Maharashtra News LIVE : कुणीही उमेदवार देणं चुकीचं आहे असं नाही – शरद पवार
Maharashtra News LIVE Updates : भोंदूबाबा अशोक खरात याच्याबद्दल रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. तर बारामती पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे... एवंढच नाही तर देश, विदेशातील, राजकीय, मनोरंजनाच्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा...

भोंदू अशोक खरात प्रकरणी एक महिला अधिकारी रडारवर आल्या आहेत. SIT तपासात या तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर भोंदू अशोक खरातला मदत केली होती. त्या बदल्यात अशोक खरातने देखील आपलं नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला पाहिजे असलेली पोस्टिंग दिलेली. नाशिकची तत्कालीन महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवारी 6 एप्रिल 2026 निश्चित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, पुण्यात पावसाळ्यात पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांच्या जीवाचे मालमत्तेचे आणि नदीचे संरक्षण करण्यासाठी पालिका आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नदीपात्रा भोवती 168 सीसीटीव्ही चाळे निर्माण करणार आहे. या माध्यमातून पूरस्थितीवर उपाययोजना करण्याचे काम केले जाणार आहे. देश, विदेशातील, राजकीय, मनोरंजनाच्या ताज्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा…
LIVE NEWS & UPDATES
-
जालना : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये वाद
जालना शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये हमरी-तुमरी झाली. शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते कमलेश खरे आणि भाजपाचे अक्षय गोरंट्याल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महात्मा फुले मार्केट उभारणी प्रश्नावर चर्चा सुरू असताना हा वाद झाला.
-
पुणे : भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे शहर पोलिसांकडून तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पुणे लष्कर न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान, पुण्यातील मांजरी पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
-
-
कुणीही उमेदवार देणं चुकीचं आहे असं नाही – शरद पवार
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, ‘कुणीही उमेदवार देणं चुकीचं आहे असं नाही, काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार, समोर कुणीतरी लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत उभं राहावं लागतं.’
-
बीड – ऊसतोड कामगारांना प्रतिटन 500 रुपये देण्याची मागणी
सर्वाधिक ऊसतोडणी कामगारांची संख्या असलेल्या बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ऊसतोड कामगार संघटनेच्या पांडुरंग आंधळे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. यामध्ये ऊसतोडणीसाठी प्रति टन पाचशे रुपये दर देण्यात यावा, दरवाढीचा दरवर्षी लेखी करार करण्यात यावा, ऊस तोडणीच्या कालावधीत प्रसुती होणाऱ्या ऊस तोडणी कामगार मातांना 25 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू आहे.
-
पालघर : गॅस टंचाईच्या विरोधात वंचितचे आंदोलन
देशभरात गॅस टंचाई भासत असून सध्या गॅस टंचाईमुळे नागरिकांना आणि विशेषतः महिलांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याविरोधात आक्रमक झालेल्या वंचित बहुजन आघाडी कडून आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आलं. नरेंदर कब मिलेगा सिलेंडर या टॅगलाईन खाली हातात बॅनर घेऊन वंचित कडून हे अनोखा आंदोलन करण्यात आला असून यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं.
-
-
जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन
जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन
गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन
चूल पेटवून भाकरी करत केला सरकारचा निषेध
-
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन, संचालक मंडळही बरखास्त
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अखेर त्रिभाजन
त्रिभाजन संदर्भातील अधिसूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जारी
जत आणि कवठेमहांकाळ कृषी उत्पन्न बाजार समिती आता होणार वेगळ्या
अधिसूचना जारी होताच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त
सांगली कृषी उत्पन्न समितीवर आता प्रशासक राज
-
तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव आगारातच चालक, वाहकांची अंडा पार्टी, व्हिडीओ व्हायरल
तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव आगारातच चालक, वाहकांची चक्क अंडा पार्टी
आगारातील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या विश्रांती गृहात चालक, वाहकांची अंडा पार्टी
चुलीवर उकडले अंडे, आगार परिसरातही मद्यांच्या बाटल्यांचा खच
व्हिडिओ झाला व्हायरल
-
सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ
सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची तर चांदीच्या दरातही एक हजार रुपयांची वाढ
सोन्याचे दर जीएसटी सह १ लाख ५३ हजार ४७० रुपयांवर
चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ४४ हजार ११० रुपयांवर
-
बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा- एकनाथ शिंदे
महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी कोणताही कार्यकर्ता गाफील राहता कामा नये. निवडणूक लागलीच तर ती झुंजारपणे लढून सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी विजय मिळवायचा आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
-
चुलीवर भाकरी थापत वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन
जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारात चुलीवर भाकरी थापत वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन सुरु आहे. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत करावा, गॅसचा काळाबाजार थांबवावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चूल मांडून त्यावर भाकरी बनवून ती जिल्हाधिकाऱ्यांना देत अनोखे आंदोलन केले.
-
कर्झणी गावाचे गावकरी पुन्हा आक्रमक
बीड तालुक्यातील कर्झणी गावात 50 वर्षांपूर्वी तलाव झाला होता त्यामध्ये गावातील लोकांची घरं आणि जमीन गेली होती. यानंतर प्रशासनाने त्यांना तलावाच्या बाजूलाच जमीन दिली यामध्ये आज काही गावकऱ्यांनी स्वखर्चातून घरं उभारली आहेत तर काही लोक कच्च्या घरात राहत आहेत.
-
शब्बू शेखच्या घरी तपासादरम्यान सापडले अंमली पदार्थ
आरोपी शब्बू शेखच्या घरी तपासादरम्यान अमली पदार्थ सापडले आहेत. स्थानिक लोकांचा आधीपासूनच आरोप होता की आरोपी शब्बू शेख अंमली पदार्थांचा पुरवठा करत होता. पोलीस अंमली पदार्थांच्या प्रकरणाचाही तपास करत आहेत.
-
लासल गावसह 16 गावात पाणीपुरवठा योजना ठप्प
थकीत वीजबिलामुळे लासल गावसह 16 गावात पाणीपुरवठा योजना ठप्प. महावितरणने 30 मार्च रोजी जलशुद्धीकरण केंद्राची वीज केली खंडित. गेल्या 8–10 दिवसांपासून लासलगाव, विंचूरसह 16 गावांत कुत्रिम पाणीटंचाई. दीड महिन्यात 31 लाखांचा भरणा. तरीही वीजपुरवठा बंद.
-
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक शरद पवार पक्षाची वेट ऑन वॉचची भूमिका
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची “वेट ऑन वॉच” ची भूमिका. मुंबईतून पक्षाने दोन एबी फॉर्म पाठवले. मात्र अजूनही कोणीही अर्ज भरला नाही. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे नेमका काय निर्णय घेतात? याकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लक्ष. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी दोन अर्ज पाठवण्यात आले. तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. शेवटच्या क्षणी कोण अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष.
-
पानं, फुलं आज दादांच्या आठवणीने रडत आहेत – सुनेत्रा पवार
“बारामतीतल्या प्रत्येक झाडात, पानात, फुलात, रस्त्याला, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे. पानं, फुलं आज दादाच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी आदरणीय दादाचं स्वप्न साकार करण्यासाठी मी माझं दु:ख तळ घरात कोंडलं. अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारमतीकरांकडे बघून आला आहे” असं सुनेत्रा पवार बोलल्या.
-
बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी पांडूरंग होता – सुनेत्रा पवार
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा मेळावा होत आहे. “दोन महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामतीची ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं मला वाटतं नाही. दादाचं जाण ही फक्त माझी, माझ्या कुटुंबाची व्यक्तीगत नाही. बारामती, देश, महाराष्ट्राची हानी झाली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. बारामती दादांसाठी आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी पांडुरंग होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
-
SIT कडून अशोक खरातच्या जमीन व्यवहारांबाबत बनवला जाणार सविस्तर अहवाल
अशोक खरातच्या ईडी तपासाबाबत महत्वाची घडामोड समोर आली आहे. SIT कडून खरातच्या जमीन व्यवहारांबाबत सविस्तर अहवाल बनवला जाणार आहे. हा अहवाल तयार केल्यानंतर तो ईडीला सादर केला जाणार आहे. सध्या SIT कडून खरातच्या जमीन व्यवहारांबाबत माहिती गोळा केली जात आहे. खरातच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचीही ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
-
निवडणुकीत सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या- पटेल
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. मी काल मल्लिकार्जुन खर्गेंना फोन केला होता. मुख्यमंत्र्यांनीही बिनविरोधासाठी विनंती केली. सुनेत्रा पवार 100 टक्के निवडून येणार. बिनविरोध निवडणुकीसाठी अजूनही प्रयत्न करणार आहोत. आम्ही सगळ्यांनी दादांच्या भूमिकेला साथ दिली. निवडणुकीत सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, अशी विनंती प्रफुल पटेलांनी केली.
