AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात शिवसेनेला मोठा झटका; ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अभय शिरसाट हे गेल्या पाच वर्षांपासून पक्षात दुर्लक्षित होते. | Abhay Shirsat

कोकणात शिवसेनेला मोठा झटका; 'या' नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 18, 2021 | 12:23 PM
Share

सिंधुदुर्ग: शिवसेनेतील पक्षांतर्गत वादाला कंटाळलेले उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट (Abhay Shirsat) यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत बुधवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव जगताप यांच्या उपस्थितीत अभय शिरसाट यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. त्यांच्या जाण्याने आगामी काळात कुडाळमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जाते. (Shivsena leader Abhay Shirsat joins congress)

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच अभय शिरसाट यांनी तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच अभय शिरसाट काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसचा झेंडा हाती धरला आहे.

अभय शिरसाट यांनी शिवसेना का सोडली?

अभय शिरसाट हे गेल्या पाच वर्षांपासून पक्षात दुर्लक्षित होते. आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला ते कंटाळले होते. त्यामुळेच आता अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कुडाळमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याचा धोका

2014च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्यासारख्या तगड्या नेत्याचे आव्हान असताना वैभव नाईक निवडून आले होते. या विजयात अभय शिरसाट यांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. मात्र, आता त्यांनीच पक्षाला रामराम ठोकल्याने आगामी काळात कुडाळमध्ये शिवसेनेला गळती लागण्याची शक्यता आहे.

भाजप नेते अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर राणे कुटुंबीय कोकणात आणखीनच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राणे कुटुंबीयांकडून शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. अशावेळी कोकणातील वाढती नाराजी शिवसेनेसाठी धोक्याची घंटा ठरु शकते. काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गातील शिवसेना नेते दीपक केसरकर यांनीही पक्षनेतृत्त्वाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे सांगत जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखविली होती.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर

महाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकरांच्या नाराजीची चर्चा

शाहांचे पाय लागतील तिथे कमळ फुलतं, राणे समर्थक सात नगरसेवकांच्या राजीनाम्यानंतरही भाजप आशावादी

(Shivsena leader Abhay Shirsat joins congress)

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश