तरुणांनो तयारी सुरु करा, राज्यात पोलिसांच्या मेगा भरतीस मंजुरी

maharashtra police bharti 2024 | लोकसभेची निवडणूक आचारसंहिता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेपूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. आता काही दिवसांत भरतीची जाहिरात येणार आहे.

तरुणांनो तयारी सुरु करा, राज्यात पोलिसांच्या मेगा भरतीस मंजुरी
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 10:30 AM

मुंबई, दि.1 फेब्रुवारी 2024 | राज्यातील तरुणांसाठी नवीन वर्षात चांगली बातमी आली आहे. राज्याच्या पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या युवकांना चांगली संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17,471 पोलिसांची भरती केली जाणार आहे. 2024 मध्ये ही मेगा भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यात 70 वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच सध्या पोलीस दलातील मनुष्यबळ आहे. परंतु आता नवीन आकृतीबंध तयार केला गेला आहे. या आकृतीबंधानुसार भरती करण्यास वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात तब्बल 17,471 पोलिसांची भरती केली जाणार आहे. पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक यापदांसाठी लवकरच जाहिरात निघणार आहे.

कंत्राटी भरतीवरुन अधिवेशनात वादळ

पोलीस दलात कंत्राटी भरती होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशात सरकारवर जोरदार टीका केली होती. शिंदे-फडणवीस सरकार पोलीस दलात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावला. तसेच नवीन आकृतीबंधानुसारच राज्यात पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यांमधील गावांची गरज ओळखून नवीन पोलीस ठाणेही मंजूर केले गेली असल्याचे त्यांनी म्हटले होते.

पोलीस दलात 100 टक्के भरती

राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते. परंतु हा नियम पोलीस दलासाठी अपवाद ठरला आहे. राज्याच्या पोलीस दलात 100 टक्के पदभरतीला मान्यता दिली आहे. यामुळे आता 17,471 पदांसाठी भरतीची जाहिरात निघणार आहे. मागील वर्षी राज्यात 23 हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. त्या भरतीचे प्रशिक्षण राज्यातील दहा केंद्रांमध्ये सुरु आहे. हे प्रशिक्षण या महिन्यात संपणार आहे. यामुळे आता नवीन भरतीची प्रक्रिया सुरु होत आहे.

हे सुद्धा वाचा

लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी प्रक्रिया

लोकसभेची निवडणूक आचारसंहिता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेपूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. आता काही दिवसांत भरतीची जाहिरात येणार आहे.

Non Stop LIVE Update
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.