-
सुनेत्राताईंना बिनविरोध निवडून द्या- छगन भुजबळ
“बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. सुप्रिया सुळेंनी उमेदवार न देण्याचं आधीच जाहीर केलं होतं. सुनेत्राताईंना तुम्ही निवडून देणार, यात काही शंका नाही. दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. खर्गेंना फोन करण्याचे खूप प्रयत्न केले,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
-
दादा नाहीत ही भावना मनाला चटका लावून जाते- छगन भुजबळ
“दादा नाहीत ही भावना मनाला चटका लावून जाते. मंत्रालयात गेल्यावर दादा कुठून तरी येतील असं वाटतं. या निवडणुकीची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा दिला आहे. सुनेत्राताईंना निवडून देणार यात काही शंका नाही. सुनेत्राताई आता राज्याच्या नेत्या आहेत”, असं छगन भुजबळ म्हणाले.
-
सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देणं ही दादांसाठी श्रद्धांजली- तटकरे
सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देणं ही दादांसाठी श्रद्धांजली असेल. काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांशी संपर्क साधतोय. बिनविरोध निवडणुकीसाठी आम्ही प्रयत्न करतोय, असं सुनील तटकरे म्हणाले.
-
28 जानेवारीला राज्यातील प्रत्येक माणूस हळहळला- सुनील तटकरे
पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी बारामतीत राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात सुनील तटकरे म्हणाले, “28 जानेवारीला राज्यातील प्रत्येक माणूस हळहळला. दादांंच्या नंतरची बारामती असा विचार कुणाच्या मनात आला नसेल. दादांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता वहिनींकडे आहे. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवणं ही वेगळी जबाबदारी असेल. बारामतीच्या निर्मितीत अजितदादांचं मोठं योगदान होतं.”
-
टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा उधळला कट
टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला आहे. कुर्ला येथून 18 वर्षांच्या हमाज सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई केली.
-
नेत्यांनी भोंदू खरातला कॉल का केले ? अंजली दमानिया
चाकणकर, तटकरे यांनी खरातला कॉल केले, या नेत्यांनी भोंदूला कॉल का केले ? अंजली दमानियांचा सवाल
-
बारामती – सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देणं हीच दादांना श्रद्धांजली असेल – प्रफुल्ल पटेल
आज आमचा नेत्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करायचा आहे. माझ्यासह सर्व नेते कार्यकर्ते आले आहेत. बारामतीच्या जनतेने दादावर प्रेम केलं, तसं ते वहिनींवर करतील. या पोटनिवडणुकीत इतर पक्षांनी उमेदवारी देऊ नये अशी आमची भूमिका आहे. आम्ही विनंती करतो की सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून द्यावं, तीच दादांना श्रद्धांजली असेल – प्रफुल्ल पटेल.
-
राहुरीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची खेळी ? बंद दाराआड प्राजक्त तनपुरेंशी चर्चा सुरू
राहुरीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची खेळी पहायला मिळत आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात बंद दाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रविंद्र चव्हाण आणि विखे पाटील यांची तनपुरेंशी चर्चा सुरू.
-
शरद पवार यांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ
नवी दिल्ली – राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. शरद पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली .
-
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करा; छगन भुजबळ यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची पहिल्यापासूनची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू,” असे भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
-
चाकणमध्ये ५ किलो गॅसचा तुटवडा; कामगारांवर चूल पेटवण्याची वेळ
पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरात सध्या ५ किलो गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे कामगार वर्गाचे मोठे हाल होत आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणारे हजारो स्थलांतरित कामगार लहान खोल्यांमध्ये राहतात, मात्र गॅस उपलब्ध नसल्याने त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी उघड्यावर चुली पेटवल्या आहेत, तर चुलीची सोय नसलेल्या अनेक कामगारांनी थेट गावची वाट धरली आहे. या गॅस टंचाईमुळे चाकण परिसरातील असंख्य भाड्याच्या खोल्या सध्या रिकाम्या होत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.
-
मुंबईतील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट, चिंता वाढली
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून, सध्या केवळ ३७.७० टक्के साठा शिल्लक राहिला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा आणि भातसा यांसारख्या महत्त्वाच्या धरणांतील पाणी पातळी खालावल्याने मुंबई महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्या सर्व धरणांमध्ये मिळून ५,४५,६८० दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध असून, वाढत्या उन्हामुळे होणारे बाष्पीभवन चिंतेचा विषय ठरत आहे. मुंबईला दररोज ४,००० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत असल्याने जूनअखेरपर्यंत हा साठा जपून वापरण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
-
आमदार तायडे यांचे बंधू हत्या कट प्रकरणी बच्चू कडूंच्या आवाजाचे सॅम्पल घेणार, कथित ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये
आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजीत तायडे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपातील कथित ऑडिओ क्लिप आता तपासणीच्या चक्रात अडकली आहे. ही वादग्रस्त ऑडिओ क्लिप आज अमरावतीच्या प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी आणली जाण्याची शक्यता आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आवाजाशी मिळताजुळता असल्याचे बोलले जात आहे. सत्यता पडताळण्यासाठी बच्चू कडू यांनाही प्रयोगशाळेत आवाजाचे नमुने देण्यासाठी बोलावले जाण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाचा अंतिम अहवाल येण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार असून, बच्चू कडू यांच्यावर आधीच खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
सुनेत्रा पवारांनी अर्ज भरण्यापूर्वी घेतले अजित दादांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित दादांच्या स्मृतिस्थळावर दाखल झाल्या आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित आहेत.
-
मुंबईतील दिंडोशीत दोन गटांत हाणामारी, 8 जणांना अटक
मुंबईतील दिंडोशी नागरी निवारा परिसरात काल रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या आज सायंकाळी ६ वाजता नागरी निवारा येथे भेट देणार असून, ते तिथे हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत.
-
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काटेवाडीत..
आज सुनेत्रा पवार बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरिता अर्ज भरणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काटेवाडीत आहेत. यावेळी भाजपासून चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
भाजप स्थापना दिनानिमित्त दिलेल्या जाहिरातीतून पालकमंत्री जयकुमार गोरेंचा फोटो वगळला
आमदार विजयकुमार देशमुखांनी दिलेल्या जाहिरातीतून पालकमंत्री गोरेंचा फोटो वगळला. पालकमंत्री गोरे आणि भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. विशेष म्हणजे या जाहिरातीत सोलापूरच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचाही फोटो वगळला
–
-
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली
दररोज जवळपास 800 गाड्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत आहे दाखल. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेतमालाने भरलेल्या वाहनांच्या रांगा. बाजार समितीमध्ये सध्या तूर, हरभरा, गहू या शेत पिकाची मोठी आवक. जवळपास तीस हजार क्विंटल शेतमालाची रोज कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक.
-
सुनेत्रा पवार दुपारी 12 वाजता भरणार अर्ज
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरिता उपमुख्यमंत्री आज दुपारी बारा वाजता अर्ज भरणार आहेत. यावेळी महायुतीमधील महत्वाचे नेते उपस्थित असणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
सुनेत्रा पवार आज भरणार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सुत्रे आपल्या हातात घेतली. आज बारामती विधानसभेच्या निवडणुकीकरिता सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न केली जात आहेत.
-
48 तासात नांदेड शहरात पाचवा खून
48 तासात नांदेड शहरात पाचवा खून झाला आहे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात एका तरुणाचा खून झाला आहे. कारण अद्याप अस्पष्ट आहे. वॉकिंग आलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री गँगवार मध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री मुरमुरा गल्लीत एकाला संपवले. आज एका जनाला ठार केले.. जुन्या वादातून खून झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
पुण्यात पुढील दोन दिवस तापमान राहणार स्थिर…
गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शहरातील कमाल आणि किमान तापमाना सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत रविवारी कमाल तापमान स्थिर राहून किमान तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली. पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्री विभागाने वर्तवली आहे. शहर आणि परिसरात रविवारी किमान तापमानात साधारण दोन अंश सेल्सिअस वाढ होऊन ते 20.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस इतके राहिले.
-
कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांची ‘मिडनाईट’ कारवाई!
वाहतूक पोलिसांची रात्रभर विशेष मोहीम: ड्रंक अँड ड्राईव्ह व नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आलं. शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी अपघात व हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. काळ्या फिल्म व फॅन्सी/तुटलेल्या नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. अचानक कारवाईमुळे बेजबाबदार वाहनचालकांची पळापळ झाली.
-
आंबा बागायतदारांसाठी येत्या गुरुवारी पुण्यात बैठक…
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना चुकीची आणि भेसळ युक्त कीटकनाशके विक्री झाल्याच्या कृषी विभागाकडे तक्रारी आल्या आहेत. याचा परिणाम आंबा पिकावर झाला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत गुरुवारी कृषी आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. शेतकऱ्यांनी खते कीटकनाशके रोखीने खरेदी केल्यास किमतीपेक्षा 50 टक्क्यापर्यंत सवलत देत विक्रेते व कंपन्या कडून मोठ्या प्रमाणात नफा कमवला जात असल्याची बाब पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस विविध औषधे कंपनीचे प्रतिनिधी कोकण विभागीय कृषी सहसंचालक तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांना उपस्थित राहण्यास कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे.
-
हडपसर रेल्वे स्थानकावर १५३ कोटींचा खर्च…
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पुणे रेल्वे विभागातील २० स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. त्यातील दोन स्थानकाचे उद्घाटन झाले असून, चार स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. अमृत भारत योजनेंतर्गत १५३ कोटी रुपये खर्च करून हडपसर कोचिंग टर्मिनल येथील यार्डची क्षमता आणि प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली आहे.
-
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात ६ लाख १५ हजार भाडेकरार नोंदणी…
रोजगार, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे पुणे जिल्हा आता वास्तव्यासाठी राज्याचे मुख्य केंद्र बनत आहे. राज्यात सर्वाधिक भाडेकरार हे पुणे जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण १५ लाख ३१ हजार इतके भाडेकरार नोंदविण्यात आले. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात एकूण ६ लाख १५ हजार इतके भाडेकरार नोंदविले आहेत.
-
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये जादूटोण्याचा प्रयत्न फसला; तांत्रिकासह 4 आरोपी अटकेत
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये जादूटोण्याचा प्रयत्न फसला असून तांत्रिकासह 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंजनगाव सुर्जी शहरातील अंबादेवी साखर कारखाना परिसरातील घटना आहे. घटनास्थळी पोलिसांना खोदलेला खड्डा सोबत लिंबू, मिरची, हळद, कुंकू, बाहुल्या, हार-फुले तसेच खड्डा खोदण्यासाठी लागणारे टिकास, फावडे आदी जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. रात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास कारखान्यातील चौकीदाराला मंदिरासमोर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जादूटोण्याचा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येताच तो घाबरून गेला आणि तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिस येण्यापूर्वीच तांत्रिकासह आरोपी तेथून पसार झाले होते.
-
नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती उद्योगावर युद्धाचा परिणाम होणार
गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने मुर्त्यांचे दर वाढणार आहेत. लोखंड ५३ वरून ६५ रुपये किलो तर वीस किलोच्या कलर मागे तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. फायबर, कथा आणि इंधन महागल्याने उत्पादन खर्च वाढला. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे यंदा गणेश मूर्तींच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विदेशात जाणारी निर्यातही वाहतूक अडचणींमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सुमारे २५ कारखान्यांमध्ये मूर्ती उत्पादन सुरू आहे.
-
जिल्ह्यात मार्चमध्ये 1407 हेक्टरवरील पिकांचे अवकाळीमुळे नुकसान, प्राथमीक अहवाल शासनाकडे
धाराशिव जिल्ह्यात मार्च व एप्रिल मध्ये ही अवकाळीने कहर केला असुन यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. सलग पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागासह रब्बी हंगामातील बायागती व जिरायती पिकांचे मोठ नुकसान झाल आहे. याबाबत कृषी विभागाने मार्च महीन्यातील 1407 हेक्टरच्या नुकसानीचे पंचनामे केले असुन शासनाकडे प्राथमीक अहवाल पाठवला आहे. तर एप्रिल मधील नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
Published On - Apr 06,2026 8:04 AM
