झी नशेच्या आहारी जाऊ नये यासाठी सरकारचं नवं धोरण.

  • 01 Sep 2026 02:56 PM (IST)

    नेपाळमधील पूरस्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

    नेपाळमधील पूरस्थितीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील 406 जणांच्या तक्रारी प्राप्त. 406 जणांपैकी 342 नागरिकांसोबत संपर्क झाल्याची माहिती. 206 जण आतापर्यंत नेपाळमधून महाराष्ट्रात परतले. 60 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती. तर 4 बेपत्ता असलेल्यांची माहिती लिंकद्वारे प्राप्त झाली असून संपर्क झालेला नाही

  • 01 Sep 2026 02:47 PM (IST)

    मंत्र्यांच्या ताफ्यात HSRP नंबर प्लेट नसलेली चार चाकी गाडी

    सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होणार. मंत्र्यांच्या ताफ्यात HSRP नंबर प्लेट नसलेली चार चाकी गाडी. पोलिसांकडून HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांना परवानगी. सर्वसामान्य नागरिकांना कोट्यावधीचा दंड, मात्र प्रशासनाकडूनच नियमाचे उल्लंघन. महाराष्ट्र शासन आणि M नावाचा लोगो असलेल्या गाडीलाच HSRP नंबर प्लेट नाही.

  • 01 Sep 2026 02:37 PM (IST)

    एसटीमध्ये आजपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

    एसटीमध्ये आजपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य. NCMC कार्ड नसेल तर आजपासून तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागणार. आज पहिला दिवस असल्याने काही प्रवाशांकडे NCMC कार्ड नाहीत

     

  • 01 Sep 2026 02:28 PM (IST)

    अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे सीईओ उद्या निश्चित होणार?

    अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे सीईओ उद्या निश्चित होणार? सीईओसाठी आज ट्रस्टकडे तीन नावं सोपवली जाणार. सीईओसह ट्रस्टवर तीन रिक्त पदांवर नियुक्त्या होणार. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची उद्या महत्त्वाची बैठक

  • 01 Sep 2026 02:22 PM (IST)

    अमित ठाकरेंसह 18 जणांवर गुन्हे दाखल

    अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो हटवल्याचं प्रकरण. मनसे विद्यार्थी सेनेच्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक. अमित ठाकरेंसह 18 जणांवर गुन्हे दाखल. मनसेचे पदाधिकारी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल

  • 01 Sep 2026 02:11 PM (IST)

    नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा

    नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा. विद्यार्थ्यांचा मोर्चा आदिवासी विकास भवनावर धडकणार. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा. अशोक उईकेंचा राजीनामा घ्या, मोर्चेकरांची मागणी. राहुल गांधी उद्या नाशिक दौऱ्यावर. अशोक उइकेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः राहुल गांधी हे उद्या उपस्थित राहण्याची शक्यता आहेत

  • 01 Sep 2026 02:00 PM (IST)

    चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात पावसाची हजेरी; पिकांना मिळाले जीवनदान

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. पावसाअभावी कपाशी, मका, सोयाबीन यासह खरीप पिकांवर मोठा परिणाम होत होता. आणखी काही दिवस पाऊस लांबला असता उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता होती. मात्र, आज झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या पावसाने खरीप पिकांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे.

  • 01 Sep 2026 01:50 PM (IST)

    आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांना बच्चू कडू यांचे मोठे आवाहन

    जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्नी तांडव प्रकरणाबाबत मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा झाली. या प्रकरणात कुणावरही गय करू नका. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे राज्य चालवलं आपलं तुपलं नाही तर सगळ्यांवर कारवाईच्या अपेक्षा केल्या. आरोग्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत जाहीर केली. ती तातडीने मदत दिली पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.

  • 01 Sep 2026 01:40 PM (IST)

    फुटपाथवर लावलेल्या बेकायदेशीर हातगाड्यांवर मनपा कडून अखेर कारवाई

    मिरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांचे पती विनोद मेहता यांच्या ऑफिसच्या बाजूला फुटपाथवर लावलेल्या बेकायदेशीर हातगाड्यांवर मनपा कडून अखेर कारवाई करण्यात आली आहे. शहरभर ‘झिरो टॉलरन्स’चा दावा करणाऱ्या महापौरांच्याच पतीच्या बीपी रोडवरील ऑफिसच्या बाजूला हे बेकायदेशीर अतिक्रमण थाटण्यात आले होते.असा समाजसेवक करण पवारांचा आरोप आहे. समाजसेवक करण पवार यांनी पालिकेच्या परवानगीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर हे अतिक्रमण तातडीने हटवण्यात आले. फुटपाथ बंद झाल्याने नागरिकांना थेट मुख्य रस्त्यावरून चालावे लागत होते त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याने शहरात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 01 Sep 2026 01:30 PM (IST)

    धाराशिव भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर

    धाराशिव जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि विधानपरिषद आमदार बसवराज पाटील यांच्या गटांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.काही दिवसांपूर्वी बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आणि बॅनरवरून राणाजगजितसिंह पाटील यांना डावलण्यात आले होते त्यानंतर आता उमरगा येथे शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री आरोग्य शिबिराच्या बॅनरवरही राणाजगजितसिंह पाटील यांचा फोटो नसल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे, बॅनरवर भाजपच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे फोटो असताना राणा पाटील यांचा फोटो नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  • 01 Sep 2026 01:19 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली

    मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे यांना उलट्याचा त्रास होत आहे. त्यांनी उपचारास आणि वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे.

  • 01 Sep 2026 01:11 PM (IST)

    लातूरमध्ये हेल्मेट सक्ती

    लातूर जिल्ह्यातल्या सर्वच राष्ट्रीय महामार्गांवर आज पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी आज सकाळपासूनच रस्त्यावर उतरत हेल्मेट न वापरणाऱ्या मोटारसायकल चालकांवर कार्यवाहीला सुरुवात केली आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयाने हेल्मेट न वापरणाऱ्या 54 पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांवर या अगोदरच दंडात्मक कार्यवाही करीत ,सेवा पुस्तिकेत नोंद घेण्याचे आदेश दिले आहेत.

  • 01 Sep 2026 01:00 PM (IST)

    चाळीसगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण; ४७००-४८०० वरून भाव ४ हजारांच्या आसपास

    जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे. आठ दिवसांपूर्वी कांद्याला ४७०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र, गेल्या आठ दिवसांत कांद्याच्या दरात साधारण ७०० ते ८०० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या कांद्याला सुमारे ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास भाव मिळत असून, दरात घट झाली असली तरी हा भाव समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरातील ही घसरण पुढेही कायम राहणार की पुन्हा कांद्याच्या दरात तेजी येणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • 01 Sep 2026 12:54 PM (IST)

    SIR फॉर्म झेरॉक्स प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक

    SIR फॉर्म झेरॉक्स प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. पनवेल आणि नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.

  • 01 Sep 2026 12:51 PM (IST)

    डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रेंनी डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी SC कडून चिंता व्यक्त

    डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रेंनी केलेल्या मारहाणप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांप्रकरणी चिंता व्यक्त करत हायकोर्टाने स्वत:हून दखल घेणं योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. याप्रकरणाची पुढील सुनावणी 7 सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • 01 Sep 2026 12:48 PM (IST)

    जगात परीक्षा होतात पण इथंच पेपर फुटतात- सुप्रिया सुळे

    सरकार आल्यापासून रोज पेपर फुटतायत, नेमकं काय सुरू आहे? जगात परीक्षा होतात पण इथंच पेपर फुटतात. मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप सरकार रोज करतंय. चोऱ्यामोऱ्या करणारे कसे सापडत नाहीत, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

  • 01 Sep 2026 12:38 PM (IST)

    कुठल्याही चुकीच्या गोष्टीला आम्ही विरोध करणारच- सुप्रिया सुळे

    कुठल्याही चुकीच्या गोष्टीला आम्ही विरोध करणारच. महागाई वाढतेय. आंदोलनं सुरू आहेत, राज्यात नेमकं काय सुरू आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

  • 01 Sep 2026 12:32 PM (IST)

    एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर- सूत्र

    एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजरअसल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे वकिलांची टीम भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. एकनाथ शिंदे थेट दिल्लीला रवाना होणार आहेत. उद्यापासून पक्ष, चिन्हाबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे.

  • 01 Sep 2026 12:24 PM (IST)

    लक्ष्मण हाकेंसह आंदोलकांचा पाटस टोलनाक्यावर रास्ता रोको

    लक्ष्मण हाकेंसह आंदोलकांनी पाटस टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन केलं. पाटस टोलनाक्यावर ओबीसी आंदोलकांना रोखण्यात आलं आहे. ओबीसी एल्गार मोर्चा पुण्याच्या पाटस टोलनाक्यावर पोहोचला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक हाकेंसोबत चर्चा करत आहेत.

  • 01 Sep 2026 12:13 PM (IST)

    समृद्धी महामार्गावर वाहतुकीला ब्रेक; मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली

    समृद्धी महामार्गावर मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. ITMS अंतर्गत CCTV Gantry बसविण्याच्या कामामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिन्नर ते भरवीरदरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. तर नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत बंद असेल.

  • 01 Sep 2026 12:07 PM (IST)

    दिल्लीत हालचाली वाढल्या असून एकनाथ शिंदे दुपारनंतर दिल्लीला जाणार- सूत्र

    दिल्लीत हालचाली वाढल्या असून एकनाथ शिंदे दुपारनंतर दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची माहिती आहे.

  • 01 Sep 2026 12:00 PM (IST)

    संभाजीनगर-मनसे वाहतूक सेनेचा रॅपिडो विरोधात मोर्चा

    संभाजीनगर-मनसे वाहतूक सेनेचा रॅपिडो विरोधात मोर्चा, रॅपिडो बाईक सेवा बंद करण्याची मागणी, SSC बोर्ड ते आरटीओ कार्यलयापर्यंत मोर्चा

  • 01 Sep 2026 11:54 AM (IST)

    धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जालना पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू

    धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जालना पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू. सौंदलगाव पासून तर शहागड पर्यंत पोलिसांची महामार्गांवर पेट्रोलिंग. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी. त्याचबरोबर सरकारचा शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी मध्ये येत असल्याने पोलीस देखील अलर्ट मोडवर आहे.

  • 01 Sep 2026 11:50 AM (IST)

    नागपुरातील क्लोरिन गॅस गळती घटनेनंतर क्लोरिन गॅस वापरावर बंदी

    नागपुरातील क्लोरिन गॅस गळती घटनेनंतर क्लोरिन गॅस वापरावर बंदी, पाच जलशुद्धीकरण प्रकल्पातन क्लोरिन गॅस वापरावर बंदी, प्रकल्पात क्लोरिन  गॅसऐवजी ब्लिचिंग पावडरचा वापर करणार.

  • 01 Sep 2026 11:44 AM (IST)

    दुष्काळ व जल नियोजनासाठी उद्या दिल्लीतील उच्चस्तरीय बैठक पार

    दुष्काळ व जल नियोजनासाठी उद्या दिल्लीतील उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे.

  • 01 Sep 2026 11:40 AM (IST)

    ठाण्यात प्रस्तावित ‘अंतर्गत रिंग मेट्रो’ला नागरिकांचा तीव्र विरोध!

    ठाणे शहरातील प्रस्तावित ‘अंतर्गत रिंग मेट्रो’ प्रकल्पाविरोधात ठाणेकर रस्त्यावर उतरले होते. पोखरण रोड क्रमांक २ येथे ‘Thane Against Integral Ring Metro’ या नागरिक मंचाच्या वतीने भव्य स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आयोजकांच्या म्हणण्यानुसार एक हजाराहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करत या प्रकल्पाला विरोध नोंदवला. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी वाढण्यासोबतच पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि सार्वजनिक निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होईल, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

     

  • 01 Sep 2026 11:34 AM (IST)

    मुंबईतील वांद्रे प्रकरणात मोठी अपडेट

    मुंबईतील वांद्रे येथे मोबाईलवर बोलत असलेल्या एका महिला चालकाने ८ वर्षांच्या चिमुरड्याला गाडीखाली चिरडले आहे. हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजता वांद्रे पश्चिम जिजामाता रोड समोरील जॉन बाप्टिस्ट रोडवर झाला, मृत मुलाचे नाव अंश गुप्ता असून तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, तब्बल 15 वर्षांनी गुप्ता कुटुंबात पाळणा हलला होता, आणि आज 1 सप्टेंबरला अंशचा वाढदिवस आहे.अंशचे वडील बँडस्टँडवर शेंगदाणे विकतात, तो रस्ता ओलांडत असताना आरोपी मेघा रावल हिची कार भरधाव वेगात आली, ती कार चालवताना मोबाईलवर बोलत होती, त्यामुळे तिला अंश दिसला नाही आणि कारची दोन्ही डाव्या बाजूची चाके अंशच्या छातीवरून गेली. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे, आरोपी मेघा रावल पेशाने फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट आहे, तिच्या कुटुंबीयांनी साक्षीदार संदीप सिंह यांना जबाब बदलण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याचा आरोप संदीप सिंह यांनीच केला आहे. वांद्रे पोलिसांनी मेघा रावलवर BNS कलम 105, 281, 125 सह MV Act 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • 01 Sep 2026 11:30 AM (IST)

    मिरा रोडमध्ये पोलिसांनी आरोपींची रस्त्यावरुन धिंड काढली

    मिरा रोडमध्ये पोलिसांनी आरोपींची रस्त्यावरुन धिंड काढली आहे. दारु पिऊन पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे.

  • 01 Sep 2026 11:26 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मजबूत – अर्जुन खोतकर

    अर्जुन खोतकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मजबूत , कामाची पद्धत पाहून अनेक जण शिवसेनेत यायला तयार आहेत, आॅपरेशन टायगर हे सक्रिय आहे… जरांगे पाटील यांची समजूत काढली जाईल , त्यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जात आहे… एकनाथ शिंदेंनी आपली बाजू मांडलीये. संजय राऊत यांना कोण विचारतेय त्यांच्या बोलण्याला महत्व नाही … ते ऊलट सुलट बोलत असतात काय राहीलंय आत्ता त्यांच्याकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुणीही असा अपमान करता कामा नये …

  • 01 Sep 2026 11:22 AM (IST)

    पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत चष्मात छुपा कॅमेरा बसवून गैरप्रकार समोर

    पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत चष्मात छुपा कॅमेरा बसवून गैरप्रकार केल्याच समोर. छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही मधून गैरप्रकार केल्याचं आलं समोर. गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे ,विष्णुकांत वाघमारे यांनी केली होती कनिष्ठ अभियंता परीक्षेत कॉपी. टीसीएसच्या योगेश राठोड आणि विकास गायकवाडची विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी साथ. या प्रकरणी सहा जणाविरोधात या आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण मिळाल्याने निवड झाली होती. पुणे मनपाने 169 कनिष्ठ अभियंता पदासाठी एप्रिलमध्ये घेतली होती परीक्षा…. मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर , नांदेड संभाजीनगरला झाली होती परीक्षा… 22 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी कनिष्ठ अभियंता पदासाठी दिले होते परीक्षा…

  • 01 Sep 2026 11:17 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर आजपासून वाहतुकीला काही वेळ ब्रेक !!

    समृद्धी महामार्गावर आजपासून वाहतुकीला काही वेळ ब्रेक !!ITMS अंतर्गत CCTV Gantry बसविण्याचे कामामुळे वाहतूक राहणार बंद…
    सिन्नर ते भरवीर दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत वाहतूक राहणार बंद…नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी ३ ते ४ बंद…आज १ आणि २ सप्टेंबरला सिन्नर–भरवीर दरम्यान वाहतूक निर्बंध…४, ५ आणि ७ सप्टेंबरला भरवीर–इगतपुरीदरम्यान वाहतूक बंद..
    मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना १२ ते १ दरम्यान ब्रेक..नागपूर दिशेची वाहतूक ३ ते ४ दरम्यान थांबणार.. प्रवाशांनी प्रवासाचे वेळापत्रक नियोजित करण्याचे आवाहन..

  • 01 Sep 2026 11:14 AM (IST)

    मालाड अपघात प्रकरणातील 70 वर्षीय आरोपी कृष्णा शांताराम चमनकर याला कोर्टाकडून जामीन

    मालाड अपघात प्रकरणातील 70 वर्षीय आरोपी कृष्णा शांताराम चमनकर याला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जामीनपात्र गुन्हा असल्याने कोर्टाने आरोपीला जामीन दिला आहे. या घटनेमध्ये प्रियांकासोबत तिचे पती मयंक हे देखील जखमी झाले होते, प्रियांकाच्या मृत्यूनंतर तिच्या अंतिम दर्शनाला आणि अंतिम यात्रेमध्ये मयंक व्हीलचेअरवर पोहोचले होते.

  • 01 Sep 2026 11:10 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे यांच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वनपर भेट 

    पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे यांच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वनपर भेट. शिल्पा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. शिल्पा गवारे यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असून हुंडाबळी ठरल्याचा आरोप कलाटे कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.शिल्पा यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

  • 01 Sep 2026 11:05 AM (IST)

    ऋषिकेशने एमपीएससीची बदनामी केली- एमपीएससी प्रमुख आणि सचिव

    एमपीएससी प्रमुख आणि सचिव म्हणाले होते ऋषिकेशने एमपीएससीची बदनामी केली आहे त्यामुळे तत्काळ आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू आता एमपीएससी आयोगाने स्वतः जाहीर केले आहे की पेपर फुटी झाली आहे त्यामुळे तत्काळ आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा. आज ऋषिकेश आयोगाच्या कार्यालयात आला आहे मात्र तो गुन्हेगार आहे अशी वागणूक पोलिसांनी दिली आहे. हे योग्य नाही. ऋषिकेशची तपासणी करण्यात आली चप्पल तपासण्यात आली शर्टचे बटण देखील तपासण्यात आले. जो तक्रारदार त्यालाच गुन्हेगाराची वागणूक दिली जात आहे

  • 01 Sep 2026 10:52 AM (IST)

    शिल्पा गवारेंच्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळेंनी घेतली सांत्वनपर भेट

    पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे यांच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वनपर भेट घेतली. शिल्पा यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. शिल्पा गवारे यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असून हुंडाबळी ठरल्याचा आरोप कलाटे कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. शिल्पा यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

  • 01 Sep 2026 10:44 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती

    – आजपासून छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट अनिवार्य, हेल्मेटशिवाय आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या गेटवरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. इतर सामान्य नागरिकाचीही पोलीस आयुक्त कार्यालयात विना हेल्मेट ये जा सुरू आहे.
    तर काही कर्मचाऱ्यांकडून हेल्मेट सक्तीच्या नियमाचे पालन सुरू आहे.

  • 01 Sep 2026 10:35 AM (IST)

    मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी मराठा आंदोलक आक्रमक, रस्ता अडवला

    मनोज जरांगे पाटलांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. या दिवशी धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.कळंब – ढोकी महामार्गावर रस्त्यावर टायर जाळत मराठा आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केला. यात मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले. सकाळची वेळ असल्याने कर्मचारी विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.  यामुळे महामार्गावर लागल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

  • 01 Sep 2026 10:23 AM (IST)

    डॉक्टर राजेंद्र रुपनवर प्रकरण :फडतरी गावातील नागरिक आक्रमक

    फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे मूळ गाव असणाऱ्या फडतरी गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत.  फलटण – पंढरपूर मार्गावरील नातेपुते याठिकाणी रास्तारोको आंदोलन करणार आहे.  आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कारवाई तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 01 Sep 2026 10:12 AM (IST)

    फडणवीस सरकारचं शिष्टमंडळ घेणार जरांगे पाटील यांची भेट

    मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मंत्री ऊदय सामंत आणि प्रसाद लाड सोबत जाणार आहेत. ते सरकारची बाजू मांडणार आहेत. आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर ठरणार भेटीची वेळ ठरणार आहे.

  • 01 Sep 2026 10:07 AM (IST)

    PM मोदी, अमित शहांना GDP कळतो का? संजय राऊतांचा सवाल

    जीडीपी वाढली आहे. पण जीडीपी PM मोदी, अमित शहांना कळतो का? देशात महागाई, बेरोजगारी याची उत्तर द्यावीत, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली. जीडीपी वाढला तर लोकांना धान्य देऊन जगवतात, त्यावर बोलावं, असे राऊत म्हणाले.

  • 01 Sep 2026 09:55 AM (IST)

    जालन्यात एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

    जालन्यात एसआरपीएफ जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजता कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अजय वाकोडे असं एसआरपीएफ जवानाचं नाव आहे. एसआरपीएफ जवानाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

  • 01 Sep 2026 09:40 AM (IST)

    शेतकऱ्याला कल्पना न देताच शेताच्या मधोमध विद्युत पोल

    उदरनिर्वाहासाठी कर्नाटकात गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याच्या शेतात पवनचक्की कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत वाहिनीचे पोल उभे केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा वाडी येथील शेतकरी हरिभाऊ कोकरे यांच्या शेतात हा प्रकार घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

  • 01 Sep 2026 09:30 AM (IST)

    ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या उपोषणाचा चौथा दिवस

    ब्राह्मण समाजातील मुला-मुलींना मोफत शिक्षण करून त्यांना स्वतंत्र वस्तीगृहाची व्यवस्था करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यासाठी जालन्यात सकल ब्राह्मण आक्रमक झाला आहे. मागच्या तीन दिवसापासून दीपक रणनवरे हे जालना शहरातल्या गांधी चमन परिसरात आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा आज चौथा दिवस.

  • 01 Sep 2026 09:20 AM (IST)

    गडचिरोली वन विभागात खळबळ! वनपरिक्षेत्राचे शेत्र सहाय्यक निलंबित

    गडचिरोली वन विभागात खळबळ माजली आहे. आसरअली वनपरिक्षेत्राचे शेत्र सहाय्यक विनोद गोलेलवार यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या आसरअली भागात वन तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यानंतर वन तस्करांकडून काही माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागल्यामुळे वन विभागाच्या क्षेत्र सहायकाला निलंबित करण्यात आले.

  • 01 Sep 2026 09:10 AM (IST)

    पाळधी-तरसोद बायपासवर मध्यरात्री ट्रक व तवेराच्या अपघातात

    जळगावातील पाळधी-तरसोद बायपासवर मध्यरात्री ट्रक व तवेराच्या अपघातात झाला. या अपघातात एक ठाण तर चौघे जखमी झाले आहेत. दुरुस्तीदरम्यान सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्याने कंपनीसह स्थानिक अधिकारी अशा तीन जणांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 01 Sep 2026 08:57 AM (IST)

    घराचे कर्ज फेडण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ ; पती, सासू-सासऱ्यांसह दिराविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

    घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे आणि दिराविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत करमाळा शहरातील एका खासगी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, लग्नानंतर सात-आठ महिन्यांनी पती वासिफ वाहिद शेख, सासू फेमीदा वाहिद शेख, सासरे वाहिद शेख आणि दीर आतिफ वाहिद शेख (सर्व रा. समृद्धी अपार्टमेंट, धानोरी, पुणे) यांनी घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरू केला.

  • 01 Sep 2026 08:50 AM (IST)

    देवरी तालुक्यात बांधकामाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू, तीन गंभीर जखमी….

    गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून भीषण अपघात झाला आहे…. ग्रामपंचायत गोटाबळी अंतर्गत येणाऱ्या भागी गावात घडलेल्या या दुर्घटनेत चार मजूर स्लॅबखाली दबले. यामध्ये एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत…. भागी गावातील अनिल बीसेन यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. हे काम ठेकेदाराला स्क्वेअर फुटाच्या हिशोबाने देण्यात आले होते…. ठेकेदाराने मजूर लावून बांधकामाला सुरुवात केली होती. दरम्यान, स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना स्लॅबचा आधार असलेल्या बल्ली खचल्याने संपूर्ण स्लॅब अचानक खाली कोसळला. यावेळी काम करणारे चार मजूर स्लॅबखाली दबले…. या दुर्घटनेत दिनेश नाईक, वय 38 वर्षे, रा. सालेगाव, ग्रामपंचायत मुल्ला, तालुका देवरी, यांचा मृत्यू झाला. तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत…. जखमी मजुरांना तातडीने देवरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे…. ठेकेदाराच्या कामातील कथित हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप मजुरांकडून केला जात आहे…. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे…. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, तसेच स्लॅबला योग्य आधार देण्यात आला होता का, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत…..

  • 01 Sep 2026 08:40 AM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात रात्री ९ वाजता देखील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी…

    मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर रात्री ९ वाजता सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये कॉलेज शाखेचे भव्य उद्घाटन हजारोंच्या उपस्थितीत पार पडले. रात्री उशिरापर्यंतही विद्यार्थ्यांची तोबा गर्दी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद कायम पाहवयास मिळालाय…

  • 01 Sep 2026 08:30 AM (IST)

    पुण्यातील ससून रुग्णालयात आयसीयू खाटासाठी आधी नोंदणी करण्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा निर्णय

    पुण्यातील ससून रुग्णालयात आयसीयू खाटासाठी आधी नोंदणी करण्याचा हॉस्पिटल प्रशासनाने निर्णय घेतला आहे.  अतिदक्षता विभागात(आयसीयू)खाट न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ आणि त्यातून डॉक्टरांशी होणारे वाट टाळण्यासाठी ससून रुग्णालय प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आयसीयु खाटाची गरज असल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी आधी ससून रुग्णांशी संपर्क साधून नोंदणी करावी: रुग्णालय प्रशासनाकडून  आवाहन करण्यात आले आहे. आयसीयु खाटाची नोंदणी करण्यासाठी ससून रुग्णालयाकडून 9225330535 हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

  • 01 Sep 2026 08:20 AM (IST)

    कळवा रुग्णालयातील जेवणात सापडले झुरळ, मनसेने उघड केला पालिकेचा भोंगळ कारभार

    ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला देण्यात आलेल्या रात्रीच्या जेवणात चक्क झुरळ आढळल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि पदाधिकाऱ्यांनी हा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आणला असून, यामुळे रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

  • 01 Sep 2026 08:11 AM (IST)

    पुणे शहरात खुनाच्या घटनांमध्ये वाढ

    पुणे शहरात खुनाच्या घटनांमध्ये वाढ करण्यात आली आहे.  शहरात आठ महिन्यात 61 खून आणि 82 खुनाचे प्रयत्न करण्यात आले.  पुण्यातील विविध गुन्ह्यांची आकडेवारी पुणे पोलिसांकडून  समोर आणण्यात आली.  गुन्हेगारीचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी उपयोजना सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे.

  • 01 Sep 2026 08:09 AM (IST)

    वीज बिलामुळे बंद असलेली शिराळा उपसा सिंचन योजना पुन्हा होणार सुरू

    अनेक दिवसापासून थकीत वीज बिलासाठी बंद असलेली परंडा तालुक्यातील शिराळा उपसा सिंचन योजना आमदार तानाजी सावंत यांच्या मदतीने पुन्हा एकदा सुरू होणार आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 22 दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्याची खरीप पिके करपू लागली आहेत, मात्र शिराळा सिंचन योजना परिसरातील शेतकऱ्यांना थकीत वीजबिला अभावी पिकाला पाणी देता येत नव्हते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते.

  • 01 Sep 2026 08:08 AM (IST)

    शिरूर शहरात मोकाट वळूंची दहशत; भाजी बाजारात पिठाच्या गिरणीत घुसले वळू, नागरिक भयभीत

    शिरूर शहरात मोकाट वळूंची दहशत वाढली आहे भाजी बाजारात पिठाच्या गिरणीत वळू घुसल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिक भयभीत झाली आहेत मोकाट वळवून चा बंदोबस्त करावा अशी मागणी शिरूर शहरातील नागरिकांमधून होत आहे एखाद्याचा जीव गेल्यावर शिरूर नगरपरिषद जागी होणार का? असावा लई संतप्त नागरिकांनी केला आहे.

  • 01 Sep 2026 08:08 AM (IST)

    पुण्यात सीएनजीचे दर शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर

    पुण्यात सीएनजीचे दर शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीनंतर सीएनजी दरात देखील मोठी वाढ होत आहे. पुण्यात सीएनजी दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली आहे.  पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजीला किलोमागे 97 रुपये 75 पैसे किमत लागू करण्यात आली आहे.  सीएनजी वाहन चालकांना आता दोन रुपयांचा करावा लागणार भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us