AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manikrao Kokate Resignation : सर्वात मोठी बातमी! माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार?

मोठी बातमी समोर येत आहे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे येत्या सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, त्यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Manikrao Kokate Resignation : सर्वात मोठी बातमी! माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार?
| Updated on: Jul 25, 2025 | 5:57 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाला असून, ते सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, मंगळवारी कॅबिनेटची बैठक आहे, त्यापूर्वी माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे.

राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर आले आहेत, या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली, ही चर्चा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे, मात्र या चर्चेबाबत अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाहीये. फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे आज छावा संघटनेचे नेते विजय घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेतला जाईल असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा विजय घाडगे यांनी केला आहे. तसेच सूरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचंही अजित पवार यांनी यावेळी म्हटल्याची माहिती विजय घाडगे यांनी दिली आहे, त्यामुळे माणिकराव कोकाटे हे सोमवारी राजीनामा देऊ शकतात अशी आता चर्चा सुरू झाली आहे.

माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या विजय घाडगे यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता, या प्रकरणात सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  त्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटल्याचं विजय घाडगे यांनी यावेळी सांगितलं.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा