Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या विश्वासू सहकाऱ्याला दणका, महसूल विभागाकडून मोठी कारवाई

मनोज जरांगे पाटील यांचा विश्वासू सहकारी मानल्या जाणाऱ्यावर आंदोलाकांला दणका बसला आहे. महसूल विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आला आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या विश्वासू सहकाऱ्याला दणका, महसूल विभागाकडून मोठी कारवाई
manoj jarange news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 8:37 AM

जालन्यातून मोठी बातमी हाती आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याला महसूल विभागाने मोठा दणका दिला आहे. गोदावरी नदी पात्रात 2000 ब्रास अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
दंडात्मक कारवाईतून वगळणारा तत्कालीन तहसीलदारांचा सुधारित आदेश अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. महसूल आदेश रद्द केल्याने मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण?

जालन्यातील (Jalna) अंबड तालुक्यातल्या साष्ट पिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रातील 2012 अवैध वाळू उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. मनोज जरांगे यांचे विश्वासू असलेले सहकारी संजय नानासाहेब कटारे यांच्या 4 कोटी 90 लाख 72 हजार दोनशे रुपयांचा दंडात्मक कारवाईतून वगळणारा तत्कालीन तहसीलदाराचा सुधारित आदेश रद्द करण्यात आला आहे. अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हा आदेश रद्द करत हा मोठा दणका दिलाय. त्यामुळे मूळ दंडात्मक आदेश पूर्ववत होऊन गट क्रमांक 265 वर हा बोजा कायम असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

स्वास्थ पिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रात 2000 ब्रास अवैध वाळू उत्खनन झाल्या प्रकरणी 24 मार्च 2023 रोजी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या संयुक्त पथकाकडून पंचनामा करण्यात आला होता. त्या आधारित तत्कालीन तहसीलदारांनी 18 जणांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत 4 कोटी 90 लाख 72 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावला होता. आता अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या सहकाऱ्याला मोठा दणका बसलाय.  तत्पूर्वी, तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये 18 लोकांच्या नावे 4 कोटी 90 लाख 72 हजार दोनशे रुपयांचा सामूहिकरित्या व स्थावर मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये नियम 48 कलम 7 व 8 अन्वये अवैध गौण खनिज उत्खनन व त्यावरील प्रतिबंधातात्मक दंडनीय वसुली करण्याचे आदेश दिले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us