पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; निखिल यादव-नितेश पवारला 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहेच. ठाणे न्यायालयातील न्यायाधिशांनी दोन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता याप्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे,

पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; निखिल यादव-नितेश पवारला 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
Pradeep purnekar murder case
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 6:06 PM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : ठाण्यातील प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाने ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी शुटर निखिल यादव आणि कोयत्याने हल्ला करणारा आरोपी नितेश पवार या दोघांना न्यायालयाने 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कर्नाळा परिसरातून दोघांना अटक

मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा परिसरातून पहाटे निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सध्या दोघांना गुन्हे शाखेच्या कार्यालयातून ठाणे न्यायालयात हजर करण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांकडून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. हत्येच्या तपासाच्या दृष्टीने दोघांची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Loading...

हत्येत वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी तपास

निखिल यादव आणि नितेश पवार यांच्या पोलीस कोठडीदरम्यान हत्येच्या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. हत्येत वापरलेले शस्त्र तसेच इतर साहित्य जप्त करण्याच्या दृष्टीने तपास केला जाणार आहे. याशिवाय प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट नेमका कसा रचण्यात आला, हत्येचे नियोजन कुठे आणि कशाप्रकारे करण्यात आले आणि या दोन्ही आरोपींचा हत्येत नेमका सहभाग काय होता, याबाबतही पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

आणखी संशयितांचा शोध सुरू

या प्रकरणात पप्या शिंदे याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे. तर आणखी दोन संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही या संशयितांचा शोध घेतला जात आहे. निखिल यादव आणि नितेश पवार यांच्या चौकशीतून पूर्णेकर हत्या प्रकरणातील आणखी काही धागे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांची पोलीस कोठडी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us