AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Alert : 27, 28 ऑक्टोबरला महाराष्ट्रात तुफान पाऊस, IMD च्या ताज्या अंदाजात महत्त्वाची माहिती; कुठे कुठे बरसणार?

बंगालच्या खाडीत 26 ते 28 ऑक्टोबर रोजीच्या काळात वाऱ्याचा वेग वाढू शकतो. हा वेग 70 ते 80 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. वातावरणाची स्थिती अशीच राहिली तर हा वेग पुढे 90 किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो.

Rain Alert : 27, 28 ऑक्टोबरला महाराष्ट्रात तुफान पाऊस, IMD च्या ताज्या अंदाजात महत्त्वाची माहिती; कुठे कुठे बरसणार?
maharashtra rain updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 6:29 PM
Share

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात सध्या दुष्काळ आहे. रबी हंगामातील पिकांसाठी एखादा चांगला पाऊस पडावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सध्या गोव्यात चांगला पाऊस झालाय. राजधानी पणजी येथे तसेच गोव्यातील काही भागात पावसाने हजेरी लावलीय. पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातही पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत होत असलेला वातावरणी बदल महाराष्ट्रात पाऊस येण्यासाठी पोषक स्थिती निर्माण करतोय.

बंगालच्या खाडीत काय घडतंय?

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या क्षेत्रात पुढच्या दिवसात वाढ होणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. कमी दाबाचे हे क्षेत्र वाढल्यास याचे चक्रीवादळातही रुपांतर होऊ शकते. याच चक्रीवादळाच्या वाटचालीवर महाराष्ट्रातील पावसाचं भवितव्य ठरणार आहे. सध्याच्या ताज्या अंदाजानुसार येत्या 27 ते 29 ऑक्टोबरच्या काळात विदर्भ तसेच मराठवाड्यात पाऊस बरसू शकतो. पावसाचे हे प्रमाण नेमके किती असेल, हे अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नाही. परंतु चक्रीवादळाची तीव्रता यावरूनच पाऊस किती आणि कसा असेल हे ठरणार आहे.

महाराष्ट्रासह सहा राज्यांत पाऊस

बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे पुढच्या चार दिवसात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांवर होणार आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश या राज्यात पाऊस होऊ शकतो. पूर्वेत्तर राज्यातही पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

बंगालच्या खाडीत 90 किमी प्रतितास प्रमाणे वारे वाहणार

बंगालच्या खाडीत 26 ते 28 ऑक्टोबर रोजीच्या काळात वाऱ्याचा वेग वाढू शकतो. हा वेग 70 ते 80 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. वातावरणाची स्थिती अशीच राहिली तर हा वेग पुढे 90 किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो. दरम्यान, सध्याच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पाऊस बरसला तर शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा असेल. तसेच राज्यात दुष्काळामुळे पाण्याचे जे दुर्भिक्ष्य निर्माण झालेले आहे, त्यातून काहीशी सुटका होईल. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...