Maharashtra Rain: महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी! मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांना IMD चा अलर्ट; हवामान विभागानं काय सांगितलं?
IMD Issues Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांना IMD ने अलर्ट दिला आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसाठी इशारा जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने 7 नोव्हेंबरपर्यंतचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. 5 नोव्हेंबरपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पालघरमध्येही सध्या कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. ठाणे आणि रायगडमध्ये 3 नोव्हेंबर रोजी हलका पाऊस पडू शकतो. यानंतर 4 ते 7 नोव्हेंबरपर्यंत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही धोका नाही.
कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरीमध्ये 3 नोव्हेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 4 नोव्हेंबर रोजीही हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 4 नोव्हेंबर रोजीही हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे. 5 नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता असून 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी हवामान कोरडे राहील. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये पुढील 24 तासांत हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 4 ते 7 नोव्हेंबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
3 नोव्हेंबर रोजी सातारा आणि सांगलीमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 नोव्हेंबर रोजी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 3 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 4 नोव्हेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस आणि 5 नोव्हेंबर रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे. 3 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 नोव्हेंबर रोजी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. परभणी आणि हिंगोली येथे 3 नोव्हेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस आणि 4 नोव्हेंबर रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
3 नोव्हेंबर रोजी नांदेड आणि लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, मेघगर्जना आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. 4 नोव्हेंबर रोजीही हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बीड आणि धाराशिवमध्ये पुढील 48 तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथे 7 नोव्हेंबरपर्यंत हवामान सामान्य राहील आणि कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही.