AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवींद्र चव्हाणांच्या हातात सीक्रेट यादी… विधान परिषदेची लॉटरी दिल्लीत फुटणार; चव्हाणांच्या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे डोळे

MLC : आज महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इच्छुक उमेदवारांची यादी घेऊन दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रवींद्र चव्हाणांच्या हातात सीक्रेट यादी... विधान परिषदेची लॉटरी दिल्लीत फुटणार; चव्हाणांच्या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे डोळे
Ravindra Chavhan MLC Election UpdateImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 26, 2026 | 6:06 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीची चर्चा सुरू आहे. महायुतीत या निवडणुकीच्या जागावाटपाबाबत गोंधळ सुरू आहे. तिनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या असल्या तरी अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीतील काही जागांवर भाजप आणि शिवसेनेने या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. अशातच आज आज महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इच्छुक उमेदवारांची यादी घेऊन दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

CM फडणवीसांनी बोलावली बैठक

विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा महायुतीतील तिढा आज सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुतीची बैठक बोलावली आहे. वर्षा या शासकिय निवासस्थानी आज सायंकाळी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच मंत्री उदय सामंत राहणार हे या बैठकीला हजर असणार आहेत. पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी, तर नाशिक व संभाजीनगर वरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

रवींद्र चव्हाण दिल्लीला जाणार

समोर आलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज बैठकीनंतर दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्ली दौऱ्यात चव्हाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेचा फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावे व इतर बाबींची तपशीलवार माहिती ते पक्ष नेतृत्वाला देणार आहेत. त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या 12 जागांसाठी एकूण 48 नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीला जाणार असल्याचे समोर आले आहे.

परभणीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

परभणीच्या भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. परभणी-हिंगोली विधानपरिषदेची जागा भाजपाला सोडा या मागणीसाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या शिष्टमंडळासोबत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही शिष्टमंडळासोबत फडणवीस यांची भेट घेतली. या जागेवर लढण्यासाठी इच्छुक असलेल्या पाच जणांची नावे देखील मुख्यमंत्री यांच्याकडे दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

चव्हाण यांचा दिल्ली दौरा 

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,