मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, रेड अलर्ट जारी

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी येत्या २ ते ३ दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, रेड अलर्ट जारी
| Updated on: Aug 26, 2024 | 5:13 PM

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने म्हटले की, पुढील दोन ते तीन दिवस या राज्यांमध्ये तसेच गुजरात आणि गोव्याच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, बांगलादेश आणि गंगा नदीच्या लगतच्या पश्चिम बंगाल भागात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि झारखंडमध्ये ही पावसाची शक्यता आहे. याबाबत विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

IMD ने सांगितले की, 26 ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 ते 29 ऑगस्टपर्यंत पूर्व आणि दक्षिण राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये असेच हवामान कायम राहील. येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्येही मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

IMD ने सांगितले की, 26 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशात ताशी 50 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील. 26-27 ऑगस्ट रोजी दक्षिण राजस्थानमध्ये ताशी 60 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील. गुजरात आणि पाकिस्तानच्या लगतच्या भागात, उत्तर महाराष्ट्र आणि ईशान्य अरबी समुद्रात 26 ऑगस्ट रोजी ताशी 55 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. जे 27 आणि 28 ऑगस्टला ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढू शकतात.

IMD नुसार, गुजरात, पाकिस्तान आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारी भागात 30 ऑगस्टपर्यंत हवामान खराब राहू शकते. 26 ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरातही समुद्राची स्थिती उग्र राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज (26 ऑगस्ट) काही जिल्ह्यांना रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

मुंबई, पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. राज्यातील अनेक भागात अतिमुसळधार पावासाचा इशारा ही देण्यात आला होता. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आले होते. .