AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑगस्टपासून दडी दिलेला पाऊस 18 ऑक्टोबरपासून परतणार पण तरीही ‘या’मुळे शेतकरी चिंतेत

शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंताजनक आणि फायदा देणारी अशी घडामोड समोर आली आहे. पावसाने दडी मारलेली आहे, पण आता परतीचा पाऊस येणार आहे. हा पाऊस काढणीला आलेल्या शेतमालाचे नुकसान करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑगस्टपासून दडी दिलेला पाऊस 18 ऑक्टोबरपासून परतणार पण तरीही 'या'मुळे शेतकरी चिंतेत
Maharashtra Rain updateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 9:41 PM
Share

पावसाची वाट पाहून शेतकरी राजा थकला. पण पावसाने काही दर्शन दिलेले नाही. गेल्या दोन महिन्यांत पावसाने पूर्णपणे दडी मारलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे. याच पार्श्वभूमिवर यावर्षीही सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पावसाचा फटका बसलेला असताना आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण या पावसाने आता शेतकऱ्यांना मोठा फटकाही बसू शकतो. कारण हा परतीचा पाऊस आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा आणि नुकसान दोन्ही होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काहीशी चिंताही वाढवणारा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज जाहीर केला आहे. 18 ऑक्टोबरनंतर नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं परतीच्या पावसाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा आणि नुकसान दोन्ही होणार, काढणीला आलेल्या शेतमालाचे नुकसान तर कापूस, धान, संत्रा पिकांना फायदा होणार आहे, अशी माहिती डॉ. प्रवीण कुमार, नागपूर हवामान विभाग शास्त्रज्ञ यांनी दिली आहे.

दरम्यान, हे वर्ष पावसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, एल निनोच्या संकटात देश आहे. या सावटामध्ये शेतकरी स्वतःला सावरत आहे. यावर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात आणि जुलै महिन्यामध्ये खरंतर पावसाने चांगला जोर पकडलेला पाहायला मिळाला. पण त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मोठा खंड पाहायला मिळाला आहे. पण आता राज्यात पाऊस परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण हा पाऊस मात्र शेतकऱ्यांचं आणखी नुकसान करणार की काय, अशी चिंता सतावते आहे.

दुसरीकडे राज्यातील इतरही भागांत आता पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यासोबतच तापमानात वाढ देखील कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 17 ऑक्टोबरसाठी जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा