ग्राहकांची सोने खरेदीसाठी झुंबड, सोन्यात बनवाबनवी, ग्राहकांना विकले जात होते थेट हे सोने, BIS ने केली सोन्याची जप्ती..

सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. त्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीला सुरूवात केली. त्यातच आता ज्याची भीती तीच बातमी पुढे येत आहे. पुण्यात एका आस्थापनेवर मोठी कारवाई करण्यात आली. मोठा घोळ केला जात होता.

ग्राहकांची सोने खरेदीसाठी झुंबड, सोन्यात बनवाबनवी, ग्राहकांना विकले जात होते थेट हे सोने,  BIS ने केली सोन्याची जप्ती..
Gold jewellery
| Updated on: Nov 28, 2026 | 3:33 PM

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात बेक्कार घसरण होत आहे. लोकांकडून मोठ्या संख्येने सोन्याची खरेदी केली जात आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली. दणादण सोन्याचे भाव घसरत आहेत. 2 लाखाच्या आसपास सोने काही महिन्यांपूर्वीच गेले होते. आता सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याच्या भावात घसरण होत असल्याने अनेकांकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. काहींचे म्हणण आहे की, सोन्याचे भाव 1 लाखाच्या खाली जातील तर काहींचे म्हणणे आहे की, यापेक्षा सोने खाली जाणार नाही. यादरम्यानच ग्राहकांकडून सोन्याची खरेदी केली जात आहे. मागील काही महिने सोने त्याच्या उच्चांकावर पोहोचल्याने लोकांनी सोने खरेदी थांबवली होती. पण आता सोने खरेदीवर भर दिला जात आहे.

त्यातच ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जात असतानाच मोठे फसवणूक ग्राहकांची केली जात आहे. पुण्यात एका प्रसिद्ध आस्थापनेवर कारवाई करण्यात आली. हॉलमार्किंग अनिवार्य नियमांचे कथित उल्लंघन करून सोन्याची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. भारतीय मानक ब्यूरोच्या पुणे शाखेने यादरम्यान मोठी कारवाई केली.

Loading...

पुणे येथील रविवार पेठेतील मोती चाैकातील आस्थापनेवर ही कारवाई करण्यात आली. हेच नाही तर कारवाई दरम्यान तब्बल 174.35 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आली. महिलांच्या सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या वाट्या, चेन आणि इतर काही दागिन्यांवर आवश्यक हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन शिवाय आढळून आले. भारतीय मानक ब्यूरो अधिनियम 2016 च्या तरतुदीनुसार, कारवाईकरिता हे सर्व सोने ताब्यात घेण्यात आले.

1 एप्रिल 2023 पासून भारतीय अनिवार्य हॉलमार्किंग असल्याशिवाय सराफांना 6 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांकाशिवाय कोणताही सोन्याचा दागिना विकता येणार नाही. जर अशी दागिने विकताना सापडली तर BIS कायद्यानुसार कारवाई होईल. यात जेलचीही शिक्षा होऊ शकते. त्यातच ही मोठी कारवाई पुण्यात करण्यात आल्याने एकच मोठी खळबळ उडाली आहे. इतरही ज्वेलर्सवर बारीक लक्ष आहे, सोन्याच्या भावात घसरण झाल्याने सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जातंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us