मोठी बातमी! मनोज जरांगेंनी टाकला आणखी एक मोठा बॉम्ब; सरकारचं टेन्शन वाढणार, आता थेट..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा दावा या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला होता. ही ऑडिओ क्लिप राज्यात सध्या चर्चेचा विषय बनलेली असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आणखी एक मोठा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात चर्चा थांबलेली नाही, संपूर्ण शब्द न शब्द ऐकत आहे, आणि तपास सुरूच राहणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे, तसेच आपल्याकडे आणखी चार ऑडिओ क्लिप असल्याचा दावा देखील यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
चर्चा थांबलेली नाही संपूर्ण शब्द न शब्द ऐकत आहे, आणि तपासही सुरू आहे. ऑडिओ क्लिप AI ने बनवलेली आहे, असा गैरसमज पसरवत आहेत. पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. अल्टीमेटम देत नाही परंतु त्यांची नीतिमत्ता तपासत आहे. माझ्याकडे अणुबॉम्ब आहे, माझ्याकडे चार क्लिप आहेत, त्या हळूहळू बाहेर काढणार आहे. लोकांना आता सगळं कळतं ती AI ने बनवलेली क्लिप नाही, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
गैरसमज पसरतो का? हे त्यांच्याकडून पाहिलं जात आहे. AI म्हणून प्रयोग सुरू आहे, पण आता त्याचा उपयोग होणार नाही. तुमचं माझ्याकडे खुप काही आहे. देवेंद्र फडणवीस कोणाला पाठीशी घालतात असं सध्या तरी वाटत नाही, त्यांना ही माहिती नसावी. भाजप संपवून पाहतायेत का? असं ते म्हणतायेत, म्हणजे यांच्या मागे मोठ्या संस्थेंची ताकद वाटते, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आता मोठा दावा करण्यात आला आहे, आपल्याकडे आणखी चार ऑडिओ क्लिप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.