AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महायुतीमध्ये संघर्षाला सुरुवात, पहिल्यांदाच एकनाथ शिंदे भाजपवर कडाडले, केलं मोठं वक्तव्य

महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं दिसून येत नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग झालं, याचा मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला असून, त्यावरून आता नाराजीनाट्य सुरू झालं आहे.

मोठी बातमी! महायुतीमध्ये संघर्षाला सुरुवात, पहिल्यांदाच एकनाथ शिंदे भाजपवर कडाडले, केलं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 7:04 PM
Share

राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या इनकमिंगचा फटका हा महाविकास आघाडीला कमी आणि भाजपचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटालाच जास्त बसला आहे. यावरून सध्या महायुतीमध्ये नाराजीचं वातावर आहे. शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून तर थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्यात आला होता, त्यानंतर  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले, तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, सध्या शिंदे यांचा दिल्ली दौरा चांगलाच चर्चेत आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी भाजपावर आता थेट टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

डाहाणू नगर परिषद निवडणुकीमधील शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माच्ची यांच्या प्रचारसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘एवढे उमेदवार आणि एवढे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ज्या उमेदवारांनी आपले उमेदवार मागे घेतले त्यांचे अभिनंदन, या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा फडकणार आहे. लाडक्या बहिणी सत्ता उलटून टाकतात, डहाणूमध्ये जेवढा समुद्र मोठा आहे, तेवढी लोकांची मनं देखील मोठी आहेत.   या सभेला जी गर्दी उसळली त्यावरून राजू माच्ची यांचा विजय निश्चित आहे, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजपचं नावं न घेता पहिल्यांदाच जोरदार टीका केली आहे. एकाधिकार शाही आणि अहंकाराविरोधात आपण आता एकत्र आलो आहोत. असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावल्याची चर्चा आहे, तसेच  राजू माच्ची यांच्या निषाणीवर शिक्का मारा आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहनही यावेळी शिंदे यांनी केलं.

मात्र आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या टीकेवर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.  अहंकार संपवण्यासाठी आपण एकत्र आलोय, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपावर केली नसून, उद्धव ठाकरे यांच्यावर केली असल्याचं म्हटलं आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