AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं ठरलं; निवडणुकीपूर्वीच केली मोठी घोषणा, घडामोडींना वेग

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. प्रचाराला देखील वेग आला आहे, तर दुसरीकडे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळत आहे, आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं ठरलं; निवडणुकीपूर्वीच केली मोठी घोषणा, घडामोडींना वेग
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 7:14 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला वेग आला आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी नगर पंचायत  आणि नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी महापालिकांची निवडणूक डोळ्या समोर ठेवून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र या इनकमिंगचा फटका हा महाविकास आघाडीला कमी आणि महायुतीलाच जास्त बसत आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटात सध्या नाराजीचं वातावरण आहे, अनेकदा शिवसेना  शिंदे गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून ही नाराजी व्यक्त देखील होत आहे.

दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे निवडणुकीपूर्वीच  शिवसेनेकडून 40 ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश पक्षनेतृत्वाकडून संपर्क प्रमुखांना देण्यात आले आहेत. खासदार नरेश मस्के यांच्याकडे नवी मुंबई, ठाणे आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपामध्ये जोरदार इनकमिंग 

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. येत्या दोन डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर राज्यात लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ  शकते, या सर्व निवडणुका डोळ्या समोर ठेवून सध्या भाजपात सर्वच पक्षामधून जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र यावेळी याचा सर्वात जास्त फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. यावरून शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report