AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayangad Dasara Melava 2026 : पुन्हा लाखो मराठे जमणार, मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, आता नारायणगडावर…नवी घोषणा काय?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे. याशिवाय आगामी दसरा मेळाव्याबाबात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे, काय म्हणाले जरांगे पाटील?

Narayangad Dasara Melava 2026 : पुन्हा लाखो मराठे जमणार, मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, आता नारायणगडावर...नवी घोषणा काय?
Narayangad Dasara Melava 2026Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 5:45 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्स्वात मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती. पण त्यामधून त्यांनी माघार घेतली. त्यानंतर आता परत एकदा मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमणार आहेत. त्यासाठी खुद्द जरांगे पाटलांनी मराठ्यांना आवाहन केलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नारायगड येथे दसरा मेळावा पार पडणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. ते जालन्यात बोलत होते.

भाजप सरकारने ज्ञानेश कुमार यांना काढून दुसऱ्याला तिथे नियुक्त करावे. सरकार आणि ज्ञानेश कुमार यांची मिलीभगत आहे का? असा संशय बळावतो आहे. सरकारने ज्ञानेश कुमार यांना काढून टाकलं पाहिजे. यांची गुंडगिरी आणि दहशत आता लोकांना सहन होत नाहीये. असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे.

दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की, सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत देऊन त्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. जर जनता तुम्हाला सत्तेवर बसवू शकते, तर तुम्हाला खाली पण खेचू शकते असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.

मराठ्यांचे लोकं आरक्षण मागायला लागले तर दादागिरी करायची आणि ते मोडून काढायचे असा खेळ सुरु असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. आता संयमाचा बांध तुटणारच आहे. मला प्रचंड त्रास देणे सुरू आहे. मराठा आंदोलकांना त्रास देणे सुरू आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, जरांगे पाटलांनी यावेळी सरकारवर अनेक विखारी शब्दांमध्ये घणाघात केला आहे. घोषित हुकूमशाही सुरू आहे, आता सत्ताधाऱ्यांची जुलमी राजवट सुरू आहे, हे सरकार प्रचंड अन्यायकारी आहे. असंही जरांगेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कसकाय होत नाही, या प्रश्नावरुन त्यी सरकारला घेरलं आहे. सरकारने गावागावात चारा छावण्या सुरू कराव्यात. मी सरकारचा मित्र व्हायला तयार नाही. मला सरकारपुढे झुकवण्यासाठी ज्या-ज्यावेळी डाव टाकले जातील, त्या-त्यावेळी मराठा समाज 100 पट ताकदीने एकत्र आला पाहिजे, असंही यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलं आहे.

याशिवाय त्यांनी दसरा मेळाव्याबद्दलची भूमिकाही जाहीर केली आहे. नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने यावं. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे आवाहन केलं आहे. नियोजित मेळावा पार पडणार असून त्यांनी मराठा बांधवांना मोठ्या संख्येने एकत्र येण्याचं आवहान केलं आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात