Maharashtra News LIVE : 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता
Maharashtra News LIVE Updates : पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजेच्या तयारीत असलेल्या 15 जणांना लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचा विधी दरम्यान बळी देण्यात येणार होता.

LIVE NEWS & UPDATES
-
सावंतवाडी : मोरडोंगरी-माजगाव परिसरात चोरट्यांनी 3 घरे फोडली
सावंतवाडी परिसरातील मोरडोंगरी-माजगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. बीएसएनएल कॉलनीत झालेल्या या घरफोडीत तब्बल तीन घरे फोडून चोरट्यांनी २५ लाख रुपयांचे ३१ तोळे सोन्याचे दागिने, ३५ ग्रॅम चांदी, रोकड आणि एक मोटारसायकलची चोरी केली आहे. या घटनेमुळे सावंतवाडी शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
-
पुणे : प्रेमप्रकरणातून तरुणावर जीवघेणा हल्ला
पुण्यातील येरवडा परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणावर भररस्त्यात धारदार शस्त्र आणि दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केला. एका तरुणीच्या प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?’ या संशयातून संतप्त तरुणाने जुन्या प्रियकराचा पाठलाग करत त्याला रस्त्यात गाठले आणि साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाल्याची माहिती असून, येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
-
-
21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संपूर्ण देशात चर्चा आहे. अशातच आता या विस्ताराची तारीख समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
-
शिवसेनेचे वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
शिवसेनेचे वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आली आहे. अरविंद सावंत यांनी सहा खासदारांच्या बंडखोरीविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. सुनावणीला हजर न राहिल्यास अनुपस्थितीत सुनावणी होईल. कोर्टाकडून नोटीशीत स्पष्ट ही बाब नमूद केली आहे.
-
भाजपाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची 22 ऑगस्टला पहिली बैठक
भाजपाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक 22 ऑगस्टला होणार आहे. नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत पहिली परिचय बैठक होणार आहे.
-
-
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा, मेट्रो कामावरून सुनावले खडेबोल
मुंबईकरांच्या जिवाची किंमत ह्या सरकारच्या राजवटीत शून्य झाली आहे का? आज मीरा रोड येथील मेट्रो लाईन 9 च्या कामादरम्यान थुंगा हॉस्पिटलजवळ मेट्रोचा स्लॅब आणि बांधकामाचे साहित्य खाली कोसळले. अत्यंत धक्कादायक म्हणजे, खालून जाणारी स्कुल व्हॅन थोडक्यात बचावली! जर आज काही अघटित घडलं असतं, तर ह्याला जबाबदार कोण असतं?
मुंबईकरांच्या जिवाची किंमत ह्या सरकारच्या राजवटीत शून्य झाली आहे का?
आज मीरा रोड येथील मेट्रो लाईन ९ च्या कामादरम्यान थुंगा हॉस्पिटलजवळ मेट्रोचा स्लॅब आणि बांधकामाचे साहित्य खाली कोसळले. अत्यंत धक्कादायक म्हणजे, खालून जाणारी स्कुल व्हॅन थोडक्यात बचावली!
जर आज काही अघटित घडलं…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 17, 2026
-
मीरा भाईंदरमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
मीरा भाईंदरमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला. मेट्रोचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एमएमआरडीएकडून संबंधित कंत्राटदारांना 12.5 कोटींचा दंड ठोठावला आहे. सिट्रा सीईजीवरही 1 कोटींची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली धर्मेंद्र प्रधान यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्या दरम्यान माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचीही भेट घेतली होती.
It was very nice to catch up with and meet my brother @dpradhanbjp ji during my #NewDelhi visit today. pic.twitter.com/eVO2q0PWOG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 17, 2026
-
भारत स्वभावतः हिंदू राष्ट्र आहे: बाबा रामदेव
उत्तराखंड राज्य परिषदेत बाबा रामदेव म्हणाले की, देश केवळ एका पंतप्रधानाच्या हातून चालवता येणार नाही. सर्व 145 कोटी नागरिकांनाही योगदान द्यावे लागेल. ते म्हणाले की, भारत स्वभावतः एक हिंदू राष्ट्र आहे. तथापि, हिंदू आणि मुस्लिमांच्या नावाखाली द्वेष करणे चुकीचे आहे. सनातनींच्या नावाखाली तणाव निर्माण करणे योग्य नाही. जे द्वेष पसरवतील, त्यांना देश धडा शिकवेल.
-
आमच्या कुठल्या महिलेवर बोललात तर याद राखा – खासदार बजरंग सोनवणे
त्याचे विचार किती सडलेले आहेत हे दिसते आहे. आमच्या कुठल्या महिलेवर बोललात तर याद राखा असा इशारा खासदार बजरंग सोनवणे यांनी दिला आहे. त्यांचे विचार किती सडलेले आहेत, हे दिसतंय, त्यामुळे या स्वतःला जे नेते म्हणवून घेत आहेत, त्यांना सांगायचंय त्यांचे सडलेले विचार आहेत. तुम्ही त्या वृत्तीचे आहात, तुमचे संस्कार काय, तुमचा विचार काय हे महाराष्ट्राला दिसतंय तुमच्या वागण्यातून. पण आमच्या कुठल्या महिलेवर बोललात तर याद राखा महाराष्ट्रात तुम्हाला लोकं फिरू देणार नाहीत असा इशारा खासदार बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.
-
शिक्षण प्रवेशाच्या नावाखाली फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इंस्टाग्रामवरील जाहिरातींच्या माध्यमातून पालकांशी संपर्क साधून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीतील 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
-
रेस कोर्सपासून ते वरळी कोस्टल रोडपर्यंत स्काय वॉक
रेस कोर्सपासून ते वरळी कोस्टल रोडपर्यंत स्काय वॉक बांधण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती सचिन अहिर यांनी म्हटले आहे.एमएमआरसीच्या पुढाकाराने मुंबई पालिकेच्या फंडातून हा स्कायवॉक बांधण्यात येणार असल्याचे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
-
गोंदियाच्या देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शेकडो विद्यार्थ्यांचा ठिय्या
गोंदियाच्या देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शेकडो विद्यार्थ्यांनी ठिय्या दिला. 5 ऑगस्टचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासकीय आदिवासी वस्तीगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 26 वर्षाची वयोमर्यादा आखून दिल्याने परिपत्रक रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे, तसेच दिवासी मंत्र्यांचा राजीनामाही घ्यायला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे .
-
नांदेड – भरदिवसा एका व्यक्तीला भोसकणाऱ्या आरोपींची धिंड
नांदेडमध्ये भरदिवसा एका व्यक्तीला भोसकणाऱ्या आरोपींची धिंड काढण्यात आली. नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. या आरोपींनी धनेगाव परिसरातील पेट्रोलपंपावर एका व्यक्तीची हत्या केली होती.
-
विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी केली वरळीतील मेट्रोच्या कामाची पाहणी
विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून वरळीतील मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यात येत आहे. या पाहणी दरम्यान मुंबई मेट्रोतील काही महत्त्वाचे अधिकारी देखील तसेच मुंबई पालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत. पूर्ण झालेल्या कामांचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येत आहे.
-
SIR प्रक्रियेवर आमचं बारीक लक्ष, यादी जाहीर झाल्यानंतरच त्रुटींवर बोलू – नाना पटोले
सध्या एसआयआरची प्रक्रिया सुरू असून या संपूर्ण प्रक्रियेवर आमचे बारकाईने लक्ष आहे. निवडणूक आयोगाकडून जेव्हा अंतिम यादी जाहीर केली जाईल, तेव्हाच त्यामध्ये नेमक्या काय त्रुटी आहेत, हे स्पष्ट होईल. यादी समोर आल्यानंतरच त्यावर अधिकृत आणि सविस्तर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल , असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले म्हणाले.
-
जळगाव- कामगार आयुक्त कार्यालयासमोर माथाडी कामगार संघटनेचे आमरण उपोषण
जळगावात कामगार आयुक्त कार्यालयासमोर खानदेश रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेने आमरण उपोषण केलं. 2024 ची थकीत रक्कम अदा करावी, टोली क्रमांक ८ तात्काळ पुनर्जीवित करून काम पुन्हा देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे सचिव विशाल सुरवाडे यांच्यासह हमाल कामगारांनी आमरण उपोषणामध्ये सहभाग घेतला. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा हमाल कामगारांच्या वतीने देण्यात आला .
-
पुढील चार ते पाच दिवस विदर्भात पावसाची स्थिती सामान्य राहण्याचा अंदाज
पुढील चार ते पाच दिवस विदर्भात पावसाची स्थिती सामान्य राहणार असल्याचा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता, अशी माहिती हवामान विभाग शास्त्रज्ञ , डॉ प्रवीण कुमार यांनी दिली.
१ जूनपासून आजपर्यंत नागपूर शहरात सरासरीच्या तुलनेत २५ टक्के कमी पावसाची नोंद तर विदर्भात १८ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. पूर्व भारतातील झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशासह मध्य प्रदेशात आगामी काळात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे,
-
आज संध्याकाळी नंदनवनवर शिवसेनेची तातडीची बैठक
आज संध्याकाळी नंदनवन वर शिवसेनेची तातडीची बैठक. संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील आजी माजी आमदार आणि खासदारांची बैठक. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बैठक. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता, पक्षांतर्गत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता.
-
मुंबईत ‘मृतांच्या’ नावावर बांगलादेशी घुसखोरांचे मतदान?
मुंबईत ‘मृतांच्या’ नावावर बांगलादेशी घुसखोरांचे मतदान? मतदार यादीत तब्बल पावणेपाच लाख ‘मृत’ मतदार. किरीट सोमय्यांनी धक्कादायक आकडेवारी उघड केली.
-
कल्याणमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार समोर आलाय
कल्याणमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार समोर आलाय..वयाच्या 15व्या वर्षीपासून अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केलाय..तरुणी 18 वर्षांची झाल्यानंतर जबरदस्तीने सह्या घेत धर्मांतर करण्यात आलं.. मौलवीने तरुणीच्या इच्छेविरुद्ध निकाह लावल्याचा आरोप तरुणीने केला आहे.. तरुणीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
-
पालघरच्या तारापूर MIDCतील विराज प्रोफाइल कंपनीत स्फोट
पालघरच्या तारापूर MIDCतील विराज प्रोफाइल कंपनीत स्फोट… उत्पादन सुरू असताना ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती… अपघातात काही कामगार जखमी झाल्याची भीती
-
कॉक्रोच जनता पार्टीनंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीचा धुमाकूळ
कॉक्रोच जनता पार्टीनंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीचा धुमाकूळ, 24 तासात दिमागी नक्षल पार्टीला 1.8 लाखांहून अधिक जणांनी फॉलो केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात दिमागी नक्षलवाद हा शब्द वापरला होता
-
सानपाड्यातील १५० वर्षे जुन्या शिवमंदिरात नागपंचमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी
सानपाड्यातील १५० वर्षे जुन्या शिवमंदिरात नागपंचमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. नागपंचमीच्या निमित्ताने नवी मुंबईतील सानपाडा येथील सुमारे दीडशे वर्षे जुन्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
-
ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील माफी मागतील तेव्हा मी माफी मागेल- नवनाथ वाघमारे
मराठ्यांच्या सुना केल्यानंतर तुम्ही ओबीसींचे प्रश्न मांडणार नाहीत का? असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ही आगपाखड करण्याच्या नादात माझ्याकडून हे वक्तव्य गेलं, ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील माफी मागतील तेव्हा मी मोठ्या मनाने कानाला हात धरून माफी मागील. मनोज जरांगे हे मला ओढ्या खोड्याची पैदास म्हणतात मग जरांगे ही कशाची पैदास आहे? ओढ्या खोड्याची आहे की गटाराची आहे? हे स्पष्ट करा -नवनाथ वाघमारे यांचा सवाल
-
हिंगोलीच्या लिंबाळा शाळेच्या पाहणीसाठी अभिजीत दीपके पुन्हा जाणार
हिंगोलीच्या लिंबाळा शाळेच्या पाहणीसाठी अभिजीत दीपके पुन्हा जाणार. स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता प्राथमिक मराठी शाळेला भेट. 15 ऑगस्ट रोजीही अभिजीत दीपके यांनी केली होती शाळेची पाहणी. मुख्याध्यापक शाळेत मद्यपान करून येत असल्याचा अभिजीत दीपके यांचा आरोप. शिक्षणाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधत मुख्याध्यापकांच्या तात्काळ बदलीची केली होती मागणी. आता पुन्हा शाळेला भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांशी साधणार संवाद
-
भरत गोगावले सध्या दिल्लीत दाखल
भरत गोगावले सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील मीना बाजार इथे पर्यटन विभागाच्या कार्यक्रमास भरत गोगावले यांची हजेरी. रात्री ऊशीरा मुंबईत होणार दाखल
-
वाशी टोलनाक्यावर थरारक मॉक ड्रिल; नवी मुंबई पोलिसांकडून प्रशिक्षण
वाशी टोलनाक्यावर अचानक पोलिसांची मॉक ड्रिल घेण्यात आली आणि काही क्षणांसाठी संपूर्ण परिसरात आपत्कालीन परिस्थितीचे चित्र निर्माण झाले. भविष्यात दहशतवादी हल्ला किंवा कोणतीही गंभीर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला तातडीने आणि प्रभावीपणे कसे सामोरे जायचे, याची पोलिसांकडून रंगीत तालीम करण्यात आली. वाशी पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या मॉक ड्रिलमध्ये संकटाच्या वेळी पोलिसांनी कोणत्या पद्धतीने प्रतिसाद द्यायचा, परिसर सुरक्षित कसा करायचा आणि परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारच्या अचानक मॉक ड्रिलमुळे पोलिसांची आपत्कालीन परिस्थितीतील तयारी आणि प्रतिसाद क्षमता तपासण्यास मदत होते. भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला किंवा गंभीर घटना घडल्यास कमीत कमी वेळेत प्रभावी कारवाई करता यावी, हा या सरावामागचा मुख्य उद्देश होता.
-
जयंत पाटलांवर महाजन यांची मिश्किल टिपणी
जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या बैठकीला गैरहजर आहेत. सध्या फ्लूची साथ आहे ताप वाढत आहे त्यांची तब्येत बिघडली असेल. त्यामुळे ते बैठकीला गेले नसतील.. अशा शब्दात जयंत पाटलांच्या शरद पवारांच्या बैठकीला गैरहजर राहण्याच्या भूमिकेवर महाजन यांनी मिश्किल टिपणी केली.
-
संजय राऊत याच्या जिभेला हाड नाही- गिरीश महाजन
संजय राऊत याच्या जिभेला हाड नाही. ते काय बडबड करतोय याचा फरक पडत नाही. पंतप्रधान, न्यायालय , निवडणूक आयोग सगळ्यांच्या विरोधात काय काय बोलतात त्यांच्या जिभेला काही हाड नाही. त्यामुळे त्यांना काय बोलायचे बोलू दे आम्ही काम करत राहू. त्यांच्याकडे 2 खासदार शिवाय खासदार राहिला नाही. ते कुणा विरुद्ध काय बोलत असतात. हे महाराष्ट्राला माहिती आहे. अशा शब्दात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे.
-
मोर्चानंतर ठाकरेंचे नगरसेवक नाशिक महापालिकेत दाखल
मोर्चानंतर ठाकरेंचे नगरसेवक नाशिक महापालिकेत दाखल. मनपा आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल. खासदार राजाभाऊ वाजे देखील नगरसेवकांसोबत मनपा आयुक्तांच्या भेटीला.
-
मेट्रो वनच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपद्वारे पास मिळणार
मेट्रो वनच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपद्वारे पास मिळणार आहे, मेट्रो वनच्या प्रवाशांची तिकीट काऊंटरच्या रांगेतून सुटका होणार आहे.
-
जे माजुरडे लोकं आहेत त्यांच्यावर हा रेडा सोडायचा- संजय राऊत
आम्ही यमाला घेऊन आलो आहे. आतमध्ये जे माजुरडे लोकं आहेत त्यांच्यावर हा रेडा सोडायचा. उद्धव ठाकरेंच्या आदेशाने हा मोर्चा
भाजप आणि मिंध्ये यांचे नगरसेवक कुठे गेले, माझ्याकडे दहा नाव आहेत. एक खून केला तर खुनाचा गुन्हा दाखल होतोय. 302 चा गुन्हा गिरीश महाजन जे इकडचे चंपात रॉय वर दाखल करा. -
उज्जैन- नागचंद्रेश्वर मंदिरात वीज धक्क्याची अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी झाली
उज्जैन- नागचंद्रेश्वर मंदिरात वीज धक्क्याची अफवा पसरली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीच्या घटनेत 13 हून अधिक भाविक जखमी माहिती समोर आली आहे. महाकालेश्वर मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील दर्शन रांगेत हा सगळा प्रकार झाला आहे.
-
कुंभमेळ्या वर नंतर येऊ भ्रष्टचार करून ठेवला- संजय राऊत
एक अयोध्या जिथे दान लुटले ,सीतेचे दागिने लुटले त्यानेच पिलावळ इथे नाशिक अयोध्या लुटत आहे, कुंभमेळ्या वर नंतर येऊ भ्रष्टचार करून ठेवला असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
-
अयोध्येनंतर आता पंचवटीतील रामाला लुटतायेत – संजय राऊत
नाशिकच्या महापौरांना आम्ही घेराव घालू, आम्ही पालिकेचा गेट तोडून आत शिरायला कमी करणार नाही. अयोध्येनंतर आता पंचवटीतील रामाला लुटतायेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
-
आता आम्ही भाजप आमदार आणि नगरसेवकांच्या घराबाहेर आंदोलन करु- संजय राऊत
सर्व जगाला डांबर मिळतंय नाशिकला मिळतं नाही का? फडणवीस म्हणतात की इराणच्या युद्धामुळे डांबर संपलं, आता आम्ही भाजप आमदार आणि नगरसेवकांच्या घराबाहेर आंदोलन करु अशा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
-
सत्ताधाऱ्यांना 35 हजार कोटी खायचे आहेत-संजय राऊत
नागरिकांच्या प्रश्नांबद्दल सत्ताधारी संवेदनशील नाही, सत्ताधाऱ्यांना 35 हजार कोटी खायचे आहेत- असं संजय राऊत यांनी आरोप केला आहे.
-
सत्ते नसलो तरीही आम्ही जनतेसाठी लढणार- संजय राऊत
संजय राऊत यांचे नाशिकमध्ये भाषण सुरु आहे. ते म्हणाले की,” सत्ते नसलो तरीही आम्ही जनतेसाठी लढणार असे संजय राऊत म्हणाले आहे.
-
महाराष्ट्रात मराठी परीक्षेत ७,७५० ऑटो-टॅक्सी चालक नापास
महाराष्ट्रात मराठी परीक्षेत ७,७५० ऑटो-टॅक्सी चालक नापास झाले आहेत. महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याची अंतिम मुदत संपली. मराठी भाषेची परीक्षा देणारे तब्बल ७७५० चालक अपयशी ठरले आहेत. या चालकांच्या परवान्यांबाबत पुढील कारवाईबाबत मंत्री प्रताप सरनाईक भूमिका मांडणार आहेत.
-
राहुल गांधी यांचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र
राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहिलं आहे. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत राहुल गांधींनी हे पत्र लिहिलं आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन शांततापूर्ण असल्याचं मत त्यांनी नोंदवलं आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून सरकारने संवाद साधावा, असंही त्यांनी या पत्रात म्हटलंय.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मोदींची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीसांनी राज्यातील विविध विकास प्रकल्पांची माहिती दिल्याचं कळतंय.
-
सत्ताधाऱ्यांना 35 हजार कोटी रुपये खायचे आहेत; ठाकरे सेनेचा आरोप
नागरिकांच्या प्रश्नांबद्दल सत्ताधारी संवेदनशील नाही. सत्ताधाऱ्यांना 35 हजार कोटी रुपये खायचे आहेत, असा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केला आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात ठाकरे सेनेकडून महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले आहेत.
-
कॉक्रोच जनता पार्टीनंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीचा धुमाकूळ
कॉक्रोच जनता पार्टीनंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीचा धुमाकूळ सुरू आहे. 24 तासांत दिमागी नक्षल पार्टीचे 1.8 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
-
सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मनपा आयुक्तांविरोधात ठिय्या
सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनपा आयुक्तांविरोधात ठिय्या केला आहे. मनपा आयुक्त आणि सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. सोलापूर शहरातील बीओटी तत्वावर दिल्या जाणाऱ्या जगांना महाविकास आघाडीचा विरोध आहे. सोलापूर मनपाच्या 7 जागा बीओटी तत्वावर देण्यास महाविकास आघाडीतील नेत्यांचा विरोध आहे.
-
खड्ड्यांविरोधातील ठाकरेंची शिवसेना पालिका आयुक्तांना निवेदन देणार
नाशिकमधील खड्ड्यांविरोधातील ठाकरेंची शिवसेना पालिका आयुक्तांना निवेदन देणार आहे. महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात ठाकरे सेनेकडून मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात खासदार संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजेसुद्धा सहभागी झाले आहेत.
-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचा एकनाथ शिंदे घेणार आढावा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचा एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याबाबत बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.
-
नाशिकमध्ये खड्ड्यांवरून पालिका प्रशासन, सरकारविरोधात मोर्चा
नाशिकमध्ये खड्ड्यांवरून पालिका प्रशासन आणि सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे.
-
खड्ड्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे सेनेचा पालिकेवर महामोर्चा
नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. याप्रकरणी ठाकरे सेनेकडून पालिकेवर महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात प्रतिकात्मक यमराज आणि रेडासुद्धा पहायला मिळाला आहे.
-
धुळ्यातील प्रति केदारनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मुकटी येथील प्रति केदारनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जिल्ह्यातील पहिलंच प्रति केदारनाथ मंदिर असल्याने भाविकांचं आकर्षक केंद्र ठरत आहे. श्रावण महिना असल्याने भगवान महादेवाच्या दर्शनासाठी संपूर्ण जिल्ह्यातून मंदिरात गर्दी होत आहे. मंदिरात महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात येणार आहे.
-
SIRबाबत बिहारमध्ये झालं, ते महाराष्ट्रात होण्याची भीती – रोहित पवार
SIRबाबत बीएलओकडून चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. SIRबाबत बिहारमध्ये झालं, ते महाराष्ट्रात होण्याची भीती आहे. बीएलओ नको ते काम करत आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला. हायकोर्टाच्या टायपिंगच्या परीक्षेत घोळ झाल्याचाही आरोप त्यांनी केला.
-
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्याच्या पालकमंत्रिपदावर मोठं वक्तव्य केलं आहे. शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे, असं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. आता यावर शिवेंद्रराजे काय बोलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
-
पिंपरी चिंचवडमध्ये मॅकडोनाल्डमध्ये तरुणांचा गोंधळ
पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथील मॅकडोनाल्डमध्ये तीन तरुणांनी गोंधळ घालत कामगारांना मारहाण केल्याचा आरोप आहे. १५ ऑगस्टच्या सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.काही कारणावरून तरुणांचा मॅकडोनाल्डमधील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर मारहाण आणि गोंधळ झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आहे.
-
भाजपच्या नगरसेवक-आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार – संजय राऊत
नाशिकमधील खड्ड्यांवरून भाजपच्या नगरसेवक-आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले. नाशिकमधील मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटींची आर्थिक मदत करावी. नाशिक आयुक्ताची तातडीने बदली करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
-
गांधी कुटुंबावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं – नाना पटोले
भाजपने वंदे मातरमवरून सोनिया गांधी आणि कुटुंबीयांना लक्ष्य केलं. यावरून नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. गांधी परिवारावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. आम्हाला देशप्रेमाचा सल्ला देण्याची गरज नाही, असा पलटवार पटोलेंनी भाजपवर केला आहे.
-
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ
सकाळी 7:30 वाजता कॉमेक्सवर 1.19% वाढून सोन्याचा दर $4,464.10 प्रति औंस आणि चांदीचा दर $65.885 प्रति औंसवर पोहोचला आहे. मुंबईत 24 कॅरेटचा दर – 1,55,120 रुपये, 22 कमरेच्या दर – 1,42,190 रुपये आणि 18 कॅरेटचा दर – 1,16,340 रुपयांवर पोहोचला आहे.
-
१६ चाकी ट्रक खोल खड्ड्यात उलटल्याची घटना
जळगावच्या पारोळाजवळ १६ चाकी ट्रक राष्ट्रीय महामार्गालगत खोल खड्ड्यात उलटल्याची घटना घडली आहे. धुळे–जळगाव बायपास राष्ट्रीय महामार्गावर पारोळा शहराजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात ट्रकवरील चालक जखमी झाला असून ट्रकमधील मालाचे नुकसान झाले आहे.
-
अमरावती जिल्ह्यात सर्पदंशाचा कहर! तीन महिन्यांत ७३४ जणांचा सर्पदंश
अमरावती जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. मे ते जुलै या अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ७३४ नागरिकांना सर्पदंश झाला असून यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे.
-
धारावीतील सायन रुग्णालयात रुग्णांचे हाल, खासगी कंत्राटदाराच्या मनमानी कारभारावर
धारावीतील सायन रुग्णालयात रुग्णांचे हाल होत असल्याचे समोर आले आहे. स्थायी समितीने नेमलेल्या खाजगी कंत्राटदाराच्या मनमानी कारभारावर स्थानिकांचा रोष. १०० रुपयांच्या सोनोग्राफीसाठी मोजावे लागतात १८० रुपये. एमआरआयसाठी १२०० रुपयांचे वाढवले २५०० रुपये. रुबी नावाच्या संस्थेला मनपाने कंत्राट दिलं. संस्थेकडून रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप.
-
जॅकेटवर तिरंगा चक्क उलटा; आमदार अर्जुन खोतकरांकडून मोठी चूक
जालना विधानसभा मतदारसंघाचे शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच एक चूक झाल्याचा प्रकार समोर आलाय, अर्जुन खोतकर यांनी घातलेल्या जॅकेटवर भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा चक्क उलटा लावल्याचा फोटो व्हायरल झालाय
-
गोपीनाथ मुंडे हे भाजपाच्या जाचाला कंटाळून, काँग्रेसमध्ये जाणार होते; जाणकर यांचा दावा
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे भाजपाच्या जाचाला कंटाळून, काँग्रेस मध्ये जाणार होते असा दावा जाणकर यांनी केला आहे. मात्र त्या मिटिंगमध्ये काय झालं होत हे फिक्स काही मला माहिती नाही. कारण त्या मिटिंगला मी नव्हतो असंही महादेव जाणकर म्हणाले.
-
नागपंचमीनिमित्त आज तुळजाभवानी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर निर्बंध
नागपंचमीच्या सनातील विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात आज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद राहणार आहे. नागपंचमीच्या दिवशी सुवासिनी महिलांकडून तुळजाभवानी मंदिरात नागपूजन, फेर-भुलई यांसह पारंपरिक विधी आणि खेळ खेळले जातात. याच पारंपरिक प्रथेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, भाविक आणि नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.
-
सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी उत्साहात साजरी,,, यंदाही जिवंत नागांचे दर्शन.
जगप्रसिद्ध ओळख असणाऱ्या सांगलीच्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदाही न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे साजरी होत आहे. मात्र केंद्र सरकारकडून मिळालेल्या विशेष परवानगीमुळे शिराळकरांना नागपंचमी निमित्ताने जिवंत नागांचे दर्शन होत आहे.मात्र घरोघरी न्यायालयाच्या निर्देशानुसार नागांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचा पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येत आहे.शेकडो वर्षांपासून शिराळा नगरीमध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती, मात्र न्यायालयाच्या निर्बंधामुळे,नाग पकडणे, मिरवणूक व जिवंत नागपूजेवर बंदी घालण्यात आली आहे.यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रतिकात्मक नागांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येत आहे.
-
साताऱ्यातील केसुर्डीत उघड्यावर टाकले बुरशीयुक्त चॉकलेट-बिस्कीट; लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ
सातारा: खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथे कचरा डेपोजवळ अज्ञातांनी मुदतबाह्य आणि बुरशी आलेले चॉकलेट्स व बिस्किटे उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विषारी ठरू शकणारी बिस्किटे स्थानिक लहान मुले गोळा करून घरी घेऊन जात असताना ग्रामस्थांच्या नजरेस पडली. बुरशीयुक्त अन्नपदार्थांमुळे लहान मुलांना गंभीर विषबाधा होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने हा साठा तात्काळ जप्त करून उघड्यावर माल फेकणाऱ्या बेजबाबदार विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
-
सातारा:कळमगावात १०० फूट खोल विहिरीत पडलेल्या म्हशीला जीवदान; तरुणांचे थरारक बचावकार्य
सातारा: महाबळेश्वर तालुक्यात कळमगाव येथे कठडा नसलेल्या शंभर फूट खोल विहिरीत पडलेल्या म्हशीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. मुसळधार पावसात सह्याद्री ट्रेकर्स आणि स्थानिक जिगरबाज तरुणांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता हे कठीण बचावकार्य हाती घेतले. दोरखंड आणि जेसीबीच्या साहाय्याने अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर म्हशीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तरुणांच्या या शौर्यामुळे मुक्या जीवाचे प्राण वाचल्याने सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने विहिरीला तातडीने कठडा बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-
चेंबूरमध्ये शिवकन्या महिला गोविंदा पथकाच्या तरुणीची स्पेनसाठी निवड
चेंबूरमध्ये शिवकन्या महिला गोविंदा पथकाच्या तरुणीची स्पेनसाठी निवड झाली आहे. गेल्या १० वर्षांपासून पथकाचा दहीहंडी उत्सवात सक्रिय सहभाग आहे. यंदा नंदिनी शिंगेची स्पेनमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी निवड करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर दहीहंडी साजरी करण्याचा शिवकन्या पथकाचा संकल्प आहे. जवानांना सलामी देण्यासाठी सरकार व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
-
नाशिक मुंबई महामार्गावर जिंदाल कंपनी जवळ दोन ट्रक चालकांमध्ये हाणामारी
नाशिक मुंबई महामार्गावर जिंदाल कंपनी जवळ दोन ट्रक चालकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही ट्रक महामार्गावर थांबल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ट्रकच्या मागे असलेल्या वाहनचालकाने मारामारीचे दृश्य केले आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आधीच खड्डे आणि महामार्गाच्या कामामुळे उशीर होत असलेल्या वाहनचालकांना आता या मारामारीच्या घटनेचा फटका बसला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे पासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. राज्यभरासह देशभरातील भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा अभिषेक सुरू करण्यात आली आहे.
-
अर्धा ऑगस्ट संपलातरी वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची चिंता कायम
वाशिम : अर्धा ऑगस्ट संपलातरी वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची चिंता कायम आहे. वाशिम पाटबंधारे विभागाच्या ७७ प्रकल्पांत केवळ ३४.१९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांमध्ये अवघा २६.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम एकबुर्जी प्रकल्पात ३६.९३ टक्के तर सोनल प्रकल्पात केवळ १९.२१ टक्के साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पांमध्ये ३५.०२ टक्के पाणी उपलब्ध. जिल्ह्यात दमदार पावसासाठी शेतकरी आणि नागरिकांची प्रतीक्षा कायम.
-
माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक ‘त्रुटी’
यवतमाळ : माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांच्या आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक त्रुटी निर्माण होत आहेत. खिडक्यांना जाळ्या नाही, स्वच्छतागृहांचे लाईट नाही. काहींना दरवेजे नाही…. चिंधुजी पुरके आदिवासी आश्रम शाळा मारेगाव येथे पुरेशी सुविधा नाही. 372 विद्यार्थी असलेल्या आश्रम शाळेत मुलांसाठी फक्त 15 बेड तर मुलींना अवघे 35 बेड आहेत, पुरेशा बेड अभावी अनेक विद्यार्थी खाली झोपतात. 133 विद्यार्थी गादी टाकून जमिनीवर झोपतात. आश्रम शाळेच्या खिडक्या ही नादुरुस्त असून शिवाय शाळेला नाही पूर्ण कंपाऊंड नाही. प्रकल्प कार्यालयाकडून शाळेची तपासणी करण्यात आली आहे.
-
पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजेच्या तयारीत असलेल्या 15 जणांना लातूर येथून अटक
पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजेच्या तयारीत असलेल्या 15 जणांना लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पैश्याचा पाऊस पाडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचा विधी दरम्यान बळी देण्यात येणार होता अशी माहिती उघड झाली आहे. उदगीर ते लातूर रस्त्यावरच्या करडखेल पाटी जवळ वाहनांसह थांबलेल्या या 15 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत, आंध्रप्रदेशातून आणलेल्या पीडित मुलीची सोडवणूक केली आहे. पैश्याचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेत सहभागी असलेले आरोपी हे अकोला,परभणी,बीड,पुणे या शहरांसह कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील आहेत. आता या आरोपींची पोलिस लिंक शोधत आहेत.
-
ग्रामसभा आणि ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी टेंभुर्णी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण
जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या टेंभुर्णी येथील ग्रामपंचायतीत झालेल्या कारभाराची चौकशी आणि ग्रामसभा घेण्यात यावी या मागणीसाठी शुभम मुळे आणि त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासना विरोधात आमरण उपोषणाची हाक दिली. टेंभुर्णी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केलय. गावातील नागरिकांची प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडावे, शासकीय निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करावा यासह इतर मागण्यांना घेऊन हे तरुण आमरण उपोषणाला बसले.
-
भीमाशंकर येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी भल्या पहाटेपासून भगवान शिवाच्या पिंडीचे दर्शन घेत आहेत. दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे मंदिर काही महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर मंदिराच्या दर्शनाची वेळ सकाळी 11 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती.
-
नवनाथ वाघमारेने मराठा समाजाच्या मुली-महिला बद्दल केलं आक्षेपार्ह वक्तव्य
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेने मराठा समाजाच्या मुली-महिला बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा माढ्यात निषेध. सकल मराठा समाजाचे माढा पोलिस ठाण्यासमोर वाघमारेच्या विरोधात घोषणाबाजी. वाघमारेच्या वक्तव्याचा खरपूस समाचार. वाघमारेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या आग्रही मागणीसाठी माढ्यात मराठा समाज आक्रमक. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा मराठा समाजाकडून इशारा.
-
हायकोर्ट परीक्षेत गोंधळ, अभिजीत दीपकेंकडून एक आठवड्याचा अल्टीमेटम
परीक्षेत गडबड झाली होती. कुठे माउस काम करत नव्हते. कुठे कीबोर्ड काम करत नव्हते. आज विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठे यश आहे की कोर्टाने त्याची दखल घेतली आहे.आता सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे की एक आठवडा रिक्वेस्ट अल्टिमेट देत आहोत. एका आठवड्यात काही निर्णय नाही आला किंवा काही बाकीच्या मागण्या होत्या. ऑफलाइन परीक्षा झाली पाहिजे, जितके गडबडीचे सेंटर आहेत ते ब्लॅक लिस्ट झाले पाहिजेत अशा मागण्या अभिजीत दीपके यांनी केल्या.
हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवरुन काल मोठा गोंधळ झाला. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होते, काही ठिकाणी किबोर्ड खराब होता. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी या विरोधात छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागात आंदोलन केलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे सुद्धा या आंदोलनात उतरले. अखेर रात्री हायकोर्टाने या आंदोलनाची दखल घेत नोटीस जारी केली. अभिजीत दीपके यांनी सरकारला इशारा दिला आहे. आठवड्याभरात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर तर संभाजीनगरातच आंदोलनाला बसू असा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे. “परीक्षेत गडबड झाली होती. कुठे माऊस काम करत नव्हते, कुठे कीबोर्ड काम करत नव्हते. आज विद्यार्थी आंदोलनाला बसले होते, या आंदोलनाचं सगळ्यात मोठे यश आहे की कोर्टाने त्याची दखल घेतली आहे” असं दीपके म्हणाले.