AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यात मोठी खळबळ, निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात थेट बदल…

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शनिवारी राज्यातील एकूण 40 ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुखपदांची घोषणा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेते, आमदार आणि खासदारांची जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मराठवाड्यात मोठी खळबळ, निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात थेट बदल...
Eknath Shinde
| Updated on: Nov 23, 2025 | 9:59 AM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच मराठवाड्यात शिवसेना शिंदे गटात मोठे बदल करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मराठवाडा विभागातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मोठे फेरबदल केले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पक्षातील ज्येष्ठ नेते, आमदार आणि खासदारांची जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अनुभवी नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संपर्कप्रमुखांना निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातच थांबून काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या नियुक्त्यांमधून पक्षाने आगामी निवडणुका किती गंभीरपणे घेतल्या आहेत, हे स्पष्ट होते. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शनिवारी राज्यातील एकूण 40 ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुखपदांची घोषणा केली. यात आगामी नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत पक्षाला मजबूत आणि पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगर- विलास पारकर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण- अर्जुन खोतकर, जालना- अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर.

बीड- टी. पी. मुंडे, मनोज शिंदे, धाराशिव- राजन साळवी, नांदेडः सिद्धराम म्हेत्रे, लातूर- किशोर दराडे, परभणी- आनंद जाधव, हिंगोली- हेमंत पाटील. आगामी निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली असून जोरदार तयारी केली जात आहे. संपर्कप्रमुखपदांची फक्त यादीत नाही तर त्यांनी स्पष्टपणे निवडणुका होईपर्यंत जिल्हे न सोडण्याची आदेश देण्यात आली आहेत. आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात अनेक बदल होताना दिसत आहेत. पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद निर्माण झाला. फक्त वादच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट अमित शाह यांच्या भेटीला या मुद्द्यावरून पोहोचले. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते. यावेळी त्यांनी कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी दाखवत आपली नाराजी व्यक्त केली.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...