Maharashtra News LIVE : मी त्या बैठकीला गेलोच नव्हतो; खासदार संजय देशमुख यांनी फेटाळला दावा

Maharashtra News LIVE Updates: दोन्ही राष्ट्रवादीची शिष्टाई काल कामी आली. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून उमेदवारी मागे घेतली. पण ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. भोंदू खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Maharashtra News LIVE : मी त्या बैठकीला गेलोच नव्हतो; खासदार संजय देशमुख यांनी फेटाळला दावा
| Edited By: | Updated on: Apr 10, 2026 | 12:16 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 10 Apr 2026 12:11 PM (IST)

    जालना जिल्ह्यात महिला बालविकास विभागाकडून गेल्या वर्षभरात १३६ बालविवाह रोखले

    जालना जिल्ह्यात गेल्या वर्षभरात प्रशासनाने सतर्कता दाखवत तब्बल १३६ बालविवाह रोखण्यात यश मिळवलेये.मात्र, इतक्या कडक पाळतीनंतरही जिल्ह्यात चार बालविवाह पार पडल्याची माहिती समोर आली असून, यातील दोन प्रकरणांत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बाल विकास अधिकारी राजेंद्र कड यांनी दिलीय. शिवाय बालविवाह करू नये आणि बालविवाह रोखण्यासाठी सर्व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन राजेंद्र कड यांनी केलय.

  • 10 Apr 2026 12:01 PM (IST)

    अंबड – मुलानेच केला बापाचा खून, रुई गावात खळबळ

    अंबड तालुक्यातल्या रुई गावात 45 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून, दिलीप राजगुरू असं मयत व्यक्तीचं नाव आहे. 2 संशयितांना तीर्थपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं,  तपासाअंती पोटच्या मुलानेच बापाचा खून केल्याचे उघड झाले. मात्र मुलाने बापाला का मरालं याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • 10 Apr 2026 11:53 AM (IST)

    डीआरआय मुंबईकडून सोनं तस्करीचा पर्दाफाश, 38 कोटींचं सोनं जप्त

    डीआरआय मुंबईकडून सोनं तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून जवळपास 38 कोटींचं सोनं जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 24 महिलांन अटक करण्यात आली आहे.  मुंबई विमातळामार्गे  सोन तस्करीचा होता प्रयत्न.

  • 10 Apr 2026 11:45 AM (IST)

    जळगाव – चोपडा येथे गॅस एजन्सी समोर सिलेंडर साठी नागरिकांची मोठी गर्दी

    जळगावात चोपडा येथे गॅस एजन्सी समोर घरगुती गॅस सिलेंडर साठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.  चोपडा शहरात जगदीश गॅस एजन्सी समोर पहाटेपासून वृद्धांसह महिला तसेच नागरिक गॅस सिलेंडर तसेच बुकिंग साठी रांगेत उभे आहेत.

    गॅस हंडी घरपोच मिळणार असं जिल्हा प्रशासन म्हणतंय तरी देखील गॅस एजन्सी समोरील गर्दी कमी होत नसल्याचे समोर आले आहे.

    काहींची गॅस बुकिंग करण्यासाठी तर काहींची गॅस सिलेंडर घेऊन जाण्यासाठी गर्दी

  • 10 Apr 2026 11:30 AM (IST)

    वसई औद्योगिक वसाहतीत टेम्पोचालकांमध्ये तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

    वसई पूर्व औद्योगिक वसाहतीतील वोरा इंडस्ट्रियल इस्टेट क्रमांक 4 येथे गुरुवारी दुपारी दोन टेम्पोचालकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • 10 Apr 2026 11:12 AM (IST)

    धर्मांतरण आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी भाजप युवा मोर्चा कडून मल्टिनॅशनल कंपनी बाहेर आंदोलन

    नाशिक – धर्मांतरण आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने संबंधित मल्टिनॅशनल कंपनी बाहेर आंदोलन.  भाजपा युवा मोर्चा कडून कंपनी बाहेर घोषणाबाजी सुरू असून गेट बाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्री राम च्या घोषणा देण्यात येत आहेत.
    याच कंपनीत धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असून9 महिलांनी  गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

  • 10 Apr 2026 10:57 AM (IST)

    मीरा रोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; जलवाहिनीच्या कामाचा व्हिडीओ काढल्याने वाद

    मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात मनसे पदाधिकारी स्वप्निल तपासे यांच्यावर दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामदेव पार्क भागात महापालिकेच्या जलवाहिनीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने, मनसे पदाधिकारी रेश्मा तपासे तिथे व्हिडिओ चित्रित करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या मागे एक व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत धूम्रपान करत उभा राहिला. या वर्तणुकीबद्दल स्वप्निल तपासे यांनी जाब विचारला असता, संबंधित व्यक्तीने “तुझं कच्चं मटण मला खायचं आहे” अशी धक्कादायक धमकी देत तपासे यांच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. या हल्ल्यात स्वप्निल तपासे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे परप्रांतीय शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

  • 10 Apr 2026 10:47 AM (IST)

    मुंबईच्या डोंगरीत शिधावाटप विभागाचा मोठा छापा, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

    मुंबईच्या वाडीबंदर ब्रीज परिसरात शिधावाटप विभागाने धाडसी कारवाई करत अवैध गॅस सिलिंडर साठ्याचा पर्दाफाश केला आहे. माधुरी शिंदे आणि प्रदीप यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने टाकलेल्या या छाप्यात एकूण ४०.६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ८ वाहने आणि ४५१ गॅस सिलिंडरचा समावेश असून, प्रशासनाने हा सर्व साठा हस्तगत केला आहे. डोंगरी परिसरात झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध गॅस माफियांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाने अशा अवैध साठेबाजीवर आपला प्रहार अधिक तीव्र केला आहे.

  • 10 Apr 2026 10:37 AM (IST)

    जळगावच्या वाघळीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव, महामार्गावर दोन तास रास्ता रोको

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात महापुरुषाचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याच्या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी जळगाव-चाळीसगाव महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. ज्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. सद्यस्थितीत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असली तरी, वाघळी गावात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे.

  • 10 Apr 2026 10:27 AM (IST)

    मी त्या बैठकीला गेलोच नव्हतो; खासदार संजय देशमुख यांनी फेटाळला दावा

    यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी एकनाथ शिंदेंनी ठाण्यात आयोजित केलेल्या एका विशिष्ट बैठकीला हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले होते. आता यावरुन सुरू असलेल्या चर्चांना संजय देशमुख यांनी पूर्णविराम दिला. मी कोणत्याही प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन बैठकीला उपस्थित नव्हतो, असे त्यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. या बैठकीचे आपल्याला कोणतेही निमंत्रण नव्हते आणि कुणीही बोलावले नव्हते, त्यामुळे तेथे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकीय वर्तुळात रंगणाऱ्या चर्चांना या स्पष्टीकरणामुळे आता नवे वळण मिळाले आहे.

  • 10 Apr 2026 10:17 AM (IST)

    ठाण्यात आजपासून नालेसफाई; यंदा रोबोटिक यंत्रणेद्वारे होणार नाल्यांची स्वच्छता

    ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई मोहिमेला आजपासून अधिकृत सुरुवात होत आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत मुंब्रा येथील अमृत नगर नाल्यापासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत ९ प्रभाग समित्यांमधील तब्बल ३८४.९१ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची स्वच्छता केली जाणार असून, यासाठी ११.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच विविध ठिकाणी आधुनिक रोबोटिक यंत्रणेचा वापर करून नालेसफाई केली जाणार असल्याने शहराला पुराच्या संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • 10 Apr 2026 10:07 AM (IST)

    नाशिकमध्ये आयटी कंपनीतील महिला छळ प्रकरणी फरार महिला HR ला पुण्यातून अटक

    नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी सह-आरोपी महिला HR अश्विनी चेनानी हिला नाशिक पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. पीडित महिलांनी कंपनीत होणाऱ्या अन्यायाबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी तिला या प्रकरणात सह-आरोपी केले होते. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार होती, अखेर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिचा शोध घेत तिला बेड्या ठोकल्या आहेत.

  • 10 Apr 2026 09:50 AM (IST)

    महिला वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वेशांतर करून कंपनीत झाल्या दाखल

    नामांकित कंपनीत महिला व तरुणींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांची गोपनीय कारवाई.  महिला वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी वेशांतर करून कंपनीत झाल्या दाखल. तब्बल 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम होती तैनात. मीटिंगदरम्यान आरोपींचे अश्लील वर्तन प्रत्यक्ष पकडले. शिताफीने कारवाई करत आरोपींना बेड्या. 40+ CCTV फुटेजची तपासणी, ठोस पुरावे जमा

  • 10 Apr 2026 09:40 AM (IST)

    कल्याण जवळील मोहने येथील धक्कादायक घटना

    आसनगाव जोंधळे कॉलेज मध्ये मोबाईलमधील नंबरवरून संशय अन् सर्वांसमोर अपमान; शिक्षकाच्या मुजोरीमुळे १७ वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न. आई’ या नावाने मुलाचा नंबर सेव असल्याचा संशय घेत मयूर खारीक नावाच्या शिक्षकाने चक्क कॉलेज परिसरात इतर विद्यार्थ्यांसमोर मोबाईल हिसकावून केला विद्यार्थिनीच्या आईला व्हिडिओ कॉल.इथेच न थांबता व्हिडिओ कॉलवर आई आणि मुलीला अत्यंत उद्धट आणि अपमानास्पद वागणूक दिल्याने विद्यार्थिनी राहत्या घरी फिनाईल प्राशन करत केला आत्महत्येचा प्रयत्न

  • 10 Apr 2026 09:30 AM (IST)

    फरार असलेल्या खाजगी कंपनीच्या एचआरला नाशिक पोलिसांकडून अटक

    श्विनी चेनानी असे अटक केलेल्या HR चे नाव. नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण करून मानसिक त्रास देत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महिलांनी वारंवार कंपनीच्या एचआरकडे तक्रार करूनही दुर्लक्ष दिल्याने पोलिसांनी केले सह आरोपी.  गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेल्या कंपनी महिला एचआरला पोलिसांनी केले पुणे येथून अटक

  • 10 Apr 2026 09:20 AM (IST)

    जळगावच्या कासोदा येथे ग्राम देवीच्या यात्रोत्सवानिमित्ताने भव्य कुस्तींच्या स्पर्धेचे आयोजन

    पारोळा येथील शिवसेनेचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ. कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील 300 हून अधिक कुस्तीपटू सहभागी. स्पर्धेत शाळकरी विद्यार्थ्यांसह मोठ्या पैलवानांच्या कुस्त्यांनी वेधले लक्ष. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी एरंडोल तालुक्यासह परिसरातील गावांमधील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती

  • 10 Apr 2026 09:05 AM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात राबवणार ऑपरेशन टायगर

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची माहिती मिळत आहे. एक महत्वाची बैठकही पार पडली आहे.

  • 10 Apr 2026 09:00 AM (IST)

    भोंदू अशोक खरात प्रकरणी ED आणि IT विभाग ॲक्शन मोडवर

    भोंदू अशोक खरात प्रकरणी ED आणि IT विभाग ॲक्शन मोडवर आली आहे. ठाणे येथील कार्यालयात आयकर विभाग व ईडी यांची संयुक्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही संस्थांमार्फत भोंदू अशोक खरात याच्या कागदपत्रांची छाननी सुरू झाली. लवकरच खरातची मालमत्तांवर धाडसत्र राबवले जाण्याची शक्यता आहे. ईडीने दोन दिवसांपूर्वीच भोंदू अशोक खरात संबंधित असलेल्या जमीन खरेदी विक्रीचे मूळ दस्तावेज व बँक अकाउंट चा तपशील ताब्यात घेतला होता.

  • 10 Apr 2026 08:50 AM (IST)

    शिरूरच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात 41 वा बिबट्या जेरबंद

    शिरूर आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या सरहद्दी वरील पिंपरखेड येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून तीन वर्ष वयाच्या नर जातीच्या या बिबट्या ची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीय, गेली चार महिन्यात वनविभागाने या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात 41 बिबट जेरबंद झालेत

  • 10 Apr 2026 08:40 AM (IST)

    मुलीच्या व्हिडिओने बीड हादरले

    बीडच्या केज पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील एका अल्पवयीन मुलीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना हा व्हिडिओ तिच्या नातेवाईकांनी रेकॉर्ड केला आहे. ज्यामध्ये ती सांगत आहे की आपल्या सोबत बळजबरी करून अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे ते मला सहन न झाल्याने मी औषध प्राशन केले. सदरील तरुणी केज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारी असून अल्पवयीन आहे. औषध प्राशन केल्याने तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान समोर आलेल्या या प्रकरणात अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.

  • 10 Apr 2026 08:30 AM (IST)

    पेट्रोल ओतून मामनेच दिले हॉटेल पेटवून, हॉटेल पेटवणारा मामा सीसीटीव्हीत कैद

    बीडच्या केज शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या समोर असलेले हॉटेल पेट्रोल ओतून पेटवून दिले. यानंतर हॉटेल चालक तरूणाने बाजुच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्याच्याच मामाने पेट्रोल टाकून हॉटेल पेटवून दिल्याचे निदर्शनास आले. बहिण भावाचा घरी किरकोळ वाद झाला होता यानंतर मामाने रात्री भाच्याचे हॉटेल बंद झाल्यानंतर पेटवून दिले यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रकरणी केज पोलीसात मामा गोविंद कोंबडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 10 Apr 2026 08:22 AM (IST)

    जळगाव महापालिकेची बीव्हीजी कंपनीला नोटीस

    जळगाव महापालिकेने कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली. बीव्हीजी कंपनीने करारातील अटींनुसार हातगाड्या व पुरेशी वाहने उपलब्ध करून न दिल्याने मनपाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी ही नोटीस बजावली आहे.बीव्हीजी कंपनीला ५० हातगाड्या आणि मोठी पिकअप वाहने उपलब्ध करून देण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे

  • 10 Apr 2026 08:16 AM (IST)

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यात आढळल्या आळ्या

    पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यात अळ्या आढळून आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून आल्याने पिंपरी चिंचवडकरांचा आरोग्य धोक्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तुकाराम नगर परिसरामध्ये महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात अक्षरशः अळ्या आढळून आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यात अळ्या तरंगत असतानाची दृश्य एका संजग नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये कैद केली आहेत.

अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपली उमेदवारी मागे घेतली आणि राज्याच्या सांस्कृतिक आणि सदभावना धोरण कायम असल्याचे काँग्रेसने अधोरेखित केले. पण ही निवडणूक बिनविरोध करण्यास मात्र अपयश आले आहे. सुनेत्रा पवार या बहुमताने निवडून येतील. पण बिनविरोध निवडणूक करण्यात यश आले नाही. नाशिक सध्या लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषणाने हादरलेले आहेत. एकामागून एक प्रकरणं समोर येत आहेत. भोंदू खरात याला पाच दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एरंडे याला चांगलाच प्रसाद मिळाला आहे. आयटी कंपनीत धर्मांतराचे आणि महिलांच्या शोषणाचे प्रकरण सध्या ऐरणीवर आले आहे. तर राजकीय भूकंप घडवणारी बातमी समोर येत आहे. ऑपरेशन टायगरची शक्यता बळावली आहे. दरेगावातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सूत्र हलवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी इथे वाच

Follow Us