AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | भारतातील सर्वात उंच धबधबा फेसाळला, विहंगम दृष्य कॅमेऱ्यात कैद

सातारा जिल्ह्यातील पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच धबधबा अशी ओळख असलेला भांबवली वजराई धबधबा प्रवाहित झाला आहे. (Maharashtra Satara Bhambavli Vajrai Waterfall during rainy season)

VIDEO | भारतातील सर्वात उंच धबधबा फेसाळला, विहंगम दृष्य कॅमेऱ्यात कैद
Satara Bhambavli Vajrai Waterfall
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 3:21 PM
Share

सातारा : राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे डोंगर दऱ्यातील सर्वच धबधबे ओसांडून वाहत आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच धबधबा अशी ओळख असलेला भांबवली वजराई धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या धबधब्याचे विहंगम दृष्य पाहायला मिळत आहे. (Maharashtra Satara Bhambavli Vajrai Waterfall during rainy season)

भांबवली धबधब्याचे विहंगम दृष्य 

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे.

या धबधब्याचे पाणी हे तीन टप्प्यात जमिनीवर पडते. तसेच हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो. सध्या कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे याच्या सांडव्यावरुन पडणाऱ्या पाण्यापासून पुढे 5 किलोमीटर या धबधब्याचे विहंगम दृष्य पाहायला मिळते. कोरोनामुळे हा धबधबा सध्या पर्यटकांविना वाहत आहे.

पर्यटकांचा हिरमोड

महाबळेश्वर हे देशातील अनेक पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरमध्ये या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येतात. सध्या महाबळेश्वरचे सर्वच रस्ते धुक्यामध्ये हरवून गेले आहे.  मात्र महाबळेश्वरमध्ये पर्यटन अद्याप बंदच आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे या ठिकाणी विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच पर्यटनाचे सर्व पॉईंट पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी महाबळेश्वरकडे पाठ फिरवली आहे.

पाहा व्हिडीओ : 

(Maharashtra Satara Bhambavli Vajrai Waterfall during rainy season)

संबंधित बातम्या :

VIDEO | महाराष्ट्राचे मिनी काश्मीर धुक्यामध्ये हरवले, पर्यटकांचा मात्र हिरमोड

PHOTO | कणकवलीतील सावडाव धबधबा फेसाळला, लॉकडाऊनमुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.