Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस बरसणार, भर उन्हाळ्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पुण्यातही आज जोरदार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यात पावसाने अशाप्रकारे हजेरी लावल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरही त्याचा परिणाम पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा पाऊस पुढचे आणखी दोन दिवस महाराष्ट्रात मुक्काम करण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांमध्ये धो-धो पाऊस बरसणार, भर उन्हाळ्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट
भर उन्हाळ्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 5:17 PM

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पुण्यातील कात्रज, स्वारगेट आणि कोंढवा या भागात पाऊस सुरु आहे. तर सांगलीच्या वळवा तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. गारपिटीमुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अहमदनगर आणि पारनेर या ठिकाणी देखील पाऊस पडला आहे. याशिवाय पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात आज पाऊस पडतोय. पुण्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. पण पुण्यात फक्त आजच नाही. तर पुढचे दोन दिवस जास्त महत्त्वाचे असणार आहेत. कारण पुणे जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला होता. पण पुढच्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात 11 आणि 12 मे या दोन दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 13 आणि 14 तारखेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आणखी कुठे-कुठे पावसाची शक्यता?

सातारा जिल्ह्यात 12 मे या तारखेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी देखील 12 तारेखासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या वेळी वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास असा असण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत कुठे-कुठे पाऊस पडला?

अवकाळी पावसामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर परिणाम पडला आहे. आज पुणे शहरात नियोजित असलेल्या सभांवर पावसाचा परिणाम बघायला मिळतोय. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची सभा अद्याप सुरु झाली नाही. राज ठाकरे यांच्या सभेबाबतही साशंकता आहे. पुणे जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडलाय. तर काही ठिकाणी जोरदार वारे वाहत आहेत. ढगाळ वातावरण आहे.

सांगलीत गारपिट

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही भागांना वादळी वारा आणि गारपिटासह पावसाने झोडपले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यात आज सकाळपासूनच उन्हाचा पारा चाळीसच्यावर गेलेला होता. दुपारपासून आभाळ आले होते. विजांचा कडकडाट, वादळासह 20 मिनिटे गारांचा अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे या परिसरातील आंब्याचे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. या परिसरातील विहिरी कुपनलिका यांनी तळ गाठला होता. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा आल्याने बळीराजा सुखावला आहे. पण बळीराजाला मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे मशागत करता येणार नाही.

बुलढाणा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

एकीकडे उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. सतत दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसतोय. यामुळे ऐन उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा अनुभवायला मिळतो. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान केलंय. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने येथील बाजार समितीमधील शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला आहे. यावेळी धान्य झाकत असताना शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली असल्याचे पाहायला मिळाले. तर मेहकर, चिखली, बुलढाणासह इतर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.