
जालना मारहाण प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंड हा मनोज जरांगे पाटील यांचा राईट हँड असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. आमच्याकडे फोटो आहेत असं लक्ष्मण हाके म्हणाले. त्यावर “किचडाचे प्रश्न विचारू नका. आपण समर्थन करत नाही. चुकीला साथ देत नाही. मी कुणाचेही समर्थन करत नाही. त्या किचडाचे काय काढता? आम्ही प्रामाणिक लोक असून आणि सभ्य माणसे आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“या अधिवेशनात तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांनी द्यावेत. आरक्षणाची अंमलबजावणी करावी. सगे सोयरे अंमलबजावणी करण्यात यावी. सर्व गुन्हे मागे घेऊ म्हणालेले, पावणे दोन वर्षे झाले. मात्र गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला असताना मागे न घेतल्याने गुन्हे मागे घ्या. शिंदे समिती काम करत नाही. अधिकारी विनाकारण वेठीस धरतात. शिंदे समितीला 24 तास कामाला लावावे” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
‘फडणवीस, मी नंतर कोणत्या…’
“बलिदान दिलेल्या परिवाराला अद्याप नोकऱ्या दिल्या नाही. आठ मागण्यांपैकी चार मागण्या तत्काळ मान्य करु असे म्हणाले होते. मात्र मान्य झाल्या नाही. आम्ही आझाद झालो नसून पुन्हा पेटून उठणार. फडणवीस, मी नंतर कोणत्या टोकाला हे मला सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला आरक्षण द्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
’30 ते 40 वेळा धनंजय मुंडे यांना फाशी द्यावी लागेल एवढे पुरावे’
“धनंजय मुंडे हा स्वतःच्या प्रॉपर्टी कराडच्या नावावर ठेवत होता. फडणवीस जेव्हा आरोपीच्या संपत्ती जप्त करतील तेव्हा धनंजय मुंडे यांना त्रास होईल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे आहेत. SIT आणि CID कडे पुरावे आहेत. पुनर्तपास होणार. पोलिसांना विश्वासात घेऊन सागर बंगल्यावर बैठक घ्या. पोलिस ट्रक भरून पुरावे देतील. 30 ते 40 वेळा धनंजय मुंडे यांना फाशी द्यावी लागेल एवढे पुरावे आहेत” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.