मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले पुरावे थेट फडणवीसांना.., वातावरण तापलं

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाचशे कोटी रुपयांच्या ऑ़डिओ क्लिपवरून गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले पुरावे थेट फडणवीसांना.., वातावरण तापलं
manoj jarange
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 18, 2026 | 5:33 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला होता.  त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती, ज्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले आणि ते श्रींकात शिंदे यांच्यामार्फत पाठवले असा उल्लेख होता. ही ऑडिओ क्लिप समोर येताच राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान त्यानंतर आता बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे.  या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?  

Loading...

माझ्या माहितीप्रमाणे त्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणारचं नाहीये आणि ते करणारही नाही कारण त्यामध्ये भाजपचे लोक आहेत. त्यांच्यावर कारवाई केली तर भाजप मराठ्यातून संपत आहे आणि नाही केली तर मराठे शिंदे साहेबांपासून संपत आहेत. सामान्य लोक जर असते तर गुन्हे दाखल करून अटक केली असती आणि त्यानंतर एसआयटी नेमली असती. मात्र इथे सगळं उलट झालं, अगोदर एसआयटी नेमली गेली, कारवाई केली नाही, गुन्हे दाखल केले नाही याचाच अर्थ असा होतो की त्यांच्या पक्षाचे लोक त्यांना वाचवायचे आहेत.

त्यांच्या त्यांच्यात खासगीमध्ये चर्चा आहे की, पैशाचं काहीही होवो, मात्र ही क्लिप बाहेर गेली कशी? हाच खूप मोठा शॉक त्यांना बसलेला आहे. आता सरकारची एक नवीनच मोहीम सुरू झालेली आहे, जरांगे पाटलांच्या विरोधात जो बोलेल त्याला लागेल तेवढे पैसे द्या असा मोठा गौप्यस्फोट यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.  या सगळ्या गोष्टीचे पुरावे सुद्धा मी फडणवीसांना देणार आहे, त्यामुळे अजून काहीतरी वाजणार आहे,  असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.  दरम्यान आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे आता सरकारच्या वतीने यावर काय प्रतिक्रिया येणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us