NCP Meeting: यापुढे ‘स्वर्गीय अजितदादा’ असा उल्लेख नको; राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा ठराव! मुख्यमंत्र्यांकडे 3 महत्त्वाच्या मागण्या
बुलढाणा जिल्ह्याच नाव जिजाऊ नगर करण्यात यावे. तसेच १२ जानेवारीला ला विशेष मंत्री मंडळ बैठक जिजाऊ यांच्या जन्मगाव सिंदखेड राजा इथे घेण्याची मोठी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांनाही पत्र पाठवले आहे.

प्रदीप कापसे, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला संघटनेची महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या नावाच्या उल्लेखाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत बुलढाणा जिल्ह्याच नाव जिजाऊनगर करा या मागणीसह तीन महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या महिला संघटना प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
काय आहेत राष्ट्रवादीचे ठराव?
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला संघटनेची महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये स्वर्गीय अजित दादा हा शब्द न वापरता लोकनेते अजित दादा हा शब्द वापरावा असा महत्त्वाचा ठराव करण्यात आला आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्याच नाव जिजाऊ नगर करण्यात यावे. तसेच १२ जानेवारीला ला विशेष मंत्री मंडळ बैठक जिजाऊ यांच्या जन्मगाव सिंदखेड राजा इथे घेण्याची मोठी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांनाही पत्र पाठवले आहे.
प्रमुख मागण्या
- मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे विशेष राज्य मंत्रिमंडळ बैठक आयोजित करावी.
- दिनांक १२ जानेवारी २०२७ रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून, शक्य असल्यास त्याच दिवशी अथवा त्या निमित्ताने त्यांच्या जन्मभूमी सिंदखेड राजा येथे मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात यावी.
विकास आराखड्यास अंतिम मान्यता व निधी द्यावा. - मा. अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून सादर झालेल्या सुमारे ₹४५४ कोटींच्या सुधारित विकास आराखड्याची सद्यस्थिती तपासून, आवश्यकतेनुसार त्याचे अद्ययावतीकरण करून संबंधित उच्चस्तरीय समिती व शिखर समितीमार्फत अंतिम मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. मंजूर विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
- ऐतिहासिक वारशाच्या जतनास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, राजे लखुजीराव जाधव यांचा ऐतिहासिक राजवाडा, समाधीस्थळे, मंदिरे, मोती तलाव आणि इतर ऐतिहासिक वास्तूंचे पुरातत्त्वीय नियमांनुसार जतन, संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवावा.