Thane Accident | दुचाकीस्वाराची नीलगायीला जोरदार धडक, भीषण अपघातात चालकाचा मृत्यू

एक घटना किन्हवली शहापूर मार्गावर उंभ्रई गावाशेजारी घडली आहे. येथे दुचाकीस्वाराने नीलगायीला जोरदार धडक (Accident) दिलीय. या घटनेत नीलगायीसह दुचाकीस्वाराचा (Bike Rider) मृत्यू झाला आहे.

Thane Accident | दुचाकीस्वाराची नीलगायीला जोरदार धडक, भीषण अपघातात चालकाचा मृत्यू
सांकेतिक फोटो

ठाणे : रस्त्यावर कुत्रे, गायी (Cow) आणि म्हशींसारखो मोकाट जनावरे नेहमीच दिसतात. यामध्ये कुत्रे तसेच समावेश आहे. रस्त्यात आलेल्या या प्राण्यांमुळे भरधाव वेगात आलेल्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कधीकधी तर रस्त्यावरील जनावरे मध्ये आल्यामुळे अपघातदेखील होतो. अशीच एक घटना किन्हवली शहापूर मार्गावर उंभ्रई गावाशेजारी घडली आहे. येथे दुचाकीस्वाराने नीलगायीला जोरदार धडक (Accident) दिलीय. या घटनेत नीलगायीसह दुचाकीस्वाराचा (Bike Rider) मृत्यू झाला आहे.

दुचाकीस्वाराची निलगायीला जोरदार धडक

मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील वेहळोली, चेरवली, कानवे, खरीडच्या जंगलातून उंभ्रई, अस्नोली, मुगावच्या डोंगर परिसरात विविध जंगली प्राण्यांची अन्नाच्या शोधात ये-जा सुरू असते. त्यामुळे किन्हवली-शहापूर रस्त्यावर परटोली ते बेडीसगाव या दरम्यान रानडुकरे, रानगाई यांना रस्ता ओलांडताना वाहनांची धडक बसण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. बेडीसगाव येथे एक नीलगाय कारच्या धडकीत ठार झाल्याची घटना ताजी असतानाच, उंभ्रई फाट्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या नीलगाईला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली आहे. या दुर्घटनेत डोळखांब भागातील जांभूळवाड गावातील पंढरी बुधा वाघ या 20 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात नीलगायसुद्धा ठार झाली आहे.

अपघातात दुचाकीस्वारासह निलगायीचा मृत्यू 

हा अपघात झाल्यानंतर इतर प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दुचाकीस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. किन्हवली पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून स्वतंत्र पंचनामे केले आहेत. तर दुसरीकडे अशा प्रकारचे अपघात भविष्यात घडू नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

इतर बातम्या :

Imtiaz Jaleel | ‘दुकानदारांकडे खायला पैसे नाहीत, सरकारी खर्चातून पाट्या बदलून द्या;’ मराठी नामफलकावरुन इम्तियाज जलील यांची नाराजी

Nashik | शाळेतल्या पोरांसारखी गुरुजींची भांडणं, नाशकात मुख्याध्यापकाने शिक्षकाचा अंगठा चावला

Train Accident in North Bengal : गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसचे 12 डबे घसरले, 5 जणांचा मृत्यू, रेल्वेमंत्री घटनास्थळाकडे रवाना


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI