AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन आता दूर, भर सभेत एकनाथ शिंदेंचा शब्द, योजनेबाबत मोठी बातमी

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आतमध्ये आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ही योजना राज्यातील महिला वर्गांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली असून, आता या योजनेबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन आता दूर, भर सभेत एकनाथ शिंदेंचा शब्द, योजनेबाबत मोठी बातमी
लाडकी बहीण योजना Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 4:03 PM
Share

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा गरीब कुटुंबांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.  ही योजना विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी जाहीर करण्यात आली होती, या योजनेचा मोठा फायदा हा महायुतीला मिळाल्याचं देखील समोर आलं, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, तर महाविकास आघाडीला मोठा दणका बसला होता. दरम्यान विधानसभा प्रचाराऐवळी महायुतीमधील अनेक नेत्यांनी या योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करण्याची देखील घोषणा केली होती, राज्यात सरकार आलं तर 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये.

दरम्यान ही योजना सुरू करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर येत आहे, त्यामुळे अशा महिलांना या योजनेतून वगळण्याच्या हालचालींना वेग आला असून, अशा अनेक महिलांची नावं या योजनेतून कमी करण्यात आली आहेत, तसेच पात्र असेल तरच महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, आणि सरकारच्या तिजोरीवरील भार थोडा हलका व्हावा यासाठी आता सरकारकडून या योजनेसाठी केवायसी सक्तीची करण्यात आली आहे. सुरुवातील केवायसीसाठी  18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती, त्यानंतर आता यामध्ये वाढ करण्यात आली असून, केवायसीसाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे.

दरम्यान या योजनेतून महिलांची नाव वगळ्यात येत असल्यामुळे आता विरोधकांकडून या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होत आहे. ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे, ही योजना खरच बंद होणार का? अशी भीती त्यामुळे निर्माण झाली आहे.

आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा संभ्रम दूर केला आहे, ही योजना कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते पालघर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. पुन्हा एकदा ही योजना बंद होणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी