AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? कोणत्या मागण्यावर संध्याकाळी निर्णय घेणार? वाचा डिटेल्स; विखे पाटलांना यश?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेनंतर काही मागण्यांवर जरांगे सहमत झाले आहेत. कुणबी प्रमाणपत्र, निलंबित अधिकारी आणि जात पडताळणी यावर सहमती झाली.

Manoj Jarange Patil : जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत? कोणत्या मागण्यावर संध्याकाळी निर्णय घेणार? वाचा डिटेल्स; विखे पाटलांना यश?
मनोज जरांगे कोणत्या मागण्यांवर सहमत?
| Updated on: May 30, 2026 | 11:48 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आमरण उपोषण सुरू केलं आहे. रणरणत्या उन्हात मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांच्या भोवती मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आर या पारची लढाई सुरू झाल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष जरांगेंकडे लागलं आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांनी उन्हात बसू नये म्हणून स्वत: राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपोषण स्थळी आले आहेत. जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून त्यांनी ड्राफ्ट करून आणला आहे. हा ड्राफ्ट त्यांनी मनोज जरांगे यांना दाखवला आहे. यातील बऱ्याच मागण्यांवर जरांगे सहमत झाले आहेत. काही मागण्यांवर ते अभ्यासकांसोबत आज संध्याकाळी चर्चा करणार आहेत. अभ्यासकांनी अभिप्राय दिल्यानंतरच जरांगे पुढची भूमिका ठरवणार आहेत.

मनोज जरांगे यांचं तज्ज्ञांना आवाहन

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना ड्राफ्ट दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे समाधानी झाल्याचे दिसले. त्यातील काही मुद्द्यांना त्यांनी मान्यता दिली आहे. तर काही मुद्द्यांवर अभ्यासकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातून अभ्यासक येतील. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढची भूमिका ठरवू, असं मनोज जरांगे म्हणाले. त्यानंतर त्यांनी मीडियासमोरच राज्यातील अभ्यासकांना आवाहन केलं.

राज्यातील सर्व अभ्यासक आणि तज्ज्ञांना आवाहन आहे. फोन लावायला वेळ नाही. मी उन्हात आहे. मीडियातून ऐका. आमच्या भावना समजून घ्या. तुम्ही तातडीने 5 वाजेपर्यंत अंतरवलीत या. जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत या. तुम्हाला ड्राफ्ट दाखवतो. त्यात काही सूचना असतील, बदल असतील तर सांगा. मी ते विखे पाटलांना सांगतो. तातडीने या, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

या मागण्यांवर सहमती

>> कुणबी प्रमाणपत्रांबाबत राज्य सरकारवतीने अधिकृत सूचना देणार आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांना सूचना दिली जाणार आहे

>> 58 लाख नोंदी सापडल्या कुणबीप्रमाणपत्र द्या. दिले असेल तर व्हॅलिडिटी देणार आहे. ज्या अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलं नाही, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश काढणार आहेत.

>> जात पडताळणीचा आढावा प्रत्येक 15 दिवसाने घेणार आहे.

>> स्वतंत्र मराठा मंत्रालय एक महिना मागितला. मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात निर्णय घ्यावा

>> बलिदान दिलेल्यांना 15 दिवसात पैसे देणार.

>> कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाबाबतचा आढावा दर 8 दिवसाने घेणार, जिल्हाधिकारी कार्यालयाला हेल्पलाईन देऊ. हे मान्य

>> ग्रामस्तरीय कामकाजाचा आढावा 15 दिवसात घेणार आहे. त्याच्याही सूचना काढणार आहेत. त्याही काढतो म्हणाले.

>> अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे पैसेही देतो म्हणाले. त्याच्याही सूचना काढणार आहे.

या मागण्यांवर अभ्यासकांसोबत होणार चर्चा

>> हैद्राबाद संस्थानच्या गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने एसओपी तयार केली आहे. एसओपी योग्य आहे का? हे अभ्यासकांना विचारून सांगणार आहे.

>> सातारा संस्थानचा गॅझेटियरचा जीआर एक महिन्यात काढू म्हणाले. आम्ही म्हणाले एक दिवसात काढा. ते काढणार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांशी आणि कायदे तज्ज्ञांशी बोलणार आहेत. ते करतो म्हणाले.

>> सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणार आहे. पत्रक काढणार आहे. विखे पाटील यांनी तुम्ही ओके म्हणून सांगा. मी पत्रक काढतो असं आश्वासन दिलं. त्यावर, मला याबाबत अभ्यासकांशी बोलावे लागेल. हे योग्य आहे का विचारावं लागेल, असं जरांगे म्हणाले. याबाबत सरकारला शासन आणि प्रशासन स्तरावर सूचना काढाव्या लागतील.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा